मोदी सरकार शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतंय, पण.... प्रियांका गांधींचा हल्लाबोल
काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी शेतकरी आंदोलनावरुन केंद्र सरकारवर टीका केली आहे. भाजप सरकार शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
नवी दिल्ली: शेतकरी आंदोलन आणि दिल्लीतील हिंसाचारावरुन आता काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केलीय. केंद्रातील भाजप सरकार देशातील शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच पत्रकारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केल्याप्रकरणीही त्यांनी भाजप सरकारवर टीका केली आहे.
प्रियांका गांधींनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, "शेतकरी आंदोलनाचे कव्हरेज करणाऱ्या पत्रकारांवर आता देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले आहेत. अनेक ठिकाणचे इंटरनेट बंद करण्यात येत आहे. भाजप सरकार शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. पण ते विसरतात की शेतकऱ्यांचा आवाज जेवढ्या प्रमाणात दाबला जाईल त्यापेक्षा जास्त प्रमाणात सरकारच्या अत्याचाराविरोधातील आवाज वाढत जाईल."
किसान आंदोलन कवर कर रहे पत्रकारों को गिरफ्तार किया जा रहा है, उनपर मुकदमें किए जा रहे हैं। कई जगहों पर इंटरनेट बंद कर दिया है। भाजपा सरकार किसानों की आवाज को कुचलना चाहती है लेकिन वे भूल गए हैं कि जितना दबाओगे उससे ज्यादा आवाजें आपके अत्याचार के खिलाफ उठेंगी। #ReleaseMandeepPunia
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) January 31, 2021
पत्रकार आणि विरोधकांवर सरकारकडून दाखल करण्यात येत असलेल्या गुन्ह्यांवर प्रियांका गांधी यांनी टीका केली. त्या म्हणाल्या की, "अशा प्रकारचे गुन्हे दाखल करणे आणि पत्रकार आणि विरोधकांना धमकावण्याचा प्रकार हा अत्यंत भयानक आहे. लोकशाहीचा सन्मान करणे हे काही सरकारच्या मर्जीवर अवलंबून नसून सरकारची ती जबाबदारी आहे. अशा प्रकारचे भितीचे वातावरण हे लोकशाहीसाठी अत्ंयत धोकादायक आहे. भाजप सरकारकडून विरोधकांना आणि पत्रकारांना धमकावण्यासाठी देशद्रोहाचे गुन्हे दाखल करणे म्हणजे लोकशाहीच्या सर्व मर्यादा पार करण्यासारखं आहे."
भाजपा सरकार द्वारा पत्रकारों एवं जन प्रतिनिधियों को FIR कर धमकाने का चलन बहुत ही खतरनाक है। लोकतंत्र का सम्मान सरकार की मर्ज़ी नहीं बल्कि उसका दायित्व है। भय का माहौल लोकतंत्र के लिए ज़हर के समान है।..1/2
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) January 30, 2021
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडदरम्यान मोठा हिंसाचार झाला होता. या हिंसाचाराबद्दल सोशल मीडियाच्या माध्यमातून खोटी माहिती पसरवल्याचा आरोप करत उत्तर प्रदेश पोलिसांनी काँग्रेस नेता खासदार शशी थरुर आणि सहा पत्रकारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे.
शशी थरुर आणि सहा पत्रकारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल, हिसांचारासंबंधी खोटी माहिती पसरवल्याचा आरोप