(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Omicron : दिल्लीत Yellow Alert नंतर कशी आहे मेट्रो आणि बसची परिस्थिती? फोटो व्हायरल
कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनच्या रूग्णांची देशभर संख्या वाढत आहे. राजधानी दिल्लीमध्येही ओमायक्रॉनच्या रूग्णांमध्ये रोज वाढ होत आहे. त्यामुळेच दिल्लीत यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
Omicron: गेल्या दोन वर्षांपासून धुमाकूळ घालत असेल्या कोरोनाने (Corona) पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनच्या रूग्णांची देशभर संख्या वाढत आहे. राजधानी दिल्लीमध्येही ओमायक्रॉनच्या रूग्णांमध्ये रोज वाढ होत आहे. त्यामुळेच दिल्लीत यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने अनेक बाबींवर निर्बंध लावले आहेत. तर काही गोष्टी 50 टक्क्यांच्या क्षमतेवर सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
वाढत्या कोरोनाच्या प्रसारामुळे देशभरात खबरदारी घेतली जात आहे. केंद्रासह राज्येही सुरक्षेच्या दृष्टीने पावले उचलत आहेत. दिल्ली सरकारनेही ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यलो अलर्ट जाहीर केला आहे. त्यामुळे दिल्लीत शहरी बस 50 टक्के क्षमतेनेच धावत आहेत.
बस मार्शल यांचे म्हणणे आहे की, आमचे लक्ष्य फक्त बसमधील गर्दी आणि सुरक्षित अंतर निश्चित करण्यावर आहे.
बसमध्ये प्रत्येक जण मास्क घालून बसले आहेत. शिवाय कोरोना नियमांचे पालनही करत आहेत.
एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या फोटोमध्ये स्पष्ट दिसत आहे की, यावेळी दिल्ली सरकार कोरोना आणि ओमायक्रॉनचे रूग्ण वाढण्याआधीच अलर्ट मोडवर आले आहे. त्याबरोबरच नागरिकांकडूनही कोरोना नियमांचे पालन केले जात असल्याचे दिसत आहे.
देशात दिवसेंदिवस ओमायक्रॉन रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णांची वाढणारी संख्या ही सर्वांच्याच चिंतेचा विषय ठरत आहे. केवळ भारतातच नाही तर जगभरातल्या अनेक देशांवर सध्या ओमायक्रॉनचे संकट घोंघावत आहे.
गेल्या 24 तासात देशात नऊ हजाराहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासांमध्ये 9 हजार 195 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, 302 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर देशात ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येत देखील वाढ होत आहे. सध्या देशभरात ओमायक्रॉनची संख्या ही 800 च्या जवळपास गेली आहे. देशात ओमायक्रॉनचा धोका देखील वाढ असल्याचे चित्र दिसत आहे. देशातील 21 राज्यांमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. मागच्या 24 तासात ओमायक्रॉनच्या 128 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या देशात ओमायक्रॉनची रुग्णसंख्या ही 781 आहे. तर उपचारानंतर 241 ओमायक्रॉनचे रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे वाढत्या धोक्याबरोबर नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या