एक्स्प्लोर
Advertisement
दिव्यांगांना हक्क मिळवून देणारं विधेयक राज्यसभेत मंजूर
नवी दिल्ली : दिव्यांगांना त्यांचे हक्क मिळवून देणारं विधेयक आज राज्यसभेत मंजूर झालं आहे. संसदेचं हिवाळी अधिवेशन संपण्याच्या तीन दिवस आधी दिव्यांग विधेयक 2014 मध्ये आवश्यक बदल करुन मंजूर करण्यात आलं.
हे विधेयक मंजूर झाल्याने देशातील 7 ते 10 कोटी दिव्यांगांना फायदा होणार आहे. नवं विधेयक जुन्या दिव्यांग कायदा, 1995 ची जागा घेईल. या विधेयकामुळे दिव्यांगाना त्यांचे मूलभूत अधिकार सुरक्षित होतील, अशी अपेक्षा आहे.
या अधिवेशनात राज्यसभेत मंजूर झालेलं पहिलंच विधेयक आहे.
विधेयक मंजूर झाल्याचे फायदे
- दिव्यांगांचं नोकरीतलं आरक्षण 3 वरुन 4 टक्क्यांवर
- दिव्यांगांशी भेदभाव केल्यास 10 हजार ते 5 लाखांचा दंड, दोन वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो
- दिव्यांगांच्या लाभासाठीच्या कॅटेगरी 7 वरुन 21 वर वाढवल्या
- खासगी कंपन्यांच्या इमारतींमध्ये दिव्यांगाना येण्या-जाण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन द्याव्या लागतील.
- नवीन कॅटेगरीत अॅसिड अटॅक व्हिक्टिम्स, पार्किन्सन डिसीज, ड्वॉरफिजम यांचा समावेश
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement