(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Electoral Bonds : भाजपला 6986 कोटींची देणगी, काँग्रेस तिसऱ्या स्थानी, कोणत्या पक्षाला किती रक्कम मिळाली? निवडणूक आयोगाकडून इलेक्टोरल बाँडची माहिती जारी
Electoral Bonds : केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक रोख्यांची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार निवडणूक रोखे वटवत भाजपने तब्बल 6 हजार 986 कोटींची कमाई केली आहे.
Electoral Bonds : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) निवडणूक रोख्यांची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार निवडणूक रोखे वटवत भाजपने (BJP) तब्बल 6 हजार 986 कोटींची कमाई केली आहे. 2019 - 2020 या काळात 2555 कोटी रुपयांची कमाई भाजपने केले आहे, अशी माहिती या रेकॉर्डमधून समोर येत आहे.
निवडणूक रोख्यांच्या (Electoral Bonds) निधीबाबत कोणत्या कंपनीने किती निधी दिला ते गुरूवारी जाहीर करण्यात आले होते. मात्र त्यात कोणत्या कंपनीने कोणत्या राजकीय पक्षाने किती निधी दिला हे मात्र स्पष्ट करण्यात आले नव्हते. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) निवडणूक आयोगाला विचारल्यानंतर निवडणूक आयोगाने एसबीआयकडे (SBI) बोट दाखवले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने एसबीआयला झापले होते.
आता निवडणूक आयोगाने कुठल्या पक्षाने किती निवडणूक रोखे वटवले याबाबत माहिती जारी केली आहे. त्यानुसार रोखे वटवत कमाई करणाऱ्या पक्षामध्ये भाजपने 6 हजार 986 कोटींची कमाई केली आहे. तृणमूल काँग्रेस (Trinamool Congress) दुसऱ्या स्थानी आहे. काँग्रेस हा तिसऱ्या क्रमांकावर असून 1334.35 कोटींची कमाई केली आहे. तामिळनाडूचा सत्ताधारी पक्ष डीएमकेला निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून 656.5 कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. यामध्ये लॉटरी किंग सँटियागो मार्टिनच्या फ्युचर गेमिंगच्या 509 कोटी रुपयांचाही समावेश आहे.
काँग्रेसने 1,334.35 कोटी रुपयांचे निवडणूक रोखे रोखले
देशातील प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसने 1,334.35 कोटी रुपयांचे निवडणूक रोखे रोखून धरले आहेत. याशिवाय, ओडिशाच्या सत्ताधारी बिजू जनता दलाला निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून 944.5 कोटी रुपये मिळाले आहेत. तर आंध्र प्रदेशचा सत्ताधारी पक्ष टीडीपीला 181.35 कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे.
कुठल्या पक्षाने किती निवडणूक रोखे वटवले?
भाजपा : 6 हजार 986.5 कोटी
तृणमूल काँग्रेस : 1387 कोटी
काँग्रेस : 1334.35 कोटी
डीएमके : 656.5 कोटी
बिजू जनता दल : 944.5 कोटी
वायएसआर काँग्रेस : 442.2 कोटी
तेलगू देसम : 181.35 कोटी
बीआरएस : 1322 कोटी
सपा : 14.05 कोटी
अकाली दल : 7.26 कोटी
AIADMK : 6.05
नॅशनल कॉन्फरन्स : 50 लाख
फ्यूचर गेमिंग इलेक्टोरल बाँड्सचा सर्वात मोठा खरेदीदार
लॉटरी किंग सँटियागो मार्टिनचे फ्यूचर गेमिंग हे 1,368 कोटींचे इलेक्टोरल बाँड्सचे सर्वात मोठे खरेदीदार होते, ज्यापैकी सुमारे 37 टक्के DMK कडे गेले. DMK ला इतर प्रमुख देणगीदारांमध्ये मेघा इंजिनिअरिंग 105 कोटी, इंडिया सिमेंट्स 14 कोटी आणि सन टीव्ही 100 कोटींचा समावेश आहे.
निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर इलेक्टोरल बाँड्सची माहिती
केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commssion of India) त्यांच्या वेबसाईटवर इलेक्टोरल बाँड्स (Electoral Bonds) संदर्भात एसबीआयने दिलेला डेटा अपलोड केला आहे. 12 एप्रिल 2019 पासून 24 जानेवारी 2024 पर्यंतचा हा डेटा आहे. त्यात 1 लाख, 10 लाख आणि 1 कोटी रूपयांचे व्यवहार दिसून येत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
मोठी बातमी! अरुणाचल, सिक्किम मतमोजणीची तारीख बदलली, पण यामागचं नेमकं कारण काय ?
मविआचं ठरलं! सांगलीची जागा ठाकरे गटच लढवणार, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील उमेदवार