Engineer’s day in India 2023 : 15 सप्टेंबरलाच का साजरा केला जातो 'अभियंता दिन'? वाचा यामगचा रंजक इतिहास
Engineer’s day in India 2023 : डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांची जयंती भारत सरकारने 1968 साली 'अभियंता दिन' म्हणून घोषित केली होती.
Engineer’s day in India 2023 : दरवर्षी 15 सप्टेंबर हा दिवस भारतात 'अभियंता दिन' म्हणून साजरा केला जातो. खरंतर, हा दिवस भारताचे महान अभियंता आणि भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिन आहे. ते भारतातील महान अभियंत्यांपैकी एक होते. त्यांनी आधुनिक भारताची निर्मिती करून देशाला नवे रूप दिले. देशभरात बांधलेली अनेक नदीवरील धरणे आणि पूल यशस्वी करण्यात विश्वेश्वरय्या यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्यामुळेच देशातील पाण्याचा प्रश्न सुटला.
अभियंता दिनाचा इतिहास :
डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांची जयंती भारत सरकारने 1968 साली 'अभियंता दिन' म्हणून घोषित केली होती. तेव्हापासून दरवर्षी 15 सप्टेंबरला अभियंता दिन साजरा केला जातो. खरंतर, विश्वेश्वरयांचा जन्म 15 सप्टेंबर 1860 रोजी म्हैसूर (कर्नाटक) येथील कोलार जिल्ह्यात झाला.
एक अभियंता म्हणून डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांनी देशात अनेक धरणे बांधली आहेत, त्यापैकी म्हैसूरमधील कृष्णराजा सागर धरण, पुण्यातील खडकवासला जलाशय धरण आणि ग्वाल्हेरमधील टिग्रा धरण हे महत्त्वाचे आहेत. एवढेच नव्हे तर, हैदराबाद शहराच्या उभारणीचे संपूर्ण श्रेय डॉ. विश्वेश्वरय्या यांना जाते. त्यांनी तेथे पूर संरक्षण यंत्रणा तयार केली, त्यानंतर ते भारतभर प्रसिद्ध झाले. विशाखापट्टणम बंदराचे सागरी धूप होण्यापासून संरक्षण करणारी यंत्रणा विकसित करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.
विश्वेश्वरय्या यांना आधुनिक म्हैसूर राज्याचे जनक देखील म्हटले जाते. त्यांनी म्हैसूर सरकारच्या सहकार्याने अनेक कारखाने आणि शैक्षणिक संस्था स्थापन केल्या, ज्यात म्हैसूर साबण कारखाना, म्हैसूर लोह आणि पोलाद कारखाना, स्टेट बँक ऑफ म्हैसूर, म्हैसूर चेंबर्स ऑफ कॉमर्स आणि विश्वेश्वरय्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांचा समावेश आहे.
भारताव्यतिरिक्त 'या' देशांमध्ये अभियंता दिन साजरा केला जातो.
अभियंता दिन केवळ भारतातच साजरा केला जात नाही तर इतर अनेक देशांमध्येही हा दिवस साजरा केला जातो. यामध्ये, अर्जेंटिनामध्ये 16 जून, बांगलादेशात 7 मे, इटलीमध्ये 15 जून, तुर्कीमध्ये 5 डिसेंबर, इराणमध्ये 24 फेब्रुवारी, बेल्जियममध्ये 20 मार्च आणि रोमानियामध्ये 14 सप्टेंबरला तो अभियंता दिन म्हणून साजरा करण्यात आला. जातो. वास्तविक, हा दिवस जगभरातील अभियंत्यांना प्रोत्साहन देण्यासाठी साजरा केला जातो, जेणेकरून ते आपल्या कौशल्याच्या जोरावर देशाला आणि जगाला प्रगतीच्या नव्या मार्गावर घेऊन जातील.
महत्त्वाच्या बातम्या :