Republic Day 2022 : प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत कडक सुरक्षा व्यवस्था, दिल्ली पोलिसांसह केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान तैनात
Republic Day 2022: प्रजासत्ताक दिनानिमित्त सुरक्षेसाठी दिल्ली पोलिसांचे 27 हजार 723 पोलीस दिल्लीत तैनात करण्यात आले असून दिल्ली पोलिसांच्या मदतीसाठी केंद्रीय सुरक्षा दलाच्या 65 कंपन्याही तैनात केल्या आहेत.
Republic Day 2022 : देशभरात प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त सुरक्षेसाठी दिल्ली पोलिसांचे 27 हजार 723 पोलीस दिल्लीत तैनात करण्यात आले आहेत. त्याचबरोबर दिल्ली पोलिसांच्या मदतीसाठी केंद्रीय सुरक्षा दलाच्या 65 कंपन्याही तैनात करण्यात आल्या आहेत. दिल्लीचे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना यांनी याबाबत माहिती दिली.
गेल्या 15 दिवसांत शहरातील काही भागांमध्ये वेगवेगळ्या एक्झिट पॉइंटवर वाहनांची तपासणी आणि नाकाबंदी तीव्र करण्यात आली आहे. त्यामुळे काही संशयास्पद हालचाली झाल्यास त्याची सहज तपासणी आणि पडताळणी करता येईल, अशी माहिती अस्थाना यांनी दिली.
राकेश अस्थाना म्हणाले, राजधानीत सुरक्षा व्यवस्थेसाठी दिल्ली पोलिसांच्या विविध श्रेणी आणि शाखांचे 27 हजार 723 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. दिल्ली पोलिसांच्या मदतीसाठी केंद्रीय सुरक्षा दलाच्या 65 कंपन्या तैनात करण्यात येणार आहेत. दिल्ली नेहमीच दहशतवाद्यांचे लक्ष्य असते. त्यामुळे कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे."
पोलिस सोशल मीडिया हँडलच्या माध्यमातून 'काय करावे आणि काय करू नये' याविषयी जनजागृती करत असून, संशयीत बॅग किंवा इतर वस्तूंबाबत सतर्क राहण्याच्या सूचना पोलीस आणि नागरिकांना देण्यात आल्या आहेत. पोलीस नियंत्रण कक्षात येणाऱ्या अनेक कॉलमुळे जास्त सतर्कता पाळण्यात येत आहे. लोकांकडून मिळालेल्या माहितीची पोसीस उलटतपासणी करत आहेत. 14 जानेवारी रोजी गाझीपूर फूल मार्केटमध्ये RDX आणि अमोनियम नायट्रेट असलेले अत्याधुनिक स्फोटक यंत्र सापडल्यानंतर शहरात दहशतवादविरोधी उपाययोजना तीव्र करण्यात आल्याचे आयुक्त राकेश अस्थाना यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
Republic Day 2022: भारतीय संविधानाची मूळ प्रत कुठे आहे? जाणून घ्या, प्रजासत्ताक दिनानिमित्त संविधानाच्या खास गोष्टी
Republic Day 2022: यंदाचा प्रजासत्ताक दिन प्रमुख पाहुण्याविना, कोरोनामुळे केंद्राचा निर्णय
Republic Day 2022 Stickers : प्रजासत्ताक दिनादिवशी शुभेच्छा देण्यासाठी असे डाऊनलोड आणि शेअर करा WhatsApp स्टीकर्स