Elections 2022 : 15 जानेवारीनंतरही रॅली, सभा, रोड शोवर येणार बंदी; आयोगाकडून लवकरच निर्णयाची शक्यता
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 15 जानेवारीपर्यंत रॅली, सभा, रोड शोवर निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. मात्र सध्या कोरोनाचा स्थिती पाहता 15 जानेवारीनंतर देखील ही बंदी कायम ठेवण्याची शक्यता आहे.
Election 2022 Guidelines : कोरोना महामारी आणि ओमायक्रॉन संकटामध्ये उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखांची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. मात्र 15 जानेवारीपर्यंत रॅली, सभा, रोड शो, साईकल आणि बाईक रॅलीवर निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. परंतु सध्या देशातील कोरोनाची परिस्थिती पाहता आयोग यावर 15 जानेवारीनंतर देखील ही बंदी कायम ठेवण्याची शक्यता आहे. आज संध्याकाळपर्यंत या विषयी निर्णय येण्याची शक्यता आहे.
कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगाने निर्बंध लागू केले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदानाचा कालावधी एक तासाने वाढण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. तसेच प्रचारादरम्यान कोरोना नियमांचं पालन करणे बंधनकारक असेल. 15 जानेवारीपर्यंत रॅली, सभा, रोड शो, साईकल आणि बाईक रॅलीवर निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. त्यानंतर कोरोनाची परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल, असे देखील म्हटले होते. त्यामुळे सध्या देशातील कोरोनाची परिस्थिती पाहता आयोगाकडून या संदर्भात निर्णय येण्याची शक्यता आहे.
तसेच निवडणूक आयोगाने सर्व पक्ष आणि उमेदवारांना डोअर टू डोअर प्रचारासाठी परवानगी दिली आहे. तसेच व्हर्च्युअल माध्यमातून उमेदवारांन प्रचार करता येणार आहे. काही पक्षांनी तर याची सुरुवात देखील केली आहे. परंतु उत्तरप्रदेशसारख्या राज्यात विना रॅली निवडणुकांचा प्रचार कसा होणार यासाठी काही पक्ष चिंतेत आहे.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या ही 12 लाख 72 हजार 73 एवढी आहे. तर आत्तापर्यंत कोरोनामुळे 4 लाख 85 हजार 350 जणांनी आपला जीव गमावला आहे. महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटक आणि केरळ या राज्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर काही निर्बंध देखील लावण्यात आलेले आहे.
संबधित बातम्या :
- Election 2022 Dates : पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर, UP मध्ये 7 टप्प्यात मतदान, 10 मार्चला निकाल
- Election Guidelines : ओमायक्रॉनचं संकट, त्यात 5 राज्यात निवडणुका, नो रॅली, नो सभा, गाईडलाईन्स नेमक्या काय?
- Assembly Election 2022 : पाच राज्यांच्या निवडणुका 2024 च्या दृष्टीनंही महत्त्वाच्या , कुठल्या पक्षासाठी कशी प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे?