एक्स्प्लोर

Raid on Opposition Leaders : भर लोकसभा निवडणुकीत ईडी, सीबीआय, आयटीकडून विरोधी आघाडीतील नेत्यांसह नातेवाईकांच्या घरावर छापेमारी!

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या अटक करण्यात आल्यानंतर आता केंद्रीय यंत्रणांनी विरोधी पक्षांचे नेते आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या घरांवर छापेमारी सुरु केली आहे.

नवी दिल्ली : भर लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election 2024) इंडिया आघाडीमधील विरोधी नेत्यांच्या घरी केंद्रीय तपास यंत्रणा कमालीच्या सक्रिय झाल्या आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या अटक करण्यात आल्यानंतर आता केंद्रीय यंत्रणांनी विरोधी पक्षांचे नेते आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या घरांवर छापेमारी सुरु केली आहे. आयटी टीम (Income Tax) आम आदमी पार्टीचे मतियाला आमदार गुलाब सिंह यादव यांच्या घरी पोहोचली. ईडीची टीम बीआरएस नेत्या तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री कविता यांच्या नातेवाईकांच्या घरी पोहोचली. दुसरीकडे, सीबीआयचे पथक आज शनिवारी सकाळी तृणमूल काँग्रेस पक्षाचे माजी खासदार महुआ मोईत्रा यांच्या घरी छापे टाकण्यासाठी पोहोचले.

हैदराबादमध्ये के. कविता यांच्या नातेवाईकांच्या घरावर छापेमारी

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीच्या टीमने आज(23 मार्च) हैदराबादमध्ये के. कविता यांच्या नातेवाईकांच्या घरावर छापे टाकण्यात आले. दिल्लीतील दारू घोटाळ्याशी संबंधित प्रकरणाच्या संदर्भात हा छापा टाकण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ईडीच्या पथकाने कविता यांच्या भावाच्या पत्नीच्या घरावरही छापे टाकले आहेत. कवित यांची ईडी कोठडी आज संपत असून त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केलं जाईल.

महुआ मोईत्राच्या अनेक ठिकाणी सीबीआयचे छापे

दुसरीकडे, सीबीआयचे पथक आज सकाळपासून टीएमसीच्या माजी खासदार महुआ मोईत्रा यांच्या अनेक ठिकाणी छापे टाकत आहे. गुरुवारी (21 मार्च) सीबीआयने तृणमूल काँग्रेसचे माजी खासदार महुआ मोइत्रा यांच्याविरुद्ध लोकसभेत पैशाच्या बदल्यात प्रश्न विचारल्याप्रकरणी एफआयआर नोंदवला होता. आता दोन दिवसांनी छापे टाकले जात आहेत. बंगालसह महुआ मोईत्राच्या आणखी 7 ठिकाणांवर सीबीआयचे छापे सुरू आहेत.

'आप'चे गुलाब सिंह यांच्या घरावर आयटीचा छापा

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे (आप) संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर आयकर विभागाच्या पथकाने शनिवारी (23 मार्च) आमदार गुलाब सिंह यांच्या घरावर छापा टाकला. मतियाला विधानसभा मतदारसंघाचे आमदार गुलाब सिंह हे पक्षाच्या गुजरात युनिटचे प्रभारी आहेत. पक्षाचे म्हणणे आहे की, आयटी टीम शनिवारी पहाटे तीन वाजता गुलाब सिंह यांच्या घरी पोहोचली होती. मात्र, कोणत्या प्रकरणात छापा टाकला जात आहे, याची माहिती नसल्याचे पक्षाचे म्हणणे आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
Uddhav Thackeray: कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Dhule Cash Seized : मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनंSatej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारीEknath Shinde Koregaon Sabha : महेश शिंदेंच्या प्रचारसाठी कोरेगावात सभा, शिंदेंची कोरेगावात सभाSharad Pawar On Retirement : 14 वेळा निवडणुका लढल्या, आता निवडणुक लढणार नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
Uddhav Thackeray: कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Dhule Cash Seized : मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
एकाच राज्यासाठी काम करत असाल तर तुम्ही पंतप्रधान कशाला होता? राज्याचे मुख्यमंत्री व्हा; पवार गरजले
एकाच राज्यासाठी काम करत असाल तर तुम्ही पंतप्रधान कशाला होता? राज्याचे मुख्यमंत्री व्हा; पवार गरजले
Numerology : अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; मनातील भावनाही धड करत नाहीत व्यक्त, लोक काय बोलतील याचा करतात अति विचार
अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; लोक काय बोलतील याचा करतात अति विचार, मनातील भावना व्यक्त करायलाही घाबरतात
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Embed widget