एक्स्प्लोर
युद्ध अंतिम पर्याय नाही, डोकलामप्रकरणी स्वराज यांची भूमिका
‘युद्धामुळे कोणताही प्रश्न सुटत नाही. युद्धानंतरही संवादाच्या माध्यमातूनच प्रश्न सोडवावे लागतात.’

नवी दिल्ली : ‘युद्धामुळे कोणताही प्रश्न सुटत नाही. युद्धानंतरही संवादाच्या माध्यमातूनच प्रश्न सोडवावे लागतात.’ अशा शब्दांमध्ये परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी डोकलाम प्रश्नावर राज्यसभेत सरकारची भूमिका स्पष्ट केली. याशिवाय चीनच्या राजदूतांना भेटल्याबद्दल त्यांनी राहुल गांधींवरही हल्लाबोल केला आहे. दहशतवाद आणि चर्चा एकाचवेळी होऊ शकत नाहीत, असे म्हणत स्वराज यांनी पाकिस्तानसोबतच्या संबंधांवरदेखील भाष्य केले आहे. पाकव्याप्त काश्मीर भारताचा अविभाज्य घटक आहे. संपूर्ण काश्मीर भारताचे आहे. असं सांगायलाही त्या विसरल्या नाहीत. ‘जगातील जवळजवळ सर्वच देशांचे आज भारतासोबत चांगले संबंध आहेत. त्यामुळे कोणतेही प्रश्न सामोपचारानं सोडवले जावेत असाच आमचा नेहमी प्रयत्न असतो. पंतप्रधान मोदींनी आज जगभरात भारताला सन्मान मिळवून दिला.’ भारताच्या परराष्ट्र धोरणांवरील टीकेवर सुषमा स्वराज यांनी अगदी स्पष्ट शब्दात उत्तर दिलं. संबंधित बातम्या : शांतता हवी असेल, तर डोकलाममधून सैन्य हटवा, चीनचा इशारा
युद्धासाठी तयार राहा, चीनच्या राष्ट्रपतींचे लष्कराला आदेश
आणखी वाचा























