एक्स्प्लोर
Gokak Waterfall: भारताचा 'नायगरा' गोकाक धबधब्याला मुसळधार पावसाने आक्राळ विक्राळ रूप प्राप्त
Gokak Waterfall: गोकाक धबधबा हा त्याच्या सौंदर्यासाठी ओळखला जाणारा धबधबा आहे. हा धबधबा बेळगावपासून 60 किमी आणि गोकाक शहरापासून 10 किमी अंतरावर आहे.
Gokak Falls turns into a giant waterfall
1/10

कर्नाटकाचा प्रसिद्ध गोकाक धबधब्याला मुसळधार पावसाने आक्राळ विक्राळ रूप प्राप्त झाले आहे.
2/10

भारताचा नायगारा धबधबा म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते.हा धबधबा पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे
3/10

गोकाक धबधबा हा त्याच्या सौंदर्यासाठी ओळखला जाणारा धबधबा आहे.
4/10

हा धबधबा बेळगावपासून 60 किमी आणि गोकाक शहरापासून 10 किमी अंतरावर आहे.
5/10

गोकाक धबधब्याचे एक प्रमुख आकर्षण म्हणजे दगडापासून 14 मीटर उंचीवर असलेला 200 मीटर लांबीचा लटकणारा पूल.
6/10

पर्यटक खडकाळ दरीच्या दोन्ही बाजूंच्या स्मारकांना देखील भेट देऊ शकतात.
7/10

ज्यात पारंपारिक चालुक्य शैलीतील वास्तुकलेमध्ये बांधलेले देवी दुर्गा, भगवान षण्मुख आणि भगवान महालिंगेश्वर यांचे मंदिर समाविष्ट आहे.
8/10

गोकाक हे जुन्या हिंदू मंदिरांसाठी देखील ओळखलेजाते.
9/10

महालिंगेश्वर मंदिर, सावलगी शिवलिंग मठ, काडसिद्धेश्वर मठ कोन्नूर-मराडीमठ, योगीकोल्ला मंदिर आणि अरभवीमधील दुरदुंडेश्वर मंदिर हे एकेकाळचे सर्वात प्रसिद्ध आहेत.
10/10

6 किमी अंतरावर असलेल्या गोकाक शहरात बजेट हॉटेल्स आहेत. बेळगाव शहरात हॉटेलचे अधिक पर्याय आहेत.
Published at : 20 Aug 2025 10:38 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























