कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याने केंद्र सरकार अर्लट मोडवर, JN.1 व्हेरियंटबाबत दिल्या या सूचना
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवार 18 डिसेंबर रोजी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात कोरोना विषाणू संसर्गाचे 260 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तसेच सक्रिय रुग्णांची संख्या ही 1,828 वर पोहोचली आहे.
मुंबई : कोविड-19 (Covid 19) प्रकरणांमध्ये झालेली वाढ आणि भारतात JN.1 प्रकाराची पहिली केस आढळून आल्याने केंद्राने अलीकडेच राज्यांना एक अॅडवायजरी जारी करण्यात आली आहे. तसेच सर्व राज्यांना कोविड परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे आवाहन देखील या माध्यमातून करण्यात आले आहे. राज्यांना जिल्हानिहाय SARI आणि ILI प्रकरणांचे नियमितपणे अहवाल द्यावे लागणार आहेत.
मोठ्या संख्येने RT-PCR चाचण्यांसह इतर चाचण्या देखील सुनिश्चित करण्यासाठी राज्यांना सल्ला देण्यात आलाय. तसेच, जीनोम सिक्वेन्सिंगसाठी सकारात्मक नमुने INSACOG प्रयोगशाळांमध्ये पाठविण्याचा सल्ला देखील यावेळी दिलाय.
कोरोनाचे नवे 260 रुग्ण
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवार 18 डिसेंबर रोजी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात कोरोना विषाणू संसर्गाचे 260 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तसेच सक्रिय रुग्णांची संख्या ही 1,828 वर पोहोचली आहे. सकाळी 8 वाजता अपडेट केलेल्या आकडेवारीनुसार, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ही 5,33,317 इतकी नोंदवली गेली आहे.
देशात कोविड रुग्णांची संख्या 4.50 कोटी (4,50,05,076) आहे. आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, या आजारातून बरे झालेल्या लोकांची संख्या 4,44,69,931 झाली आहे. बरे होण्याचा दर 98.81 टक्के आहे. कोरोनामध्ये मृत्यूचे प्रमाण 1.19 टक्के आहे. मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, देशात कोविड लसींचे 220.67 कोटी डोस देण्यात आले आहेत.
Union Health Minister Dr Mansukh Mandaviya also urged all States/UTs to ensure preventive measures are taken, in view of the cold conditions during winter season, and the coming festival season. https://t.co/WjhD458Qgz
— ANI (@ANI) December 20, 2023
गेल्या काही वर्षांपासून जगाची झोप उडवणाऱ्या कोरोना व्हायरसनं (Coronavirus Updates) पुन्हा एकदा धाकधूक वाढवली आहे. कोरोना व्हायरस (Coronavirus) आणि कोरोनाच्या (Covid-19) संसर्गाबाबत पुन्हा एकदा सतर्कतेची परिस्थिती निर्माण झाली आहे. कोविडचा नवा सबव्हेरियंट (New Subvariant of Covid) भारतात (India Corona Update) आल्याचं समोर आलं आहे. कोविड-19 चा सबव्हेरियंट JN.1 चं पहिलं प्रकरण केरळमध्ये (Kerala) आढळून आलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं (Union Ministry of Health) याबाबत माहिती दिली. तसेच, कोरोनानं ग्रस्त असलेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्याचं वृत्तही समोर येत आहे.
केरळमध्ये आढळून आला व्हेरिएंट
8 डिसेंबर 2023 रोजी केरळमधील तिरुअनंतपुरम येथील काराकुलममध्ये आरटी-पीसीआर पॉझिटिव्ह नमुन्यात हे प्रकरण आढळून आले. 18 नोव्हेंबर 2023 रोजी या नमुन्याची आरटी-पीसीआर पॉझिटिव्ह चाचणी करण्यात आली होती. रुग्णाला इन्फ्लूएंझा सारख्या आजाराची (ILI) सौम्य लक्षणे होती आणि तो रुग्ण कोविड-19 मधून बरा झाला होता. गेल्या काही आठवड्यांपासून केरळ राज्यामध्ये कोविड-19 च्या रुग्ण संख्येत वाढ होत आहे. चाचणीसाठी पाठवण्यात आलेल्या इन्फ्लूएंझा सारख्या आजारांच्या प्रकरणांमधील नमुन्यांच्या संख्येत वाढ हे याचे कारण आहे. यापैकी बहुतेक रुग्णांना वैद्यकीयदृष्ट्या सौम्य लक्षणे आहेत आणि हे रुग्ण कोणत्याही उपचाराशिवाय त्यांच्या घरीच स्वतःहून बरे होत आहेत.
हेही वाचा :
धाकधूक वाढली! कोरोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू, वेगानं पसरणारा नवा व्हेरियंटही आढळला; अलर्ट मोडवर केरळ