MDMK leader A Ganeshamurthi Died : लोकसभेला उमेदवारी न मिळाल्याने विष प्राशन केलेल्या खासदाराचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ
रुमलार्ची द्रविड मुन्नेत्र कळघम Marumalarchi Dravida Munnetra Kazhagam (MDMK) नेते ए गणेशमूर्ती (A Ganeshamurthi) यांचे आज कथित आत्महत्येच्या प्रयत्नानंतर निधन झाले.
इरोड (तमिळनाडू) : लोकसभेसाठी निवडणूक (Loksabha Election 2024) कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर रणधुमाळी सुरु झाली आहे. सर्वच पक्षातील नेत्यांकडून निष्ठावंतांना डावलून आयारामांना पायघड्या घातल्या जात आहेत. त्यामुळे तिकिट नाकारण्यात आल्यानंतर बंडखोरीसह पक्षांतर सुद्धा होत आहे. मात्र, तमिळनाडूमध्ये (Tamil Nadu) भलताच प्रकार समोर आला आहे. तमिळनाडमधील इरोडचे खासदार आणि मारुमलार्ची द्रविड मुन्नेत्र कळघम Marumalarchi Dravida Munnetra Kazhagam (MDMK) नेते ए गणेशमूर्ती (A Ganeshamurthi) यांचे आज (28 मार्च) पहाटे कोईम्बतूर येथील एका खासगी रुग्णालयात कथित आत्महत्येच्या प्रयत्नानंतर निधन झाले. ते 77 वर्षांचे होते.
लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी नाकारण्यात आली
जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ए गणेशमूर्ती यांची राजकीय कारकीर्द दीर्घकाळ होती. त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्यामुळे त्यांना नैराश्य आले होते. गणेशमूर्ती यांनी 24 मार्च रोजी इरोड येथील पेरियार नगर येथील राहत्या घरी आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांना बेशुद्धावस्थेत आढळून आल्यावर कुटुंबीयांनी स्थानिक खासगी रुग्णालयात दाखल केले, तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. नंतर, त्यांना कोईम्बतूर येथील कोवई मेडिकल सेंटर अँड हॉस्पिटल (KMCH) मध्ये हलवण्यात आले. उपचार सुरु असताना त्यांचे निधन झाले.
पक्षाकडून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारीचा शब्द
तामिळनाडूचे गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्री एस मुथुसामी, मोदकुरिचीचे आमदार सी सरस्वती, माजी मंत्री के व्ही रामलिंगम आणि एमडीएमकेचे सरचिटणीस वायको हे रुग्णालयात त्यांना भेटण्यासाठी गेले होते. एमडीएमकेच्या सूत्रांनी सांगितले की, गणेशमूर्ती, तीन वेळा लोकसभेचे खासदार, त्यांना 2026 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी त्यांचा विचार केला जाईल, अशी माहिती देण्यात आली होती. “परंतु यावेळी तिकीट नाकारल्याने ते प्रचंड नाराज होते. यामधून त्यांना गंभीर त्रास झाल्याचे एमडीएमके नेत्याने सांगितले.
गणेशमूर्ती यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी इरोड येथील पेरुंडुराई येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आला. त्यांचे पार्थिव त्यांच्या गावी सार्वजनिक श्रद्धांजलीसाठी ठेवण्यात येणार आहे. गणेशमूर्ती यांच्या कथित आत्महत्येच्या प्रयत्नाला कारणीभूत असलेल्या परिस्थितीचा स्थानिक पोलीस तपास करत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या