Earthquake : उत्तर भारत हादरलं..दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के; 5.8 तीव्रतेचा भूकंप
Earthquake In Delhi Ncr : दिल्ली-एनसीआर मध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानच्या हिंदुकुशमध्ये होता. त्यामुळे जम्मू-काश्मीरमध्येही त्याचे धक्के जाणवले आहेत.
Earthquake: दिल्ली-एनसीआरमध्ये शनिवारी (5 ऑगस्ट) संध्याकाळी उशिरा भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता 5.8 इतकी होती. रात्री उशिरा ९.३४ वाजता हे धक्के जाणवले. जम्मू-काश्मीरमधील गुलमर्ग येथेही भूकंपाचे धक्के जाणवले.
अफगाणिस्तानच्या हिंदुकुशमध्ये भूकंपाचा केंद्रबिंदू होता. आतापर्यंत जीवित किंवा मालमत्तेच्या नुकसानीची कोणतीही माहिती मिळालेली नाही. 5.8 रिश्टर स्केलचा भूकंप हा मध्यम तीव्रतेचा भूकंप मानला जातो. मात्र, भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पाहायला मिळाले.
मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानच्या हिंदुकुशमध्ये होता. त्यामुळे जम्मू-काश्मीरमध्येही त्याचे धक्के जाणवले आहेत. केंद्र हिंदुकुशमध्ये असल्यामुळे पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि भारत या तिन्ही देशांना याचे धक्के जाणवले आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये अनेकदा भूकंपाचे धक्के बसले आहेत, तर दिल्ली-एनसीआरही भूकंपाच्या धक्क्यांमुळे हादरली.
दिल्लीत केव्हा जाणवले धक्के?
यापूर्वी 13 जून रोजी दिल्लीत भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्याआधी मार्च महिन्यात भारतातील अनेक राज्यांमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 6.6 इतकी होती. दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेश, जम्मू काश्मीर, हिमाचल, पंजाब, मध्य प्रदेश आणि उत्तराखंडसह संपूर्ण उत्तर भारतात भूकंपाचा प्रभाव होता. अफगाणिस्तानचा हिंदुकुश प्रदेश भूकंपाचा केंद्रबिंदू होता.
दिल्लीला भूकंपाचा धोका?
दिल्लीत मोठा भूकंप होण्याची शक्यता बऱ्याच दिवसांपासून वर्तवली जात आहे. राजधानीत मोठ्या तीव्रतेचा भूकंप होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. वास्तविक दिल्ली हे भूकंपाच्या झोनपैकी झोन 4 मध्ये आहे. देश अशा चार झोनमध्ये विभागलेला आहे. झोन-4 मध्ये असल्याने दिल्ली भूकंपाचे जोरदार धक्केही सहन करू शकत नाही. दिल्ली हिमालयाजवळ आहे. जी भारत आणि युरेशिया सारख्या टेक्टोनिक प्लेट्सच्या मिलनातून तयार झाली आहे. पृथ्वीच्या आत या प्लेट्सच्या हालचालींमुळे दिल्ली, कानपूर आणि लखनौसारख्या भागात भूकंपाचा धोका सर्वाधिक आहे.