Bihar Election Result: आतापर्यंत केवळ 20 टक्के मतमोजणी, निकाल स्पष्ट व्हायला उशीर : निवडणूक आयोग
Bihar Election : बिहार निवडणूक निकालाची आतापर्यंत केवळ 20 टक्के मतमोजणी झाली असून निकाल स्पष्ट व्हायला उशीर लागणार असल्याचं निवडणूक आयोगानं कळवलं आहे. 243 पैकी 43 जागा अशा आहेत जिथं दोन उमेदवारांच्या मतांमध्ये केवळ 1 हजार मतांचं किंवा त्यापेक्षा कमी अंतर आहे.
Bihar Election : बिहार निवडणूक निकालाची आतापर्यंत केवळ 20 टक्के मतमोजणी झाली असून निकाल स्पष्ट व्हायला उशीर लागणार असल्याचं निवडणूक आयोगानं कळवलं आहे. पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगानं सांगितलं आहे की, बिहार निवडणुकीत सुमारे 4.10 कोटी मतं पडली आहेत. त्यापैकी आतापर्यंत 92 लाख मते मोजली गेली आहेत. पूर्वी मतमोजणीच्या 25-26 फेऱ्यांचा वापर होता, यावेळी या फेऱ्यांची संख्या 35 वर गेली आहे. त्यामुळे मतमोजणी रात्री उशीरापर्यंत सुरू राहू शकते असं बिहारचे मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) एचआर श्रीनिवास यांनी सांगितलं आहे. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटनुसार आता सध्या 243 पैकी 43 जागा अशा आहेत जिथं दोन उमेदवारांच्या मतांमध्ये केवळ 1 हजार मतांचं किंवा त्यापेक्षा कमी अंतर आहे. 80 टक्के मतांची मोजणी अजून व्हायची आहे.
बिहारमध्ये नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्यासह 3733 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला आज होणार आहे. मागील 15 वर्षांपासून नितीश कुमार बिहारच्या मुख्यमंत्रीपदी कायम आहेत. कोरोना काळातील ही सर्वात मोठी निवडणूक आहे. नितीश कुमार पुन्हा सत्तेत येणार की तेजस्वी यादव विजय मिळवणार हे आज स्पष्ट होईल.ताज्या आकडेवारीनुसार आरजेडी, काँग्रेस महागठबंधन 106 जागांवर आघाडीवर तर भाजप आणि जेडीयू एनडीए 127 जागांवर आघाडीवर आहे. महागठबंधनमध्ये आरजेडी 66, काँग्रेस 21 जागांवर तर एनडीएमध्ये भाजप 74, जेडीयू 48, हम दोन जागांवर आघाडीवर आहेत तर 33 जागांवर इतर उमेदवार आघाडीवर आहेत.
राज्यात मतमोजणीसाठी 38 जिल्ह्यांमध्ये 55 मतमोजणी केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. या केंद्रात 414 हॉल बनवले आहेत. कोरोना काळात झालेली भारततील ही सर्वात मोठी निवडणूक आहे. यामुळं निवडणूक आयोगानं मतगणना केंद्रांची संख्या दीडपट वाढवली आहे. या सर्वांचा मेळ लावण्यासाठी अतिरिक्त वेळ लागू शकतो, हे आधीच स्पष्ट झालं होतं.
Bihar Election Results : कसं आणि कुठे पाहू शकाल बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल?
बिहार निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 16 जिल्ह्यांमध्ये 71 विधानसभा जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात 17 जिल्ह्यांतील 94 जागांसाठी आणि तिसऱ्या टप्प्यांत 15 जिल्ह्यांच्या 78 विधानसभा जागांसाठी मतदान पार पडलं. पहिल्या टप्प्यांतील मतदान 28 ऑक्टोबर रोजी, दुसऱ्या टप्प्यातील मतदान 3 नोव्हेंबर रोजी आणि तिसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान सात नोव्हेंबर रोजी पार पडलं.
नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्यासह 3733 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला आज होणार आहे. मागील 15 वर्षांपासून नितीश कुमार बिहारच्या मुख्यमंत्रीपदी कायम आहेत. कोरोना काळातील ही सर्वात मोठी निवडणूक आहे. नितीश कुमार पुन्हा सत्तेत येणार की तेजस्वी यादव विजय मिळवणार हे आज स्पष्ट होणार आहे.
Bihar Election Results | नितीश कुमार की तेजस्वी यादव, बिहार निवडणुकीचा आज निकाल!
बिहार राज्य निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार पूर्व चंपारण, सीवान, बेगुसराय आणि गयामध्ये प्रत्येकी तीन तर नालंदा, बांका, पूर्णिया, भागलपूर, दरभंगा, गोपालगंज, सहरसामध्ये प्रत्येकी दोन मतमोजणी केंद्र बनवले आहेत. निवडणूक आयोगानं सांगितलं की, मतगणना सुरुळीत पार पडावी यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी एच आर श्रीनिवास यांनी सांगितलं की, मतदान झाल्यानंतर ज्या स्ट्राँग रूममध्ये ईव्हीएम मशीन ठेवल्या होत्या तिथं देखील विषेश सुरक्षा लावण्यात आली होती.
Bihar Election Results LIVE: बिहार निवडणुकीच्या निकालाचे प्रत्येक अपडेट, पाहा एका क्लिकवर