Kareena Kapoor : सोशल मीडियावर बायकॉट करिना कपूर हॅशटॅग ट्रेडिंग; 'रामायणा'मुळं महाभारत सुरु
रामायण या चित्रपटामुळे करिना कपूर खान (Kareena Kapoor) वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. सध्या सोशल मीडियावर बायकॉट करिना हा हॅशटॅघ ट्रेंड होत आहे. तसेच करिनाऐवजी ही भूमिका अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) ला देण्यात यावी अशी मागणीही नेटकऱ्यांकडून केली जात आहे.
![Kareena Kapoor : सोशल मीडियावर बायकॉट करिना कपूर हॅशटॅग ट्रेडिंग; 'रामायणा'मुळं महाभारत सुरु Boycott kareena kapoor khan is trending on twitter social media See Why its trending Kareena Kapoor : सोशल मीडियावर बायकॉट करिना कपूर हॅशटॅग ट्रेडिंग; 'रामायणा'मुळं महाभारत सुरु](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/09/c2870ddbb3674f0e87e7f6313f567147_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : सोशल मीडियावर सध्या अभिनेत्री करिना कपूर खानविरोधात संताप पाहायला मिळत आहे. याचं कारण म्हणजे, रामायण चित्रपट. रामायण चित्रपटातील सितेच्या भूमिकेवरुन सध्या सोशल मीडियावर महाभारत सुरु आहे. असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. या भूमिकेसाठी करिनानं तब्बल 12 कोटी रुपये मागितल्याची चर्चा आहे. तसेच, सुरुवातीला याच भूमिकेसाठी करिनानं 10 कोटी रुपये मानधन मागितलं होतं. निर्मात्यांनी ते देण्याची तयारीही दर्शवली होती. मात्र आता करिनानं आणखी दोन कोटी वाढवून 12 कोटी रुपयांची मागणी केली आहे. करिनानं जास्त पैशांची मागणी केल्यामुळं रामायण चित्रपट लांबणीवर गेलाय त्यामुळे आता नेटकरी संतापलेले आहेत. अशातच सोशल मीडियावर बायकॉट करिना हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. त्याचप्रमाणे करिनाला चित्रपटातून काढून तिच्याजागी हिंदू अभिनेत्री घ्या, असा आग्रहदेखील नेटकऱ्यांचा आहे.
रामायण या चित्रपटामुळे करिना कपूर खान वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. यामागे दोन कारणं आहेत. एक म्हणजे, हा चित्रपट बिग बजेट चित्रपट आहे. अलौकिक देसाई हे त्याचे दिग्दर्शक आहे. तसेच बाहुबली या स्टारर चित्रपटाचे लेखक के. विजयप्रसाद हे या चित्रपटाचे लेखक आहेत. या चित्रपटासाठी करिनानं 12 कोटींची मागणी केली असल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी आलं होतं. त्यानंतर या वादाला तोंड फुटलं आहे. अशातच करिना कपूर खान ही दोन मुलांची आई आहे, तिला या चित्रपटात सितेची भूमिका कशी मिळू शकते? असा सवाल संतप्त नेटकऱ्यांकडून केला जात आहे. त्यामुळे बायकॉट करिना हा हॅशटॅगही ट्रेंडमध्ये आहे.
पाहा व्हिडीओ : रामायण चित्रपटातील सीतेच्या भूमिकेवरुन सोशल मीडियावर 'महाभारत'; बॉयकॉट करीना हॅशटॅग ट्रेंडिंग
करिना कपूर खान वादाच्या भोवऱ्यात सापडण्याचं दुसरं जे कारण आहे. ते धार्मिक कारण आहे. करिना कपूरनं एका मुस्लिम व्यक्तीशी लग्न केलेलं आहे. त्यामुळे एका हिंदू देवतेची भूमिका करिना कपूर खानला कशी मिळू शकते, असा सव्ला एका नेटकऱ्यानं उपस्थित केला आहे. तसेच या चित्रपटासाठी कंगना रनौत ही अभिनेत्रीच योग्य आहे. त्यामुळे ही भूमिका कंगनालाच द्या, अशी मागणीही काही नेटकऱ्यांनी केली आहे. या सर्व कारणांमुळे करिना कपूर खान सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
दरम्यान, सोशल मीडियात चित्रपटावरुन उसळलेल्या वेगवेगळ्या मतप्रवाहांबाबत निर्मात्यांनी अद्याप अधिकृतपणे काहीच जाहीर केलेलं नाही. तसेच करिना कपूर आणि कंगनानंही यासंदर्भात कोणतचं वक्तव्य केलेलं नाही. त्यामुळे हा वाद पुढे जाऊन कोणतं वळण घेणार आणि यासंदर्भात निर्माते आणि अभिनेत्री करिना कपूर खानची भूमिका काय असणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)