एक्स्प्लोर

Farmers Protest: भयाच्या भिंती उभा करुन भीती का दाखवता? प्रियांका गांधींचा केंद्र सरकारला सवाल

दिल्लीत प्रवेश करण्यापासून शेतकऱ्यांना (Farmers Protest) रोखण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर पोलिसांकडून बॅरिकेट्स उभा करण्यात आली आहेत. त्यावर आता काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी टीका केली आहे.

नवी दिल्ली: संयुक्त किसान मोर्चा संघटनेकडून आज दिल्लीत चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठी सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी दिल्लीत प्रवेश करु नये म्हणून सरकारच्या वतीनं दिल्लीच्या सीमांवर बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत, रस्त्यावर खिळे ठोकण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी भिंती उभा करण्यात आल्या आहेत. सरकारच्या या उपायांवर आता काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी टीका केली आहे.

दिल्ली सीमेवर सुरक्षा रक्षकांनी प्रचंड बंदोबस्त वाढवला आहे. मोठ्या प्रमाणावर बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. त्यावर प्रियांका गांधी यांनी एक ट्वीट केलं असून त्यात म्हटलं आहे की, "या भयाच्या भिंती बांधून भीती का दाखवता." या ट्वीटसोबत प्रियांका गांधी यांनी एक फोटोही शेअर केला असून त्यामध्ये दिल्लीच्या सीमेवर पोलिसांनी उभे केलेले बॅरिकेट्स दिसतात.

Farmers Protest: सरकार आणि आंदोलकांनी संयम बाळगावा; संयुक्त राष्ट्र मानवी हक्क आयोगाचे आवाहन

प्रियांका गांधी आणि राहुल गांधी यांनी शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरुन सातत्याने केंद्र सरकारवर टीका केली आहे. प्रियांका गांधी यांनी या आधीही केंद्र सरकारवर टीका करताना सरकार शेतकऱ्यांना दहशतवादी समजतंय असा आरोपही केला होता. दिल्ली हिंसाचारानंतर काही पत्रकारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावरही टीका करताना प्रियांका गांधींनी म्हटलं होतं की, "शेतकरी आंदोलनाचे कव्हरेज करणाऱ्या पत्रकारांवर आता देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले आहेत. अनेक ठिकाणचे इंटरनेट बंद करण्यात येत आहे. भाजप सरकार शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. पण ते विसरतात की शेतकऱ्यांचा आवाज जेवढ्या प्रमाणात दाबला जाईल त्यापेक्षा जास्त प्रमाणात सरकारच्या अत्याचाराविरोधातील आवाज वाढत जाईल."

शेतकऱ्यांचा आज चक्का जाम संयुक्त किसान मोर्चा संघटनेकडून आधी घोषित केल्यानुसार आज 'चक्का जाम' करण्यात येणार आहे. आज दुपारी 12 ते 3 या वेळेत हे देशव्यापी आंदोलन केलं जाणार आहे. शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी सांगितलं आहे की, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये चक्‍का जाम होणार नाही, मात्र या दोन्ही राज्यांमध्ये एक लाख शेतकरी स्टॅंडबायमध्ये असतील.

शेतकऱ्यांच्या चक्का जाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून दिल्ली मेट्रोचे अनेक स्टेशन बंद करण्यात आले आहेत.

मोदी सरकार शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतंय, पण.... प्रियांका गांधींचा हल्लाबोल

महत्त्वाच्या बातम्या

साखरेच्या वाढत्या किंमतीमुळं सरकारनं घेतला मोठा निर्णय, इथेनॉलमध्ये साखरेच्या वापरावर बंदी, आता इथेनॉलचे उत्पादन कसे होणार?
साखरेच्या वाढत्या किंमतीमुळं सरकारनं घेतला मोठा निर्णय, इथेनॉलमध्ये साखरेच्या वापरावर बंदी, आता इथेनॉलचे उत्पादन कसे होणार?
CJP Tiranga March: सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भारताविरोधात मोठा कट,बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भाजपच्या बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
Abhijit Dipke Detained : 'सर, मी तर अजून कायदा मोडलाच नाही...', अभिजीत दिपकेंना दिल्ली पोलीस ताब्यात घेतानाचा व्हिडीओ समोर
'सर, मी तर अजून कायदा मोडलाच नाही...', अभिजीत दिपकेंना दिल्ली पोलीस ताब्यात घेतानाचा व्हिडीओ समोर
RBI चा मोठा निर्णय! बँकांसाठी नवीन नियम लागू, तुमच्या खात्यावर परिणाम होणार का? जाणून घ्या सविस्तर माहिती 
RBI चा मोठा निर्णय! बँकांसाठी नवीन नियम लागू, तुमच्या खात्यावर परिणाम होणार का? जाणून घ्या सविस्तर माहिती 

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raigad Crime Controversy : रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
Team India Squad: बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
YCM Hospital : कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन; विभागीय चौकशीचे आदेश
कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन
CJP Tiranga March: सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भारताविरोधात मोठा कट,बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भाजपच्या बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
MPSC New Chairman : मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, विवेक भीमनवार रजेवर जाताच निर्णय
मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, भीमनवार रजेवर जाताच निर्णय
Asaduddin Owaisi On Elon Musk : मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
Embed widget