एक्स्प्लोर

Delhi Lockdown Extended : दिल्लीत लॉकडाऊन एक आठवड्याने वाढवला, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची घोषणा

गेल्या महिन्यात दिल्लीती कोरोनाची स्थिती गंभीर होती. मात्र एका महिन्यात दिल्लीतील लोकांच्या शिस्त व संघर्षामुळे कोरोनाची ही लाट ओसरताना दिसत आहे, असं अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं.

नवी दिल्ली : दिल्लीमध्ये लॉकडाऊन आणखी एक आठवड्याने वाढवण्यात आला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याबाबतची घोषणा आज केली. दिल्लीत 31 मे सकाळी 5 वाजेपर्यंत लॉकडाऊन लागू असणार आहे. दिल्लीत 19 एप्रिल रोजी रात्री 10 वाजेपासून लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. टप्प्याटप्प्याने लॉकडाऊनमध्ये वाढ करुन 24 मेपर्यंत लॉकडाऊन दिल्लीत लागू होता. मात्र आता दिल्ली सरकारने लॉकडाऊन एक आठवड्याने वाढवला आहे. 

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं की,  सध्याचा लॉकडाऊन उद्या पहाटे पाच वाजता संपत आहे. आज पुन्हा आपल्या सर्वांना, दिल्लीतील जनतेला लॉकडाऊन वाढवायचे की नाही हे ठरवायचे आहे. एप्रिल महिन्यात जेव्हा संपूर्ण देशात कोरोनाची दुसरी लाट आली तेव्हा लॉकडाऊन लागू करणारं दिल्ली देशातील पहिले राज्य होतं. तेव्हा परिस्थिती गंभीर होती, कोरोनाच्या लाटेचा सामना कसा करु हे सांगता येत नव्हतं. परंतु एका महिन्यात दिल्लीतील लोकांच्या शिस्त व संघर्षामुळे कोरोनाची ही लाट ओसरताना दिसत आहे. मी असं म्हणणार नाही की आपण युद्ध जिंकलं आहे, परंतु आपण यावर नियंत्रण मिळवलं आहे, असं केजरीवाल यांनी सांगितलं. 

दिल्लीतील कोरोनाच्या आकडेवारीचा संदर्भ देताना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं की, एप्रिलमध्ये एक दिवस असा होता की पॉझिटिव्हिटी रेट 36 टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. म्हणजेच 100 लोकांची चाचणी घेतल्यानंतर 36 लोक बाधित आढळत होते. मात्र गेल्या 24 तासात हाच पॉझिटिव्हिटी रेट 2.5 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. एप्रिल महिन्यात एका दिवसात 28 हजार कोरोना रुग्णांची नोंद होत होती. गेल्या 24 तासांत 1600 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. मात्र कोरोनाविरोधातील युद्ध अद्याप शिल्लक आहे. 

