एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पीएफवरील व्याज दरात घट
बंगळुरु : कर्मचारी भविष्य निधी संघटनेचे (EPFO) निर्णय घेणारी शिखर संस्था म्हणजेच केंद्रीय विश्वस्त मंडळाने (CBT) व्याज दरात घट केली आहे. ईपीएफओने 2016-17 साठी भविष्य निधी ठेवींवर 8.65 टक्के व्याज जाहीर केला आहे.
गेल्या आर्थिक वर्षात (2015-16) भविष्य निधीवर ईपीएफओचे व्याज दर 8.8 टक्के होतं. ईपीएफओच्या शेअरहोल्डर्सची संख्या 4 कोटींहून अधिक आहे.
यापूर्वी अर्थमंत्रालयाने 2015-16 या आर्थिक वर्षसाठी ईपीएफवरील व्याज दर कमी करुन 8.7 टक्के केलं होतं. मात्र, कामगार मंत्र्यांच्या नेतृत्त्वातील केंद्रीय विश्वस्त मंडळाने (CBT) 8.8 टक्के व्याजाला मंजुरी दिली होती. ट्रेड युनियनच्या विरोधानंतर केंद्र सरकारने आपला निर्णय मागे घेतला होता आणि शेअरहोल्डर्सना 8.8 टक्के व्याज देण्यास सहमती दर्शवली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
निवडणूक
भविष्य
निवडणूक
Advertisement