एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Chandrababu Naidu Arrest: आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंना पहाटेच तडकाफडकी अटक, मुलालाही घेतलंय ताब्यात, नेमकं प्रकरण काय?

Chandrababu Naidu Arrest: आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना अटक करण्यासाठी पहाटे 3 वाजता नायडूंच्या नांदयाल येथे मोठ्या संख्येनं पोलीस दल पोहोचलं होतं.

Chandrababu Naidu Arrested: आंध्र प्रदेशचे (Andhra Pradesh) माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू (Ex Andhra Chief Minister Chandrababu Naidu) यांना आज पहाटे अटक करण्यात आली आहे. स्किल डेव्हलपमेंट कॉरपोरेशनमध्ये घोटाळा (Skill Development Scam Case) केल्याचा नायडू यांच्यावर आरोप आहे. आंध्र प्रदेशमधील नंदयाला इथून सीआयडीनं अटक केली, तर त्यांचा मुलगा नारा लोकेश याला देखील पूर्व गोदावरी जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे.

तेलगू देसम पक्षाचे (TDP) प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांना अटक करण्यात आली आहे. टीडीपीनं याबाबत माहिती दिली आहे. भ्रष्टाचार प्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागानं (CID) नायडू यांच्यावर शनिवारी (9 सप्टेंबर) सकाळी कारवाई केली. नायडू यांच्यावर 2021 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. नंदयाल शहरातील आरके फंक्शन हॉलमध्ये असलेल्या कॅम्पमध्ये विश्रांती घेत असताना नायडू यांना पहाटे 3 वाजता नांदयाल येथून अटक करण्यात आली. त्याला अटक करण्यासाठी डीआयजी रघुरामी रेड्डी आणि नंदयाल रेंजचे सीआयडी यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलीस फौजफाटा नांदयाल येथील आरके फंक्शन हॉल परिसरात दाखल झाला होता.

चंद्राबाबू नायडू यांनी शुक्रवारी आपल्या दौऱ्यादरम्यान नंदयाल जिल्ह्यातील बनागनपल्ली येथे जाहीर सभेला संबोधित केलं होतं. जाहीर भाषणानंतर नायडू आपल्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये आराम करत होते. शनिवारी पहाटे 3.30 च्या सुमारास, नायडू यांना अटक करण्यासाठी एपी सीआयडी त्यांच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये आले, परंतु पक्षाचे कार्यकर्ते आणि नेत्यांनी वाहनाला घेराव घातला आणि आंध्र प्रदेश सीआयडीला चंद्राबाबूंना अटक करू दिली नाही.

टीडीपी कार्यकर्त्यांचा पोलिसांशी वाद अन् अखेर अटक 

चंद्राबाबूंच्या टीडीपीचे नेते, कार्यकर्ते आणि आंध्रप्रदेश सीआयडी पोलिसांमध्ये जोरदार वादावादी झाली. त्यानंतर सकाळी 6 च्या सुमारास चंद्राबाबू नायडू व्हॅनमधून खाली उतरले आणि त्यांनी पोलिसांशी चर्चा केली. त्याच्या अटकेसाठी 51CrPC अंतर्गत नोटीस जारी करण्यात आली होती. नायडू यांनी या प्रकरणाचा तपशील मागितला. मात्र पोलिसांनी माननीय न्यायालयासमोर तपशील सादर केल्याचं सांगत तपशील देण्यास नकार दिला. नायडू यांची चौकशी केल्यानंतर या प्रकरणाची सविस्तर माहिती आणि रिमांड अहवाल देण्यात येईल, असं पोलिसांनी सांगितलं. नायडू यांनी पोलिसांना सहकार्य करण्याचं मान्य केलं. अखेर पोलिसांनी चंद्राबाबू नायडू यांच्यावर अटकेची कारवाई केली. 

नायडू यांचा मुलगा नारा लोकेशही ताब्यात

चंद्राबाबू नायडू यांचा मुलगा आणि टीडीपी नेते नारा लोकेश यांना पूर्व गोदावरी जिल्ह्यात पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. टीडीपीनं आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर लोकेशचा व्हिडीओ देखील जारी केला आहे. या व्हिडीओमध्ये पोलिसांनी म्हटलं आहे की, ते (लोकेश) चंद्राबाबू नायडूंना भेटू शकत नाही.

कोणत्या प्रकरणात चंद्राबाबूंना अटक?

कौशल विकास घोटाळ्यात चंद्राबाबू नायडू यांना आरोपी 1 म्हणून नाव देण्यात आलं आहे, ज्यात 250 कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. पोलीस अधिकार्‍यांनी चंद्राबाबू नायडू यांच्या वकिलांना कौशल विकास प्रकरणात आंध्रप्रदेश उच्च न्यायालयानं जारी केलेल्या एफआयआर प्रत आणि इतर आदेशांची माहिती दिली आहे. दरम्यान, चंद्राबाबू नायडू आणि त्यांच्या वकिलांनी त्यांच्या नावाचा एफआयआर अहवालात उल्लेख नसल्याचं सांगत तपास अधिकार्‍यांना प्रथमदर्शनी पुरावे देण्याची विनंती केली आहे. 