केसेस कमी झाल्यास अनलॉक सुरु करू - केजरीवाल

लॉकडाऊनबाबत आम्ही अनेक तज्ज्ञांचा सल्ला घेतला. त्यावर एक आठवड्यासाठी अधिक लॉकडाऊन वाढवला जावा असं उत्तर मिळालं. कारण जर आपण लॉकडाउन हटवला तर असं होऊ नये की आपण मागील 1 महिन्यात जे काही केलं ते पूर्ण वाया जावं. म्हणूनच दिल्लीत सोमवार 31 मे रोजी सकाळी 5 वाजेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात येत आहे. जर अशा प्रकारे कोरोना संसर्ग कमी होत राहिला, लोक शिस्त पाळत राहिले तर 31 मे पासून अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरू होईल. त्वरित अनलॉक करणे चांगले होणार नाही परंतु हळूहळू अनलॉक करणे सुरू होईल, असं अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'दोन दिवसांत माफी मागा, नाहीतर थोबाड काळं करू...'; कुणाल कामराविरोधात FIR, शिवसेना आमदाराचा थेट इशारा
'दोन दिवसांत माफी मागा, नाहीतर थोबाड काळं करू...'; कुणाल कामराविरोधात FIR, शिवसेना आमदाराचा थेट इशारा
Kunal Kamra : एकनाथ शिंदेंविरोधात कॉमेडियन कुणाल कामराचे व्यंगात्मक गाणं; शिंदे गटाकडून तक्रार दाखल
एकनाथ शिंदेंविरोधात कॉमेडियन कुणाल कामराचे व्यंगात्मक गाणं; शिंदे गटाकडून तक्रार दाखल
Pakistan : YouTuber म्हणाला, पाकिस्तानमध्ये औषधेही भारतातून येतात, पाकचे लोक म्हणाले, नमाज अदा करा, अल्लाहताला...
YouTuber म्हणाला, पाकिस्तानमध्ये औषधेही भारतातून येतात, पाकचे लोक म्हणाले, नमाज अदा करा, अल्लाहताला...
पती आणि प्रियकरासह दारू पार्टी अन् तिघेही पोहोचले एकाच बेडरूममध्ये; माजी मंत्र्याची सून अशा अवस्थेत सापडली की कोणी अंदाजही केला नव्हता!
पती आणि प्रियकरासह दारू पार्टी अन् तिघेही पोहोचले एकाच बेडरूममध्ये; माजी मंत्र्याची सून अशा अवस्थेत सापडली की कोणी अंदाजही केला नव्हता!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 630 AM TOP Headlines 630AM 24 March 2025 सकाळी ६.३० च्या हेडलाईन्सDevendra Fadnavis : खुर्ची सलामत, तो कोट पचास; फडणवीसांच्या त्या वक्तव्याचा अर्थ काय? Special ReportNagpur Clash Ground Report :संचारबंदी हटली, बंदोबस्त कायम; नागपुरातून ग्राऊंड रिपोर्ट Special ReportRaj Thackeray MNS : जुने भिडू, जबाबदारीचा नवीन ट्रॅक; कशी आहे मनसेची नवीन यंत्रणा? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'दोन दिवसांत माफी मागा, नाहीतर थोबाड काळं करू...'; कुणाल कामराविरोधात FIR, शिवसेना आमदाराचा थेट इशारा
'दोन दिवसांत माफी मागा, नाहीतर थोबाड काळं करू...'; कुणाल कामराविरोधात FIR, शिवसेना आमदाराचा थेट इशारा
Kunal Kamra : एकनाथ शिंदेंविरोधात कॉमेडियन कुणाल कामराचे व्यंगात्मक गाणं; शिंदे गटाकडून तक्रार दाखल
एकनाथ शिंदेंविरोधात कॉमेडियन कुणाल कामराचे व्यंगात्मक गाणं; शिंदे गटाकडून तक्रार दाखल
Pakistan : YouTuber म्हणाला, पाकिस्तानमध्ये औषधेही भारतातून येतात, पाकचे लोक म्हणाले, नमाज अदा करा, अल्लाहताला...
YouTuber म्हणाला, पाकिस्तानमध्ये औषधेही भारतातून येतात, पाकचे लोक म्हणाले, नमाज अदा करा, अल्लाहताला...
पती आणि प्रियकरासह दारू पार्टी अन् तिघेही पोहोचले एकाच बेडरूममध्ये; माजी मंत्र्याची सून अशा अवस्थेत सापडली की कोणी अंदाजही केला नव्हता!
पती आणि प्रियकरासह दारू पार्टी अन् तिघेही पोहोचले एकाच बेडरूममध्ये; माजी मंत्र्याची सून अशा अवस्थेत सापडली की कोणी अंदाजही केला नव्हता!
Nashik News : चार वर्षीय चिमुकली बादलीत बुडाली, नाका-तोंडात पाणी गेल्यानं दुर्दैवी अंत; नाशिकमध्ये हळहळ
चार वर्षीय चिमुकली बादलीत बुडाली, नाका-तोंडात पाणी गेल्यानं दुर्दैवी अंत; नाशिकमध्ये हळहळ
Nashik Guardian Minister : नाशिक पालकमंत्रिपदाच्या तिढ्यात मिठाचा खडा नको म्हणून मुख्यमंत्री स्वतःकडेच ठेवणार पद? फडणवीसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
नाशिक पालकमंत्रिपदाच्या तिढ्यात मिठाचा खडा नको म्हणून मुख्यमंत्री स्वतःकडेच ठेवणार पद? फडणवीसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
गर्लंफ्रेडला वारंवार भेटायला जाताच गल्लीतील तरुणांचा विरोध, बाॅयफ्रेंडने त्याच गल्लीत तीन सेकंदात तीन बाॅम्ब फेकले! 12 देशी बनावटीचे बाॅम्ब जप्त!
गर्लंफ्रेडला वारंवार भेटायला जाताच गल्लीतील तरुणांचा विरोध, बाॅयफ्रेंडने त्याच गल्लीत तीन सेकंदात तीन बाॅम्ब फेकले! 12 देशी बनावटीचे बाॅम्ब जप्त!
Stock Market : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांचं बाजारमूल्य 300000 कोटींनी वाढलं, सर्वाधिक फायदा कुणाला?
Stock Market : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांचं बाजारमूल्य 300000 कोटींनी वाढलं, सर्वाधिक फायदा कुणाला?
Embed widget