Delhi School Bomb Blast Threat : दिल्ली-नोएडामध्ये 50 शाळांना धमकीचे ईमेल, विद्यार्थ्यांना घरी पाठवलं, दिल्ली पोलिसांकडून शोध सुरु
Delhi School Bomb Blast Threat : दिल्लीतील जवळपास 50 शाळांना बॉम्ब स्फोट करुन उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. अनके शाळांना याबाबत मेल आले आहेत.
DPS Bomb Threat Today: दिल्लीमध्ये विविध शाळांना (Delhi School Bomb Blast Threat) बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देण्यात आली आहे. द्वारका आणि नोएडा मधील दिल्ली पब्लिक स्कूल, मदर मैरी आणि संस्कृती स्कूलला देखील बॉम्बस्फोट करण्याची धमकी मिळाली आहे. वसंत कुंज येथील डीपीएस आणि साकेत येथील एमिटीला देखील बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देण्यात आली आहे. दिल्ली, द्वारका आणि नोएडामधील जवळपास 50 ते 60 शाळांना धमकी देण्यात आल्याची प्राथमिक माहित समोर आली आहे. द्वारका आणि अशोक विहार मधील प्रूडेन्स स्कूलला देखील धमकी देण्यात आली आहे. शाळांना धमकी ईमेलद्वारे देण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांकडून (Delhi) शाळांमध्ये चौकशी करण्यात येत आहे. आतापर्यंत पोलिसांना कोणतीही संशयास्पद वस्तू सापडलेली नाही. बॉम्ब निकामी करणारी यंत्रणा शाळांच्या परिसरात तैनात करण्यात आलेली आहे.
दिल्ली पोलिसांनी काही शाळांना धमकी दिल्याची माहिती मिळाल्याचं सांगितलं. प्राथमिक माहितीनुसार कालपासून आजपर्यंत काही शाळांना धमकीचे मेल करण्यात आलेला आहे. मेलमध्ये डेटलाईनचा उल्लेख करण्यात आलेला नसल्याची माहिती समोर आली आहे. मेलमध्ये बीसीसी असून यामुळं एकचं मेल अनेक ठिकाणी गेला असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
धमकी प्रकरणातनंतर द्वारका येथील डीपीएस शाळा बंद करण्यात आली आहे. नोएडा डीपीएस नॉलेज पार्कदेखील शाळा बंद ठेवत मुलांना घरी पाठवण्यात आलं आहे. सचदेवा ग्लोबल स्कूलमध्ये देखील सुट्टी जाहीर करण्यात आली.
धमकीच्या मेलमध्ये काहीही तथ्य नाही
दिल्लीतील पोलीस अधिकाऱ्याने या धमकीच्या मेलवर प्रतिक्रिया दिली आहे. अशा प्रकारचे मेल पाठवणाऱ्या व्यक्तीने एकच मेल एकाच वेळी अनेक खासगी तसेच सरकारी संस्थांना पाठवण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाची आम्ही सखोल चौकशी करत आहोत. एका अज्ञात व्यक्तीने खोडसाळ भावनेतून हे कृत्य केले आहे, असेही या पोलीस अधिकाऱ्याने म्हटले आहे. धमकीच्या चर्चेनंतर रुग्णालयातही शोधमोहीम राबवण्यात आली. पण कोणतीही संशयास्पद गोष्ट आढळून आलेली नाही. या धमकीचे मेल आले असले तरी त्या धमक्यांत काहीही तथ्य नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
एप्रिल महिन्यातही दोन तरुणांकडून धमकी
याआधी एप्रिल महिन्यात दिल्लीच्या आयजीआय विमानतळावर दोन प्रवाशांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांना अणूबॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली होती. त्यानंतर पोलिसांनी या प्रवाशांना ताब्यात घेतलं होतं. ही घटना 5 एप्रिल रोजी घडली होती. हे दोन्ही प्रवासी गुजरातमधील राजकोट येथील रहिवासी होते. जिग्नेश मालानी आणि कश्यप कुमार लालानी अशी त्यांची नावे होती.
संबंधित बातम्या :
Uddhav Thackeray: महाराष्ट्राला कधीही कोणाचा गुलाम होऊ देणार नाही: उद्धव ठाकरे