नोएडाच्या गॉर्डन गॅलेरिया मॉलमधील पबमध्ये तुफान राडा, हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल
Viral Video : नोएडाच्या सेक्टर-38ए गार्डन गॅलेरिया मॉलमधील सूत्रा बारमध्ये दोन गटात जोरदार हाणामारी झाली आहे. या मारामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
नवी दिल्ली : नोएडाच्या सेक्टर-38ए गार्डन गॅलेरिया मॉलमधील सूत्रा बारमध्ये दोन गटात जोरदार हाणामारी झाली आहे. गुरुवारी रात्री उशिरा ही घटना घडली आहे. या मारामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. याच मॉलमध्ये झालेल्या भांडणात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. ट्विटरसह विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झालेल्या या आठ सेकंदाच्या व्हिडीओमध्ये दोन्ही बाजूंमध्ये जोरदार हाणामारी सुरू असल्याचे दिसत आहे. काही वेळातच हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय.
Brawl at Garden Galleria pub, Noida pic.twitter.com/rzhadcke1x
— Atulkrishan (@iAtulKrishan) December 30, 2022
Viral Video : पोलिसांकडून तपास सुरू
एका युजर्सने पोलिसांना हा व्हिडीओ टॅग करून आरोपींवर कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य पाहून पोलिसांनी तपास केला. त्यावेळी संबंधित व्हिडीओ हा नोएडाच्या सेक्टर-38 ए गॉर्डन गॅलेरिया मॉलच्या सूत्रा बारमधील असल्याचे समोर आले. एडीसीपी आशुतोष द्विवेदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी कोणत्याही बाजूने तक्रार आलेली नाही. मात्र, पोलिस आपल्या स्तरावर तपास करत आहेत. आरोपींची ओळख पटवण्यासाठी बारमध्ये बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात येत आहे.
Viral Video : नऊ महिन्यांपूर्वी व्यवस्थापकाची हत्या
नऊ महिन्यांपूर्वी एका कंपनीच्या खरेदी व्यवस्थापकाची दारूच्या नशेत याच ठिकाणी हत्या करण्यात आली होती. ब्रिजेश राय हा मूळचा बिहारमधील हसनपुरा येथील रहिवासी होता. तो सेक्टर 80 मधील बॅटरी उत्पादन कंपनीत खरेदी व्यवस्थापक होता. 25 एप्रिल 2022 रोजी मॉलमधील द लास्ट लेमन बारमध्ये मित्रांसोबत पार्टीसाठी आल्यानंतर त्याची हत्या झाली होती. बिलावरून ब्रिजेश आणि व्यवस्थापनात वाद झाला होता. त्यानंतर त्याला मॉलमध्ये बाउन्सर आणि इतर कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केली. त्यातच त्याचा मृत्यू झाला होता. याच मॉल्समध्ये मारामारीची अनेक प्रकरणे समोर आली आहेत.
Viral Video : नवीन वर्षाचे सेलिब्रेशन
नवीन वर्षाचे सर्वात मोठे सेलिब्रेशन फक्त गॉर्डन गॅलेरिया मॉलमध्ये झाले. 31 डिसेंबरच्या रात्री सुमारे तीस हजार तरुण-तरुणींनी येथे सेलिब्रेशन केले. नोएडा व्यतिरिक्त एनसीआरच्या विविध भागातून लोक नवीन वर्ष साजरे करण्यासाठी येथे आले होते.
महत्वाच्या बातम्या
दिल्ली हादरली! स्कूटीला धडक देऊन मुलीला सात -आठ किलोमीटर फरफटत नेलं