एक्स्प्लोर
27 वर्षीय फॅशन डिझायनरची गळफास घेऊन आत्महत्या

नवी दिल्ली : नोएडामध्ये एका तरुण फॅशन डिझायनरने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. नोएडा सेक्टर 27 मध्ये 27 वर्षीय विनीता ही तरुणी राहत होती. फॅशन डिझायनिंगचा कोर्स केल्यानंतर बऱ्याच काळापासून तिच्या हाती काहीच काम नव्हतं. त्यामुळे ती तणावाखाली असायची. याच कारणातून तिने टोकाचं पाऊल उचलल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. विनीताने राहत्या घरात आपल्या खोलीतील पंख्याला लटकून गळफास घेतला. सोमवारी सकाळी तिच्या खोलीचा दरवाजा उघडताच कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र तिला मृत घोषित केलं गेलं. विनीताचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला असून पोलिस अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी तिच्या बेडरुमची झडती घेतली असून कोणतीही सुसाईड नोट मिळालेली नाही.
आणखी वाचा