माजी मुख्यमंत्र्यांनी सीआयडी अधिकाऱ्यांना प्रश्न केला की, या प्रकरणातील त्यांच्या सहभागाबाबत कोणतीही माहिती न देता त्यांना अटक कशी केली जाऊ शकते? असं असलं तरी, अटक हा तपास प्रक्रियेचा प्राथमिक टप्पा असून, 24 तासांत रिमांड रिपोर्टमध्ये सर्व तपशील देण्यात येतील, असं पोलिसांनी सांगितलं आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'हेही सरकार मराठ्यांच्या जीवावर..' विधानसभेच्या निकालानंतर मनोज जरांगे म्हणाले,'आमच्याशी बेईमानी कराल तर..'
'हेही सरकार मराठ्यांच्या जीवावर..' विधानसभेच्या निकालानंतर मनोज जरांगे म्हणाले,'आमच्याशी बेईमानी कराल तर..'
Eknath Shinde Shivsena : सीएम एकनाथ शिंदे यांनी चॅलेंज देऊनही पराभूत! व्हाया सुरत गुवाहाटीला गेलेल्या पाच आमदारांना पराभवाचा दणका, ते पाच आमदार कोण?
सीएम एकनाथ शिंदे यांनी चॅलेंज देऊनही पराभूत! व्हाया सुरत गुवाहाटीला गेलेल्या पाच आमदारांना पराभवाचा दणका, ते पाच आमदार कोण?
मोठी बातमी: महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला समोर, भाजप-शिंदे गट अन् अजितदादांच्या वाट्याला किती मंत्रीपदं?
महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला समोर, भाजप-शिंदे गट अन् अजितदादांच्या वाट्याला किती मंत्रीपदं?
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : निवडणूक आयोग आज राज्यपालांच्या भेटीला, 15 वी विधानसभा अस्तित्वात येणार, सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग
निवडणूक आयोग आज राज्यपालांच्या भेटीला, 15 वी विधानसभा अस्तित्वात येणार, सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amol Mitkari Full PC : जयंत पाटलांबाबत वाईट वाटतं; प्रमाणपत्र घ्यायलाही गेले नाहीत - अमोल मिटकरीSunil Tatkare On Ajit Pawar : अजित पर्वावर जनतेचं शिक्कामोर्तब  - सुनिल तटकरेSanjay Raut Full PC : महाराष्ट्राऐवजी गुजरातमध्येच शपथविधी घ्यावा - संजय राऊतLata Shinde On Election : महायुती जिंकली, गोडा-धोडाचं जेवण करणार; मिसेस मुख्यमंत्र्यांचं सेलिब्रेशन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'हेही सरकार मराठ्यांच्या जीवावर..' विधानसभेच्या निकालानंतर मनोज जरांगे म्हणाले,'आमच्याशी बेईमानी कराल तर..'
'हेही सरकार मराठ्यांच्या जीवावर..' विधानसभेच्या निकालानंतर मनोज जरांगे म्हणाले,'आमच्याशी बेईमानी कराल तर..'
Eknath Shinde Shivsena : सीएम एकनाथ शिंदे यांनी चॅलेंज देऊनही पराभूत! व्हाया सुरत गुवाहाटीला गेलेल्या पाच आमदारांना पराभवाचा दणका, ते पाच आमदार कोण?
सीएम एकनाथ शिंदे यांनी चॅलेंज देऊनही पराभूत! व्हाया सुरत गुवाहाटीला गेलेल्या पाच आमदारांना पराभवाचा दणका, ते पाच आमदार कोण?
मोठी बातमी: महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला समोर, भाजप-शिंदे गट अन् अजितदादांच्या वाट्याला किती मंत्रीपदं?
महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला समोर, भाजप-शिंदे गट अन् अजितदादांच्या वाट्याला किती मंत्रीपदं?
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : निवडणूक आयोग आज राज्यपालांच्या भेटीला, 15 वी विधानसभा अस्तित्वात येणार, सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग
निवडणूक आयोग आज राज्यपालांच्या भेटीला, 15 वी विधानसभा अस्तित्वात येणार, सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग
Praniti Shinde : स्वत:च्या मतदारसंघात काँग्रेसचा दारुण पराभव अन् ठाकरेंचा उमेदवार डावलून ज्याला पाठिंबा दिला त्याचं डिपाॅझिट सुद्धा जप्त; 'खासदार' प्रणिती शिंदेंनी मिळवलं तरी काय?
स्वत:च्या मतदारसंघात काँग्रेसचा दारुण पराभव अन् ठाकरेंचा उमेदवार डावलून ज्याला पाठिंबा दिला त्याचं डिपाॅझिट सुद्धा जप्त; 'खासदार' प्रणिती शिंदेंनी मिळवलं तरी काय?
Maharashtra Vidhan Sabha Election result 2024: काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मतं, जागा फक्त 16, अजितदादांचा स्ट्राईकरेट शरद पवारांपेक्षा भारी, जाणून घ्या आकड्यांचा खेळ अन् जागांचा मेळ!
काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मतं, 80 लाख मतं मिळूनही फक्त 16 जागाच जिंकल्या, नेमकं काय घडलं?
Sanjay Raut : विधानसभा निवडणुकीत इतका मोठा पराभव कसा झाला? संजय राऊतांनी सांगितलं महत्त्वाचं कारण; म्हणाले...
विधानसभा निवडणुकीत इतका मोठा पराभव कसा झाला? संजय राऊतांनी सांगितलं महत्त्वाचं कारण; म्हणाले...
सोलापूर जिल्ह्याने शरद पवारांची इभ्रत वाचवली, कोणत्या चार मतदारसंघांत तुतारी निनादली
सोलापूर जिल्ह्याने शरद पवारांची इभ्रत वाचवली, कोणत्या चार मतदारसंघांत तुतारी निनादली?
Embed widget