एक्स्प्लोर
हॅट्स ऑफ द्रविड! बंगळुरु विद्यापीठाची 'डॉक्टरेट' नाकारली
बंगळुरु : भारताचा माजी क्रिकेटर आणि टीम इंडियाची वॉल अशी बिरुदावली मिळवणाऱ्या राहुल द्रविडने बंगळुरु विद्यापीठाकडून 'डॉक्टरेट' स्वीकारण्यास नकार दिला आहे. डॉक्टरेट मिळवण्यासाठी आवश्यक अशी कोणतीही भरीव कामगिरी केलेली नसताना, अशी डॉक्टरेट स्वीकारण्याऐवजी आपण खेळाच्या क्षेत्रात संशोधन करुन डॉक्टरेट मिळवण्याचा प्रयत्न करु अशी विनम्र प्रतिक्रिया द्रविडने दिली.
राहुल द्रविडचं लहानपण आणि प्राथमिक शिक्षण बंगळुरुतच झालं. त्यानंतर पुढे क्रिकेटमध्ये संयमी खेळ करत अनेक विक्रमांना गवसणी घातली. हे सारं लक्षात घेऊन बंगळुरु विद्यापीठाने 27 जानेवारीला होणाऱ्या 52 व्या दीक्षांत समारंभात द्रविडला 'डॉक्टरेट' पदवी बहाल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, राहुल द्रविडने विनम्रपणे नकार दिला.
बंगळुरु विद्यापीठाचे कुलपती बी. थिमे गौडा यांनी याबाबत बोलताना सांगितले की, "डॉक्टरेट पदवी बहाल करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल राहुल द्रविड यांनी बंगळुरु विद्यापीठाचे आभार मानले आहेत. मात्र, पदवी स्वीकारण्यास नम्र नकार दिला आहे.
क्रीडा क्षेत्रात सखोल संशोधन करुन डॉक्टरेट मिळवण्याचा निर्धार द्रविड यांनी केला आहे."राहुल द्रविडने आपल्या यशस्वी क्रिकेट कारकीर्दीतून 2012 साली निवृत्ती घेतली आणि त्यानंतर क्रिकेट क्षेत्रात काम करतो आहे. मार्गदर्शन असो वा निवड, राहुल द्रविड कायमच टीम इंडियाच्या मदतीला धावून आला आहे.
टीम इंडियाचा विद्यमान प्रशिक्षक अनिल कुंबळे याच्या निवडीमध्येही राहुल द्रविडने महत्त्वाची भूमिका बजावली होती. राहुल द्रविड सध्या 'ए' आणि 'अंडर-19' या टीममधील नव्या दमाच्या क्रिकेटर्सनाल मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देण्याची महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement