Partha Chatterjee Arrested : ममता बॅनर्जींच्या सरकारमधील मंत्री पार्थ चॅटर्जी यांना ईडीकडून अटक, मित्रांकडून करोडो रुपयांची संपत्ती जप्त
Teacher Recruitment Scam : ममता बॅनर्जी यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री पार्थ चॅटर्जी यांना ईडीनं अटक केली आहे. शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी चॅटर्जी यांनी चौकशी सुरु होती. चौकशी झाल्यानंतर त्यांना ईडीनं अटक केली आहे.
![Partha Chatterjee Arrested : ममता बॅनर्जींच्या सरकारमधील मंत्री पार्थ चॅटर्जी यांना ईडीकडून अटक, मित्रांकडून करोडो रुपयांची संपत्ती जप्त ed arrests mamata banerjee minister partha chatterjee in teacher recruitment scam Partha Chatterjee Arrested : ममता बॅनर्जींच्या सरकारमधील मंत्री पार्थ चॅटर्जी यांना ईडीकडून अटक, मित्रांकडून करोडो रुपयांची संपत्ती जप्त](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/23/35dd7efb38ae50bcc4204818e5824af11658556324_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Teacher Recruitment Scam : सध्या देशातील विविध राज्यात ईडीकडून कारवाई केली जात आहे. पश्चिम बंगालमध्ये सुद्धा ईडीच्या अधिकाऱ्यांकडून कारवाईचं सत्र सुरु आहे. ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री पार्थ चॅटर्जी यांना ईडीनं अटक केली आहे. शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी चॅटर्जी यांनी चौकशी सुरु होती. चौकशी झाल्यानंतर त्यांना ईडीनं अटक केली आहे. तसेच ईडीने त्यांच्या जवळच्या मित्रांकडून करोडो रुपयांची रोकड आणि सोने जप्त केले आहे.
दरम्यान, 22 जुलै रोजी ईडीने पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जींच्या मंत्रीमंडळात मंत्री असणारे पार्थ चॅटर्जी यांच्या घरावर छापे टाकण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर ही छापेमारी सुरुच आहे. यामध्ये पार्थ चॅटर्जी यांची जवळची सहकारी अर्पिता यांच्या घरातून ईडीने 20 कोटींहून अधिक रक्कम जप्त केली होती. त्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी अर्पिता यांनाही ताब्यात घेतले आहे. गेल्या अनेक तासांपासून ममता बॅनर्जी यांचे मंत्री पार्थ चॅटर्जी यांची चौकशी सुरु होती. यादरम्यान ईडीने त्यांना अनेक प्रश्न विचारले. ईडीच्या अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मंत्री चॅटर्जी देऊ शकले नाहीत. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.
काय आहे शिक्षक भरती घोटाळा?
पश्चिम बंगालच्या सरकारमधील एका मंत्र्यावर करण्यात येत असलेली कारवाई ही संपूर्ण शिक्षक भरती घोटाळ्याशी संबंधित आहे. 2016 मध्ये ही भरती प्रक्रिया सुरु झाली होती. ज्यामध्ये बनावट पद्धतीने प्रवेश मिळवण्यासाठी ओएमआर शीटमध्ये फेरफार केल्याचा आरोप करण्यात आला होता. यामध्ये लाखो रुपयांची लाच घेऊन नापास उमेदवारांना उत्तीर्ण करण्यात आलं होतं. या प्रकरणात थेट शिक्षणमंत्र्यांचा हात असल्याचा आरोप देखील केला होता. तसेच यामध्ये अनेक लोक सामील असल्याचे सांगण्यात येत आहे, ज्यांना लवकरच अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आणखी एका मंत्र्यांच्या घरावर छापेमारी सुरु
ममता यांचे आणखी एक मंत्री परेश अधिकारी यांच्या घरावर देखील ईडीची छापेमारी सुरु आहे. यासोबतच त्यांच्या जवळच्या मित्रांचीही ईडीकडून चौकशी केली जात आहे. याशिवाय नोकरभरतीत घोटाळ्याशी संबंधित अन्य अधिकाऱ्यांवरही कारवाई सुरु आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)