Ajit Pawar On Uddhav Thackeray : कुठे लयलूट झाली हे ठाकरेंनी सांगावं; अजित पवारांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
उद्धव ठाकरे आणि मी अडीच वर्ष एकत्र काम केलं आहे. आमच्यात कुठेही मतभेद नव्हता. त्यांनी कुठे आणि कधी लुटालूट झाली, हे सांगावं?, असा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवारांनी उद्धव ठाकरेंना उपस्थित केला आहे.
पुणे : महाराष्ट्र लुटला जात आहे आणि लुटारुंच्या हाती महाराष्ट्र दिला जात आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) विरोधकांवर केली आहे. उद्धव ठाकरे आणि मी अडीच वर्ष एकत्र काम केलं आहे. आमच्यात कुठेही मतभेद नव्हता. त्यांनी कुठे आणि कधी लुटालूट झाली, हे सांगावं?, असा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवारांनी उद्धव ठाकरेंना उपस्थित केला आहे. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 64 व्या वर्धापन दिनानिमित्त अजित पवार (Ajit Pawar) यांनी पोलीस कवायत मैदान येथे झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी विविध विषयावर भाष्य केलं. राज्यातील जनतेला उष्णतेपासून बचाव करावा काळजी घ्यावी, असा आवाहनही केलं.
अजित पवार नेमकं काय म्हणाले?
अजित पवार म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि मी एकत्र काम केलं आहे. आमच्याच त्यावेळी कोणतेही मतभेद नव्हते. आता ते लयलूट केलं म्हणून म्हणत असेल तर त्यांनी कुठे आणि कधी लयलूट झाली हे सांगावं. सोबतच निवडणुकीच्या दिवसांत अनेकजण अनेकांवर टीका करत असतात. निवडणुकीच्यावेळी कोणतीही टीका किंवा वक्तव्य गांभीर्यानं घ्यायचं नसतं, असं माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांनी सांगितलं होतं, हे मला आठवतं. निवडणुकीच्या काळात असे आरोप होतात.
मोदींनी शरद पवारांचा उल्लेख भटकटी आत्मा असा केला.त्यावर अजित पवारांनी सावध भूमिका घेतली आहे. अजित पवार म्हणाले की, मोदी कोणाला उद्देशून म्हटले ते मला माहिती नाही मी त्या सभेमध्ये होतो. पुढच्या सभेत मला उपस्थित राहण्याची संधी मिळेल तेव्हा मी मोदी साहेबांना विचारले. भटकती आत्मा हा उल्लेख कोणाला डोळ्यासमोर ठेवून केला आहे का हे विचारून तुम्हाला उत्तर देतो.
अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, मी कुणाला धमकी दिली नाही. आज विरोधकाकडे कुठलाही मुद्दा राहिला नाही. आमच्या बद्दल गैरसमज पसरवला जात आहे. आम्ही त्यांच्याबरोबर असतानाही कधी धमक्या दिल्या नाही. यापुढेही धमक्या दिल्या जाणार नाहीत. त्यासोबतच ते म्हणाले की मोदी साहेबांच्या विरोधात कुठलाही मुद्दा विरोधकांना राहिला नाही. खालचे मुद्दे वर येतात. मोदी साहेबांवर भ्रष्टाचाराबद्दल कुठलाही आरोप दहा वर्षात झाला नाही. त्याबद्दल हे कोणी काही बोलत नाही. मोदींमुळे अनेकांना सत्तेपासून बाजूला राहावं लागलं आहे. महाराष्ट्रातील आणि देशातील जनता सुज्ञ आहे.
मराठी भाषिकांना ज्या ज्या सवलती देता येतील त्या सरकारकडून दिल्या जात आहेत; अजित पवार
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत ज्यांनी योगदान दिले त्यांना अभिवादन करतो. ज्या ज्या वेळेस अधिवेशन असतं त्या त्यावेळेस राज्यपालाच्या आधी भाषणात बेळगाव प्रश्न मांडला जातो. सुप्रीम कोर्टात प्रकरण सुरू आहे. आपल्याला सुप्रीम कोर्टाला जाब विचारण्याचा अधिकार नाही. बेळगाव भागातील मराठी भाषिकांना ज्या ज्या सवलती देता येतील त्या सरकारकडून दिल्या जात आहेत सुप्रीम कोर्टात सरकारने चांगले वकील लावले आहेत, असंही ते म्हणाले.
इतर महत्वाची बातमी-
कुठे ऊन, कुठे पाऊस! ठाणे, मुंबईत उन्हाच्या झळा, IMD कडून यलो अलर्ट; विदर्भ, मराठवाड्यात पाऊस