जे विष पेरलं जात आहे ते ओळखा; मी स्वातंत्र्यसैनिकाचा मुलगा, तत्त्व, विचारांसाठी माझी मरण्याची तयारी; बाळासाहेब थोरांताचा किर्तनकाराच्या 'नथुराम' स्टाईल धमकीवर एल्गार
Balasaheb Thorat: तत्त्वांसाठी, विचारासाठी माझी मरण्याची तयारी आहे, मी महात्मा गांधी होऊ शकत नाही मला माहित आहे, मात्र तत्त्वांसाठीमी मरायला देखील तयार असल्याचे थोरात म्हणाले

Balasaheb Thorat: किर्तनकार संग्राम बापू भंडारे यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना नथुराम गोडसे स्टाईलने धमकी दिल्याच्या निषेधार्थ आज (21 ऑगस्ट) संगमनेरमध्ये विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चातून बाळासाहेब थोरात यांनी धमकीविरोधात मी मरायला तयार असल्याचे म्हणाले. तालुक्यातील खोट्या केसेस करण्याचं काम थांबवलं पाहिजे. पोलिस घरगडी असल्यासारखं वागतात, गुंड लोकांचा बंदोबस्त केला पाहिजे, असेही ते म्हणाले.
तत्त्वांसाठी, विचारासाठी माझी मरण्याची तयारी
बाळासाहेब थोरात म्हणाले की, मी स्वातंत्र्यसैनिकाचा मुलगा असून तत्त्वांसाठी, विचारासाठी माझी मरण्याची तयारी आहे. मी महात्मा गांधी होऊ शकत नाही मला माहित आहे, मात्र तत्त्वांसाठीमी मरायला देखील तयार असल्याचे थोरात म्हणाले. ते पुढे म्हणाले की, राज्यात देखील अशीच परिस्थिती असून बीडमधील प्रकार आठवतोय ना? विधिमंडळात मारामाऱ्या, मंत्र्याकडे नोटांचे बंडल दिसतात. हे सगळं झाकण्यासाठी कोकाटे यांचा बळी घेतला गेला, असा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले की, विद्यमान आमदार माझा डीएनए तपासा म्हणतो. म्हणजे थेट माझ्या आईवर बोलतो. धांदरफळ येथे देखील एकजण असाच बोलला होता आणि आता आमदार देखील अस बोलतो.
आता अमृतसेना तयार करावी लागणार
त्यांनी पुढे सांगितले की, शहरातील मंडळींनी हे लक्षात घेतलं पाहिजे. दुसरीकडे होत आहे आपल्याला काय असं न म्हणता तुम्ही विचार केला पाहिजे. जे विष पेरले जात आहे ते ओळखा. आता अमृतसेना तयार करावी लागणार आहे. गुंड लोकांचा बंदोबस्त केला पाहिजे, असे थोरात यांनी सांगितले. आमच्यावर आरोप केला आम्ही लोक पाठवली. मात्र, घुलेवाडीमध्ये सगळे कर्मचारी राहतात ते कीर्तनासाठी गेले असतील. वारकरी संप्रदाय असल्याने स्थानिक लोक जातात, असेही त्यांनी सांगितले. एक बाई यू ट्यूबवर आपल्याला शिव्या देते, तिला कोण पैसे पुरवतं? अशी विचारणा त्यांनी केली.
इतर महत्वाच्या बातम्या























