Famous Temples in India : भारतातील प्रसिद्ध 15 मंदिरं; वैविध्यता, परंपरा आणि संस्कृतीचं प्रतिक
Famous Temples to Visit in India : भारतातील प्रसिद्ध प्राचीन मंदिरं परंपरा, पुरातन साहित्य, कला आणि स्थापत्याची उत्तम उदाहरण आहेत. आज आम्ही तुम्हाला भारतातील काही प्रसिद्ध मंदिरांबाबत सांगणार आहोत.
Famous Temples to Visit in India : भारत हा वैविध्यतेने नटलेला देश आहे. भारताला सुंदर निसर्गाचा वारसा आणि प्राचीन परंपरांचा इतिहास आहे. भारतात अनेक प्रसिद्ध प्राचीन मंदिरं आहेत. देशातील प्रसिद्ध प्राचीन मंदिरं परंपरा, पुरातन साहित्य, कला आणि स्थापत्याची उत्तम उदाहरण आहेत. आज आम्ही तुम्हाला भारतातील काही प्रसिद्ध मंदिरांबाबत सांगणार आहोत. तुम्ही या मंदिरांमध्ये किमान एकदा तरी जायलाच हवं. ही मंदिरं भारताच्या वैविध्यपूर्ण परंपरेचं प्रतिक आहे. चला तर जाणून घ्या. भारतातील 15 प्रसिद्ध मंदिरांबाबत...
केदारनाथ मंदिर, उत्तराखंड
उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील केदारनाथ हे प्रसिद्ध प्राचीन मंदिर आहे. हे पवित्र हिंदू मंदिरांपैकी एक आहे. हे मंदिर 12 ज्योर्तिलिंगापैकी एक आहे. केदारनाथ मंदिर भगवान शंकराचं मंदिर आहे.
वैष्णवदेवी, जम्मू
त्रिकुट पर्वतरांगांमध्ये स्थित वैष्णव देवी मंदिर पवित्र आणि प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. वैष्णव देवी मंदिर हिंदू धर्मीयांचं श्रद्धास्थान आहे. हे मंदिर 'माता रानी' नावानं प्रसिद्ध आहे. यासाठी 13 किमी पायी प्रवास करत गुफेत जावं लागतं. हे मंदिर 108 शक्तिपीठांपैकी एक आहे.
अमरनाथ, काश्मीर
जम्मू आणि काश्मीरमधील अमरनाथ गुहा हे भगवान शंकराच्या प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. अमरनाथ गुहा जगभरातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे. वर्षभर ही गुहा प्रचंड बर्फामुळे झाकलेली असते. उन्हाळ्यात हा बर्फ वितळल्यानंतर ही गुफा काही काळ भाविकांसाठी खुली केली जाते. अमरनाथ यात्रेसाठी जगभरातून लाखोंच्या संख्येनं भाविक येथे दाखल होतात. विशेष म्हणजे हिंदू आणि मुस्लिम भाविकांची येथे गर्दी असते.
सुवर्ण मंदिर, अमृतसर
भारतातील सर्वात प्रसिद्ध मंदिरांपैकी एक म्हणजे सुवर्ण मंदिर. हे शीख धर्मातील सर्वात पवित्र मंदिर असून 'श्री हरमंदिर साहिब' नावानंही प्रसिद्ध आहे. अनेक श्रद्धाळू येथे त्यांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी येतात. या मंदिरातील पवित्र अमृत सरोवरात स्नान केल्याने माणसाचे सर्व रोग दूर होतात, असा भाविकांचा समज आहे.
सिद्धिविनायक मंदिर, मुंबई
सिद्धिविनायक मंदिर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध गणपती मंदिर आहे. हे मंदिर मुंबईतील प्रभादेवीमधील आहे. येथील गणेशाची मूर्ती स्वयंभू असल्याचं मानलं जातं. हे मुंबईतील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे आणि या मंदिराला दररोज भाविक मोठ्या संख्येनं भेट देतात.
श्री साईबाबा मंदिर, शिर्डी
महाराष्ट्राच्या शिर्डीतील श्री साईबाबा मंदिर संस्थान मंदिर लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे. श्री साईबाबा यांनी आजन्म लोकांची सेवा करत अनेकांचं जीवन बदललं. येथे साईबाबांचं हे मंदिर शिर्डी साईबाबा मंदिर या नावानंही ओळखलं जातं. शिर्डी एक महत्त्वाचं धार्मिक स्थळ आहे.
भीमाशंकर मंदिर, पुणे
भीमाशंकर मंदिर हे महाराष्ट्रातील पुण्याजवळील एक हिंदू धर्मीयांचं मंदिर आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या कुशीत वसलेले हे मंदिर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक प्रसिद्ध ज्योतिर्लिंग आहे. भगवान शंकराचं हे पवित्र मंदिर नागा शैलीतील वास्तुकलेचं उत्तम उदाहरण आहे.
शनि शिंगणापूर, महाराष्ट्र
अहमदनगर जिल्ह्यातील शनि शिगणापूर मंदिर हे शनिदेवाचं प्रसिद्ध मंदिर आहे. हे मंदिर स्वयंभू आहे. येथील लोकांचा असा विश्वास आहे की, शनी देव चोरांपासून त्यांच्या मौल्यवान वस्तूंचं रक्षण करतात. त्यामुळे या गावातील एकाही घराला दरवाजे आणि कुलूप नाहीत.
काशी विश्वनाथ मंदिर, वाराणसी
काशी विश्वनाथ मंदिर हे भगवान शंकराचं सर्वात लोकप्रिय हिंदू मंदिरांपैकी एक आहे. हे मंदिर पवित्र गंगा नदीच्या पश्चिम तीरावर वसलेलं आहे. भगवान शंकराला 'विश्वनाथ' किंवा 'विश्वेश्वर' असंही संबोधलं जातं. याचा अर्थ 'विश्वाचा शासक' असा आहे. काशी विश्वनाथ मंदिर ज्योतिर्लिंगांपैकी बारावं तीर्थक्षेत्र आहे.
इस्कॉन मंदिर, दिल्ली
दिल्लीतील इस्कॉन मंदिर 'हरे रामा हरे कृष्ण मंदिर' या नावानं प्रसिद्ध आहे. हे भगवान कृष्णाचं मंदिर आहे. इस्कॉन मंदिरात एक संग्रहालय देखील आहे. येथे रामायण आणि महाभारत सारख्या महान महाकाव्यांचे प्रदर्शनी आहेत. येथे जन्माष्टमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
लोटस टेंपल, नवी दिल्ली
दिल्लीतील लोटस टेंपल बहाई धर्म उपासना मंदिर आहे. या मंदिराची संरचना एका भव्य कमळाच्या फुलाच्या रुपात आहे. हे जगातील सर्वाधिक प्रसिद्ध पर्यटनस्थळांपैकी एक आहे. हे मंदिर अप्रतिम वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे.
प्रेम मंदिर, वृंदावन
उत्तर प्रदेशातील वृंदावन येथील प्रेम मंदिर हे भव्य मंदिर भारतातील प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. या मंदिरात राधा-कृष्णाची पूजा केली जाते. हे मंदिर संगमरवराने बनलं आहे.