(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सकारात्मक बातमी! देशात कोरोना रुग्णांचा दुप्पट होण्याचा कालावधी वाढला : केंद्रीय आरोग्य मंत्रालय
देशात कोरोना रुग्णांचा दुप्पट होण्याचा कालावधी वाढल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. लॉकडाऊन अनेक ठिकाणी यशस्वी पाळल्यामुळे हे शक्य झाल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.
नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना सर्वांना दिलासा देणारी बातमी आली आहे. देशातील डबलिंग रेट म्हणजे कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. लॉकडाऊनपूर्वी देशातील कोरोना रुग्णांचा डबलिंग रेट हा आधी 3.41 दिवस होता आता तो 11 दिवस झाला आहे. विशेष म्हणजे यातील काही राज्यांचा डबलिंग रेट याहूनही वाढला आहे. तर, काही रांज्यांमध्ये कोरोना रुग्ण दुप्पट होण्यासाठी 40 दिवसांचा कालावधी लागत आहे. लॉकडाऊन यशस्वीरित्या पाळल्याने कोरोनाला अनेक ठिकाणी रोखण्यात यश आल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले.
देशात मागच्या 24 तासांमध्ये 1718 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. परिणामी देशात एकूण कोरोना रुग्णांची संख्या 33050 झाली आहे. पैकी 23651 रुग्ण संध्या देशभरातील विविध रुग्णांलयांमध्ये उपचार घेत आहे. तर, मागच्या 24 तासांत 630 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे आतापर्यंत 8324 लोक कोरोना व्हायरसच्या संसर्गापासून मुक्त झाले आहेत. सकारात्मक बाब म्हणजे कोरोना रुग्ण रिकव्हर होण्याचाही रेट वाढला आहे. 14 दिवपासांपूर्वी कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचा वेग 13.06 टक्के होता. तो आता 25 टक्क्यांच्यावर पोहचला आहे.
लॉकडाऊनमुळे अडकलेले नागरिक घरी परतणार; जिल्हाधिकाऱ्यांकडून स्थलांतराची कार्यवाही
डबलिंग रेट वाढला कोरोनाला रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. त्याचा सकारात्मक परिणाम झाल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले. लॉकडाऊनच्या आधी कोरोना रुग्णांचा डबलिंग रेट म्हणजे दुप्पट होण्याचा वेग हा 3.41 दिवस होता आता तो 11 दिवस झाला आहे. तर, काही राज्यांमध्ये हा डबलिंग रेट 11 दिवसांपासून 40 दिवसांपर्यंत वाढला असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली.
डबलिंग रेट 11 दिवसांपासून जास्त असलेली राज्ये दिल्ली, उत्तर प्रदेश, ओडिशा, तमिळनाडू, राजस्थान, जम्मू काश्मीर, पंजाब,
डबलिंग रेट 20 ते 40 दिवसादरम्यान असलेली राज्ये कर्नाटका, हरियाणा, लडाख, केरळ, उत्तराखंड,
40 दिवसांहून अधिक डबलिंग रेट असलेली राज्ये आसाम, तेलंगाना, छत्तीसगढ, हिमाचल प्रदेश,
डबलिंग रेट देशात वाढवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. कोविड19 व्यतिरिक्त इतर आजारांवर उपचार घेणाऱ्यांकडे दुर्लक्ष होता कामा नये, अशा सुचना राज्यांना दिल्या आहेत.
नर्मदा परिक्रमेसाठी गेलेले जवळपास 100 भाविक मध्यप्रदेशात अडकले
लॉकडाऊनमुळे अडकलेल्या लोकांना घरी जाण्याचा मार्ग मोकळा लॉकडाऊनमुळे राज्यात व राज्याबाहेर ठिकठिकाणी अडकलेल्या स्थलांतरित कामगार, यात्रेकरू, विद्यार्थी, यात्रेकरू तसेच इतर नागरिकांना त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याची माहिती केंद्राने दिली आहे. राज्य, केंद्रशासित प्रदेशांना याच्या सुचना दिल्या आहेत. नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. रस्त्यावरुन प्रवाशांची ने आण होईल. लोकांना तपासणीनंतरच प्रवासाची मूभा देण्यात येईल. आपापल्या राज्यात किंवा शहरात पोहचल्यानंतर त्यांची तिथेही तपासणी केली जाणार आहे. त्यांना संस्थात्मक क्वॉरंटाईनची गरज असल्यास त्यांना तिथेच क्वॉरंटाईन केलं जाईल. अथवा 14 दिवसांसाठी घरीच क्वॉरंटाईन करण्यात येणार आहे. सर्वांना आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करण्यास प्रोत्साहन देण्यास सांगण्यात येणार असल्याचंही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.
Prithviraj Chavan Facebook LIVE | शेतकऱ्यांचं संपूर्ण वीज बिल माफ करा : पृथ्वीराज चव्हाण