Cryptocurrency: क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार आता मनी लाँड्रिंग कायद्यांतर्गत, ईडीला चौकशीचे अधिकार
Digital Currency: व्हर्च्युअल करन्सीसंबंधित व्यवहार आणि हस्तांतर आता PMPL कायद्यांतर्गत येणार असून ईडीला त्याच्या चौकशीचा अधिकार मिळाला आहे.
नवी दिल्ली: क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारासंबंधित एक महत्त्वाची घोषणा केंद्र सरकारने केली असून क्रिप्टोकरन्सीशी संबंधित व्यवहार आता मनी लाँड्रिंग कायद्याअंतर्गत येणार आहेत. केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून यासंबंधीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
केंद्रीय अर्थ मंत्रालयाने मंगळवारी यासंबंधी अधिसूचना जारी केली असून त्यामध्ये म्हटलं आहे की, क्रिप्टो ट्रेडिंग, सेफकीपिंग आणि संबंधित वित्तीय सेवांवर मनी लाँड्रिंग कायदा लागू करण्यात आला आहे.
आभासी आणि डिजिटल मालमत्तेचा समावेश असलेल्या व्यवहारातील सहभाग आता पीएमएलए कायद्याच्या तरतुदींच्या अंतर्गत येणार आहे. डिजिटल मालमत्तेवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं हे पाऊल उचलल्याचं बोललं जातंय. गुंतवणूकदारांना आभासी किंवा डिजिटल मालमत्तेसाठी केलेल्या कोणत्याही ऑफर आणि विक्रीशी संबंधित वित्तीय सेवांमध्ये सहभागी होण्याविरुद्ध सावधतेचे इशारे देण्यात आले आहेत.
व्हर्च्युअल डिजिटल मालमत्तेची देवाणघेवाण आणि हस्तांतरण देखील पीएमएलए कायद्यांतर्गत येणार आहे. ईडीकडून आधीच अनेक क्रिप्टो एक्सचेंजेसची चौकशी करण्यात ये आहे, ज्यात Coinswitch Kuber आणि WazirX एक्सचेंजचा समावेश आहे.
केंद्र सरकारच्या या नव्या अधिसूचनेनंतर ईडीला आता मनी लाँड्रिंग आणि फॉरेक्स उल्लंघनाच्या प्रकरणांची चौकशी करण्याचा अधिकार मिळाला आहे. भारताकडून अद्याप क्रिप्टोकरन्सीशी संबंधित कायदे आणि नियमांना अंतिम स्वरुप नाही, मात्र अनेकदा क्रिप्टो वापरण्यावर सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या वर्षी भारताने क्रिप्टो क्षेत्रावर अधिक कठोर कर नियम लागू केले, ज्यात व्यापारावर टॅक्स लागू करण्याचा समावेश आहे. त्यामुळे तसेच डिजिटल करन्सीच्या पडत्या किमतीमुळे त्याच्या व्यवहारात मोठ्या प्रमाणात घसरण आल्याचं दिसून आलं.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने आज आपला डिजिटल रुपया लाँच केला आहे. त्यामध्ये रुपयाची व्याख्या आता अधिक विस्तृत झाली असून सेंट्रल बँक डिजिटल चलनचा (CBDC) त्यामध्ये समावेश आहे. खाजगी डिजिटल चलन म्हणजे क्रिप्टोकरंसीला पर्याय म्हणून आरबीआयने डिजिटल रुपया बाजारात आणला आहे.
सेंट्रल बँक डिजिटल करंसी (CBDC) म्हणजे नेमके काय?
सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (CBDC) हे आरबीआयने तयार केलेल्या डिजिटल करन्सीचे कायदेशीर प्रतिनिधीत्व करते. सोप्या शब्दात सांगायचं तर हे फियाट मनीचे, म्हणजे भारतीय रुपयाचे डिजिटल प्रतिनिधित्व आहे. त्यामुळे फियाट मनीची देवाणघेवाण करता येते. ब्लॉकचेनच्या माध्यमातून डिजिटल करन्सीचा वापर करता येऊ शकेल.
ही बातमी वाचा: