(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Earthquake : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी दिल्ली-हरियाणामध्ये भूकंपाचे धक्के, 3.8 रिक्टर स्केल तीव्रता
Earthquake in Delhi NCR : जेव्हा लोक नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये मग्न होते, तेव्हा दिल्ली-एनसीआरच्या भागात भूकंपाचे धक्के जाणवले
Earthquake in Delhi : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी दिल्ली (Delhi) आणि आसपासच्या परिसरात रात्री उशिरा भूकंपाचे धक्के (Earthquake) जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने (National center for seismology) या भूकंपाची तीव्रता मोजली असून याची तीव्रता 3.8 इतकी असल्याचे सांगितले. मात्र या धक्क्यांमुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. विशेष म्हणजे भूकंप झाला, तेव्हा लोक नववर्षाच्या जल्लोषात मग्न झाले होते.
Earthquake of Magnitude:3.8, Occurred on 01-01-2023, 01:19:42 IST, Lat: 28.71 & Long: 76.62, Depth: 5 Km ,Location: 12km NNW of Jhajjar, Haryana for more information Download the BhooKamp App https://t.co/QVSUrTSmuX pic.twitter.com/SAgjRl6hNo
— National Center for Seismology (@NCS_Earthquake) December 31, 2022
भूकंपाचा केंद्रबिंदू हरियाणात
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने सांगितले की, भूकंपाचा केंद्रबिंदू हरियाणातील झज्जर येथे होता. त्याची खोली जमिनीपासून 5 किलोमीटर खाली होती. दरम्यान, पहाटे 1.19 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. सद्यस्थितीत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती नाही. गेल्या काही महिन्यांत दिल्लीत अनेकदा भूकंपाचे धक्के बसले आहेत.
भूकंप आल्यास काय काळजी घ्याल?
भूकंपाचे धक्के जाणवत असतील तर लगेच जमिनीवर बसा आणि डोके खाली टेकवा. मजबूत टेबल किंवा फर्निचरच्या आवरणाखाली स्वतःचा बचाव करणे चांगले होईल.
घरातील वडीलधाऱ्यांची आणि मुलांची विशेष काळजी घ्या, त्यांना प्रोत्साहन द्या आणि बचावाच्या पद्धती सांगून त्यांचे संरक्षण करा.
भूकंपाचे धक्के खूप तीव्र असतील तर घरातून बाहेर पडा आणि मोकळ्या मैदानावर किंवा रस्त्यावर
घरातून बाहेर पडण्याचा मार्ग अरुंद असेल आणि दोन्ही बाजूला घरे बांधलेली असतील तर घराबाहेर पडण्याऐवजी घरातच राहा.
भूकंपाच्या वेळी काच, खिडकी, पंखा किंवा झुंबर इत्यादी जड आणि पडणाऱ्या वस्तूंपासून दूर राहा.
जर तुम्ही अंथरुणावर झोपलेले असाल तर उशीने डोके झाका. मुलांचे निरीक्षण करा.
घरातून बाहेर पडताना आणि मोकळ्या मैदानावर किंवा रस्त्यावर उभे राहताना, जवळपास वीज, टेलिफोनचे खांब किंवा मोठी झाडे नाहीत याची खात्री करा.
जर भूकंप झाला आणि त्या वेळी तुम्ही वाहन चालवत असाल तर वाहन सुरक्षित ठिकाणी थांबवा आणि काही वेळ वाहनात बसा.
खूप तीव्र भूकंपानंतर काही तासांसाठी आफ्टरशॉक्स नेहमीच येऊ शकतात. ते टाळण्यासाठी आगाऊ व्यवस्था करा.
अशा परिस्थितीत संयम बाळगा आणि अफवांकडे लक्ष देऊ नका