एक्स्प्लोर
रुग्णाच्या पोटातून एक किलो वजनाचे 639 खिळे काढले!
कुठेही खिळे दिसले की तो रुग्ण ते खात असे. इतकंच नाही तर खिळ्यांसोबत तो मातीही खात असे.
कोलकाता : कोलकातामध्ये एका मनोरुग्णाच्या पोटातून डॉक्टरांनी 639 खिळे काढण्यात आले आहेत. कुठेही खिळे दिसले की तो रुग्ण ते खात असे. इतकंच नाही तर खिळ्यांसोबत तो मातीही खात असे.
याबाबत कलकत्ता मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाचे डॉक्टर सिद्धार्थ बिश्वास म्हणाले की, "48 वर्षीय हा रुग्ण पोटदुखीचा त्रासासाठी कायम माझ्याकडे येत असे. पण त्याच्या पोटात खिळे असतील ह्याची जराशीही कल्पना नव्हती. एक दिवस आम्ही एन्डोस्कोपी केली असता आम्हाला धक्काच बसला. त्याच्या पोटात सुमारे एक किलो वजनाचे खिळे होते."
"एन्डोस्कोपीनंतर आम्ही एक्स-रे केला, त्यात रुग्णाच्या पोटात खिळे असल्याचं स्पष्ट झालं. यानंतर सीनियर डॉक्टरांच्या पथकाने त्याच्यावर ऑपरेशन केलं. खिळे त्याच्या पोटात अशाप्रकारे अडकले होते की, आम्हाला ते चुंबकाच्या सहाय्याने काढावे लागले," असंही डॉ. सिद्धार्थ बिश्वास यांनी सांगितलं.
रुग्णाच्या पोटातून एकूण 639 खिळे काढले, जे सुमारे अडीच इंच लांबीचे होते. यातील काही खिळे वाकून एकमेकांमध्ये अडकले होते.
रुग्ण हे खिळे कधीपासून खात होता, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. हा रुग्ण मूळचा गोबरदंगाचा आहे. आता त्याची प्रकृती स्थिर आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement