Street Food: 1000 रुपयांचा 'वेज गोल्ड बर्गर'; 5 मिनिटांत खाल्ला तर फ्री, भारतातील 'या' शहरातील भन्नाट ऑफर
भारतातील विविध राज्यांमध्ये विविध प्रकारचं स्ट्रीट फूड मिळतं. प्रत्येक स्ट्रीट फूडची एक वेगळी विशेष गोष्ट असते. अशाच एका खास बर्गरबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
Veg Gold Burger : अनेकांना घरच्या खाण्यापेत्रा बाहेरचं स्ट्रीट फूड फार आवडतं. त्यामुळे भारतात फास्ट फूडचा व्यवसाय तुफान चालतो. भारतातील विविध राज्यांमध्ये विविध प्रकारचं स्ट्रीट फूड मिळतं. प्रत्येक स्ट्रीट फूडची एक वेगळी विशेष गोष्ट असतं. अशाच एका खास बर्गरबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आता बर्गर म्हटलंकी अगदी 30-40 रुपयांपासूनही मिळतो. तर महागड्या ठिकाणी महाग बर्गर असतो. पण पंजाबच्या एका शहरात रस्त्यावर विकण्यात येणाऱ्या बर्गरची किंमत तब्बल 1000 रुपये आहे. 'वेज गोल्ड बर्गर' असं नाव असलेल्या या बर्गरमध्ये नेमकं काय खास आहे पाहूया...
तर हा प्रसिद्ध बर्गर 'बाबा जी बर्गर वाले' याच्याकडे मिळतो. पंजाबच्या लुधियाना शहरात मिळणाऱ्या या बर्गरची गोष्टच वेगळी आहे. विशेष म्हणजे या बर्गरवर सोन्याचा वर्ख करण्यात आलेला असतो. त्यामुळेच या बर्गरची किंमत तब्बल 1 हजार रुपये इतकी असून नावही 'वेज गोल्ड बर्गर' असं आहे.
5 मिनिटांत संपवल्यास पैसे द्यावे लागणार नाहीत
तर या महागड्या बर्गरला तुम्ही मोफतही खाऊ शकता. फक्त एक अट असणार आहे, ती म्हणजे हा संपूर्ण बर्गर 299 सेकंदात अर्थात 5 मिनिटांच्या आत संपवणं गरजेचं आहे. असे केल्यास तुम्ही 999/- रुपये वाचवू शकता. दरम्यान या बर्गरची लुधियानामध्ये बरीच चर्चा असून आता देशातही हा बर्गर प्रसिद्ध होत आहे. या बर्गरचा एक स्पेशल व्हिडीओही व्हायरल होत आहे. हा बर्गर शेफ बाबाजी हे बनवत असून त्यांनीच ही भन्नाट ऑफरही ठेवली आहे.
हा पाहा व्हिडीओ
हे देखील वाचा-
- PM Modi : पंतप्रधान मोदींनी 25 हजार साधूंना का पत्र लिहलंय? काय आहे त्यामागचं कारण?
- Viral Video of Bike Cycle: पेट्रोलच्या वाढत्या किंमतीला कंटाळून एका व्यक्तीने लढवली अनोखी शक्कल, पाहा व्हायरल व्हिडिओ
- Kareena Kapoor : सोशल मीडियावर बायकॉट करिना कपूर हॅशटॅग ट्रेडिंग; 'रामायणा'मुळं महाभारत सुरु
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha