(Source: ECI/ABP News/ABP Majha)
National Herald Case : ED चं सोनिया गांधी यांना नवं समन्स, चौकशीसाठी हजर होण्याच्या तारखेत बदल
ED Summons to Sonia Gandhi : ईडीने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना नव्याने समन्स पाठवलं आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणाच्या चौकशीसाठी त्यांना आता 25 ऐवजी 26 जुलैला हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे.
ED Summons to Sonia Gandhi : नॅशनल हेराल्ड प्रकरणाच्या (National Herald Case) तपासाच्या चौकशीसाठी अंमलबजावणी संचालनालयाने (Enforcement Directorate) काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Congress President Sonia Gandhi) यांना नव्याने समन्स पाठवलं आहे. त्यांना आता 25 ऐवजी 26 जुलैला हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. सूत्रांनी ही माहिती दिली आहे.
नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राशी संबंधित कथित मनी लाँड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने गुरुवारी (21 जुलै) सोनिया गांधी यांची चौकशी केली होती. ही चौकशी सुमारे दोन ते तीन तास चालली. त्यानंतर तपास यंत्रणेने त्यांना सोमवारी म्हणजेच 25 जुलै रोजी हजर राहण्यास सांगितलं होतं. परंतु सोनिया गांधी यांना आता सोमवारी (25 जुलै) नव्हे तर मंगळवारी (26 जुलै) तपास यंत्रणेसमोर हजर राहणं आवश्यक असल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं. तारीख बदलण्याचं कारण समजू शकलेलं नाही.
सोनिया गांधी नुकत्याच कोविडमधून बऱ्या झाल्या आहेत. त्यामुळे कोविड प्रोटोकॉल लक्षात घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली होती, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. यावेळी सोनिया गांधी यांच्यासोबत पुत्र राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि कन्या प्रियांका गांधी वाड्राही (Priyanka Gandhi Wadra) होत्या. सोनिया गांधी यांचं वय आणि प्रकृती लक्षात घेऊन ईडीने प्रियांका गांधी यांना विशेष सूट म्हणून ईडी कार्यालयातील चौकशी कक्षापासून दूर आईसोबत जाण्याची परवानगी दिली होती.
ईडीने राहुल गांधी यांचीही चौकशी केली आहे
दरम्यान याप्रकरणी ईडीने याआधी खासदार राहुल गांधी यांचीही चौकशी केली होती. त्याचवेळी काँग्रेसने ईडीच्या कारवाईचा निषेध करत राजकीय सूडबुद्धीने ही कारवाई करत असल्याचं म्हटलं होतं. चौकशीच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी देशव्यापी निदर्शने केल्यानंतर अनेक काँग्रेस नेत्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं.
कोरोनामुळे चौकशी पुढे ढकलली
खरंतर सोनिया गांधी यांची जूनच्या पहिल्या आठवड्यात चौकशी होणार होती. मात्र त्यांना कोविड-19 ची लागण झाल्यामुळे ही चौकशी 23 जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. सोनिया गांधी यांना घरी विश्रांती घेण्याचा सल्ला दिल्याने त्यांनी केंद्रीय तपास यंत्रणेकडे चार आठवड्यांचा वेळ मागितला होता. गेल्या महिन्यात त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची विनंती ईडीने मान्य केली आणि त्यानंतर नव्याने समन्स जारी केलं.
संबंधित बातम्या
- National Herald Case : ईडीने सोनिया गांधींना विचारले 'हे' प्रश्न, सोमवारी होणार पुन्हा चौकशी
- ED Enquiry Sonia Gandhi: सोनिया गांधींची ईडी चौकशी; काँग्रेसचे मुंबईसह राज्यभर निषेध आंदोलन, जोरदार घोषणाबाजी
- National Herald Case : सोनिया गांधी यांची तब्बल तीन तास चौकशी, सोमवारी पुन्हा चौकशीला बोलावण्याची शक्यता
- 8 ते 10 तास चौकशी, तीन टप्प्यांत प्रश्न; सोनिया गांधींच्या चौकशीसाठी ईडीचा खास प्लान