डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा नियम अन् अमेरिकेतील दीड लाख शीख संकटात, इंग्रजीच्या सक्तीनं ट्रकचालकांमध्ये अस्वस्थता
Donald Trump: अमेरिकेतील शीख नागरिकांपैकी 90% लोक हे ट्रकचालक म्हणून काम करतात . साधारण 150,000 नागरिकांमध्ये या निर्णयामुळे बेरोजगार होण्याची भीती निर्माण झाली आहे .

Donald Trump English Language: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सत्तेवर येऊन शंभर दिवस पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा ट्रम्प यांनी निर्णयांचा धडाका सुरू केलाय .गेल्या शंभर दिवसात ट्रम्प यांच्या नवीन तारीफ धोरणांमध्ये संपूर्ण जगभरात खळबळ उडाल्यानंतर आता त्यांनी एका कार्यकारी आदेशावर सही केलीये .ज्यात अमेरिकेत काम करणाऱ्या सर्व ट्रक चालकांना अस्खलित इंग्रजी भाषेत बोलणं आता बंधनकारक करण्यात आलंय . मात्र या निर्णयामुळे अमेरिकेतील सुमारे दीड लाख शीख नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढू लागली आहे . (Truck Drivers)
अमेरिकेतील शीख नागरिकांपैकी 90% लोक हे ट्रकचालक म्हणून काम करतात . साधारण 150,000 नागरिकांमध्ये या निर्णयामुळे बेरोजगार होण्याची भीती निर्माण झाली आहे . अमेरिकेतील ट्रकचालकांना पाठबळ देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं बोललं जात आहे. .
काय आहे आदेश?
अमेरिकेच्या ट्रक चालकांसाठी 'कॉमनसेन्स रुल्स ऑफ द रोड' नावाच्या या आदेशात अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेसाठी,सुरक्षिततेसाठी व लोकांच्या नोकऱ्यांसाठी हा निर्णय महत्त्वाचा असल्याचं म्हटलंय. या निर्णयात ट्रम्प यांनी इंग्रजी ही अमेरिकेची अधिकृत राष्ट्रीय भाषा असल्याचेही म्हटलंय . या देशात असेही म्हटलंय,ट्रकचालकांनी त्यांच्या मालकांना आणि ग्राहकांना अभिप्राय देणे आवश्यक आहे.आणि संबंधित वाहतूक चिन्हे इंग्रजीत वाचता व समजता येणं आवश्यक आहे.वाहतूक सुरक्षा,सीमा गस्त,मालवाहू वजन,अशा अनेक बाबतीत इंग्रजीत अधिकाऱ्यांची संवाद साधता आला पाहिजे असेही ट्रम्प यांनी म्हटले.
दरम्यान अमेरिकेत शेजारील देशांमधून येणाऱ्या स्थलांतरित व प्रवासी नागरिकांचे प्रमाण वाढल्याने अवैध प्रवाशांना प्रतिबंध घालण्यासाठी ट्रम्प सरकारने हे पाऊल उचलण्याचं बोललं जात आहे .
वाहतूक सचीवांनी तर स्पष्टच सांगितलं..
दरम्यान, या निर्णयावर अमेरिकेचे वाहतूक सचिव शॉन डफी म्हणाले, 60 दिवसांच्या आत, ते ट्रक चालकांसाठी कामाची परिस्थिती चांगली करण्यासाठी पावले उचलतील. इंग्रजी नियमांची योग्य अंमलबजावणी न केल्याने अपघात होऊ शकतात असे वाहतूक विभागाने म्हटले आहे. त्यांनी सांगितले की अशी काही प्रकरणे घडली आहेत जिथे ट्रक चालकांना चिन्हे वाचता येत नाहीत किंवा इंग्रजी बोलता येत नाही त्यामुळे प्राणघातक अपघात होतात.
त्यांनी मागील नियमांवरही टीका केली. ते म्हणाले, " जो ड्रायव्हर आपली राष्ट्रीय भाषा इंग्रजी पुरेसे वाचू किंवा बोलू शकत नाही आणि रस्त्यांची चिन्हे समजू शकत नाही तो अमेरिकेत व्यावसायिक मोटार वाहन चालविण्यास अयोग्य आहे. हा सामान्य ज्ञानाचा मानक कधीही सोडला जाऊ नये. हा विभाग नेहमीच अमेरिकेच्या ट्रक चालकांना प्रथम स्थान देईल.'
हेही वाचा:
























