एक्स्प्लोर
केजरीवाल यांना निवडणूक आयोगाची नोटीस
पणजी : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि 'आप'चे संयोजक अरविंद केजरीवाल अडचणीत येण्याची शक्यता आहे. गोव्यातील सभेत आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी त्यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे.
'नोटांच्या बदल्यात व्होट', हे वक्तव्य केजरीवालांना महागात पडण्याची शक्यता आहे. कारण निवडणूक आयोगाने हे प्रकरण अतिशय गांभीर्याने घेतल्याची माहिती आहे.
प्रचारादरम्यान सर्व पक्ष पैसे वाटण्यासाठी येतील. मात्र तुम्ही मना करु नका, पैसे स्वीकारा, असं वक्तव्य केजरीवालांनी 8 जानेवारीच्या सभेत केलं होतं. त्यानतंर गोवा प्रशासन आणि सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाकडे केजरीवालांविरोधात तक्रार दाखल केली होती.
तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने याप्रकरणी तातडीने नोटीस बजावण्याची कारवाई केली असून हे वक्तव्य आचारसंहितेचा भंग करणारं असल्याचं स्पष्ट केलं आहे. 19 जानेवारीला दुपारी एक वाजेपर्यंत उत्तर देण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement