Delhi Weekend Lockdown : दिल्लीत वीकेंड लॉकडाऊन; कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे निर्णय
Delhi Weekend Lockdown : दिल्लीत वीकेंड लॉकडाऊन लागू करण्यात आला असून कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे निर्णय घेण्यात आला आहे.
Delhi Weekend Lockdown : जगासह देशात पुन्हा एकदा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव दिसून येत आहे. कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉन सध्या जगभरात धुमाकूळ घालत आहे. अशातच देशाच्या राजधानीचं ठिकाण असलेल्या दिल्लीत वीकेंड लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानं केजरीवाल सरकारनं हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल स्वतः कोरोना पॉझिटिव्ह आहेत.
दिल्लीमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता विकेंड कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीमध्ये नाईट कर्फ्यू यापूर्वीच लागू करण्यात आला होता. दिल्ली डिजास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी (DDMA) ची आज महत्त्वाची बैठक पार पडली. वेगानं वाढणारे कोरोनाचे आकडे लक्षात घेत कठोर निर्बंध लादण्याचा निर्णय घेण्याता आला होता. दिल्लीमधील पॉझिटिव्हिटी रेट वेगानं वाढत आहे.
पीटीआयनं दिलेल्या माहितीनुसार, डीडीएमच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, दिल्लीमध्ये कोविड-19 चे वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विकेंड कर्फ्यू लावण्यात आला आहे. त्यासोबतच त्यांनी सांगितलं की, दिल्लीमध्ये आवश्यक सेवांव्यतिरिक्त सर्व सरकारी अधिकाऱ्यांना घरातून काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त खाजगी संस्थांमधून 50 टक्के वर्क फ्रॉम होम करण्यासाठी सांगितलं आहे.
गेल्या 24 तासात देशात 37 हजार 379 कोरोना रुग्णांची नोंद
सध्या देशात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. देशातील विविध राज्यात ओमायक्रॉनचा धोका देखील वाढत असल्याचे दिसत आहे. गेल्या 24 तासात देशात 37 हजार 379 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 124 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात 11 हजार 7 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून ही आकडेवारी देण्यात आली आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा आकडा वाढतच आहे. वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या ही चिंता वाढवणारी आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत 10 टक्क्यांची वाढ झाली आहे.
50 टक्के कर्मचाऱ्यांनाच कामावर बोलवा, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारची नियमावली
देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे लॉकडाऊनची छाया गडत होत चालली आहे. त्यातच आलेल्या ओमायक्रॉन व्हेरियंटने संसर्गाचं प्रमाणही वाढलं आहे. त्यामुळे अधिकच चिंतेत भर पडली आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन नियमाली जारी करण्यात आली आहे. सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती 50 टक्के इतकीच ठेवण्यात यावी, उर्वरीत कर्मचाऱ्यांना work from home देण्यात यावे, असे नियमालीत केंद्र सरकारने म्हटले आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Centrel on Covid19 : 50 टक्के कर्मचाऱ्यांनाच कामावर बोलवा, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारची नियमावली
- Fact Check : भारतात मुदत संपलेल्या लसी टोचल्याचा आरोप, आरोग्य मंत्रालयाने दावा फेटाळला
- Omicron Variant Testing Kit : ओमायक्रॉनचं निदान करणारी किट 'ओमीशुअर'ला ICMR ची मंजुरी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह