एक्स्प्लोर

Farmers Protest : ... तर तीन तासांत मागे घेणार आंदोलन, शेतकऱ्यांनी सांगितल्या अटी 

मागच्या महिन्यात केंद्र सरकारकडून हे तीन कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. परंतु, सरकारच्या घोषणेनंतरही शेतकरी आंदोलनावर ठाम आहेत. आता शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेण्यासाठी काही अटी घातल्या आहेत.

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांना विरोध म्हणून दिल्लीच्या सीमेवर वर्षभरापेक्षा जास्त कालावधीपासून शेतकरी आंदोलन (Farmers Protest)करत आहेत. मागच्या महिन्यात केंद्र सरकारकडून हे तीन कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. परंतु, सरकारच्या घोषणेनंतरही शेतकरी आंदोलनावर ठाम आहेत. आता शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेण्यासाठी काही अटी घातल्या आहेत. एमएसपी (MSP law) कायदा तयार केला तर तीन तासांत आंदोलन मागे घेऊ, अशी भूमीका शेतकऱ्यांनी(farmers) घेतली आहे.   

केंद्र सरकारने नवे तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. परंतु, याबरोबरच आंदोलक शेतकऱ्यांच्या आणखी काही महत्त्वाच्या मागण्या होत्या. शेतकऱ्यांच्या पिकाला एमएसपी म्हणजे किमान आधारभूत किंमत मिळावी ही त्यातली महत्त्वाची मागणी आहे. ही मागणी मान्य करेपर्यंत आंदोलन मागे न घेण्यावर शेतकरी ठाम आहेत. जर एमएसपी कायदा मंजूर केला तर अवघ्या तीन तासात आंदोलन मागे घेऊ अशी भूमीकाही शेतकऱ्यांनी घेतली आहे. 

कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा करताना एमएसपी कायद्यांबाबात विचार करण्यासाठी एक समिती स्थापन केली जाईल असेही सरकारने सांगितले आहे. घोषनेच्या एवढ्या दिवसानंतर आता शेतकरी आंदोलनात समिती तर तयार करण्यात आली आहे. परंतु, शेतकरी हे आंदोलन कधी मागे घेणार याबाबत अद्याप निर्णय झाला नाही. शेतकरी नेते म्हणत आहेत की, सरकारने मागणी मान्य केली तर तोडगा निघू शकतो.  तर काही शेतकरी नेते म्हणत आहेत की, एमएसपी कायद्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही. 
 
शेतकऱ्यांच्या समितीमध्ये मनोज सिंह कक्का, जैनेद्र युद्धवीर सिंह आणि बलवीर राजेवाल यांचा समावेश आहे. या नेत्यांचे मत आहे की, सरकारने त्यांची मागणी मान्य केली तर हे आंदोलन तीन तासात संपू शकते. हे तीन नेते शेतऱ्यांचे प्रतिनीधी म्हणून सरकारसोबत चर्चा करतील.

दरम्यान, शेतऱ्यांच्या या मागणीमुळे एक गोष्ट स्पष्ट आहे की, हे आंदोनल सध्यातरी थांबणार नाही. चेंडू आता सरकारच्या कोर्टात आहे. याबरोबरच पुढची बैठक येत्या 7 तारखेला करण्याची घोषणा केली आहे.   

या मागणीवर ठाम आहेत शेतकरी 

कृषी कायदे मागे घेतल्यानंतर आता शेतकरी एमएसपी कायदा, आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे मागे घेणे आणि आंदोलनादरम्यान मरण पावलेल्या 700 शेतकऱ्यांच्या कुटुंबांना नुकसान भरपाई देण्याची मागणी आहे. शेतकऱ्यांनी तर आता आपल्या मागण्या समोर ठेवल्या आहेत. परंतु, सर्वांचे लक्ष आता सरकारी आमंत्रणावर आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, सरकारही या मागण्यांवर लवकरात-लवकर चर्चा करण्यास तयार आहे. त्यासाठी शेतकरी नेत्यांना फोनही करण्यात आले आहेत. सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करणार का आणि शेतकरी एवढ्या दीर्घ काळापासून सुरू असलेले आंदोलन मागे घेणार का हे मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे. 

एमएसपी म्हणजे काय आणि त्याची गरज का आहे?

शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक वर्षांपासून एमएसपी म्हणजे किमान आधारभूत किंमत ही व्यवस्था सुरू आहे. केंद्र सरकार पिकांसाठी एक किमान दर ठरवते. यालाच हमीभाव देखील म्हणतात. समजा शेतकऱ्यांच्या पिकांचे दर बाजारात कोसळले तरी, केंद्र सरकार या दराने ते उत्पादन शेतकऱ्यांकडून खरेदी करते. शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी ही यंत्रणा आहे. त्यांच्यासाठी ही एक सामाजिक सुरक्षा आहे. 60 च्या दशकात सरकारने अन्नधान्याची कमतरता कमी करण्यासाठी सर्वांत आधी एमएसपी द्यायला सुरुवात केली होती. सरकारला गहू खरेदी करून पीडीएस योजनेंतर्गत गरीबांमध्ये वाटण्यासाठी ती सुरू करण्यात आली होती. 

संबंधित बातम्या 

Farmers Protest : आंदोलनात मृत शेतकऱ्यांना मदत नाही; केंद्र सरकार म्हणतंय आकडेवारीच नाही

One Year of Farmers Protest : ऊन, वारा, पाऊस अन् लाठीचार्ज, तरीही निर्धार ठाम; बळीराजाच्या आंदोलनाचं एक वर्ष!

महत्त्वाच्या बातम्या

Honey Trap : नेत्यांना 'हनी ट्रॅप'मध्ये फसवण्याचा डाव उघड, 'जैश ए मोहम्मद'च्या दहशतवाद्याची गर्लफ्रेंड अर्पिता सरकारला अटक
नेत्यांना 'हनी ट्रॅप'मध्ये फसवण्याचा डाव उघड, 'जैश ए मोहम्मद'च्या दहशतवाद्याची गर्लफ्रेंड अर्पिता सरकारला अटक
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Amit Shah On Ajit Doval Pune: अमित शाहांकडून अजित डोवाल यांचं तोंडभरून कौतुक, पंतप्रधान मोदींनी दिलेला महत्वाचा सल्ला आणि पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला
अमित शाहांकडून अजित डोवाल यांचं तोंडभरून कौतुक, पंतप्रधान मोदींनी दिलेला महत्वाचा सल्ला आणि पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला

व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Embed widget