एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कर्नाटक निवडणूक: शिवकुमार 600 कोटी, येडियुरप्पांची संपत्ती....
माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा, काँग्रेस नेते डी के शिवकुमार आणि बेल्लारीच्या तीन खान उद्योगसम्राटांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.
बंगळुरु: कर्नाटक विधानसभा निवडणूक 2018 साठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. भाजप उमेदवार आणि माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा, काँग्रेस नेते डी के शिवकुमार आणि बेल्लारीच्या तीन खान उद्योगसम्राटांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.
महत्त्वाचं म्हणजे या उमेदवारांच्या संपत्तीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
काँग्रेस नेते शिवकुमार यांची संपत्ती
मुख्यमंत्री सिद्धरामय्या सरकारमध्ये महत्त्वाचं पद सांभाळणारे डी के शिवकुमार यांनी कनकपुरा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला.
त्यांनी 94 पानी शपथपत्रात 600 कोटींपेक्षा जास्त संपत्ती असल्याचं जाहीर केलं. शिवकुमार यांच्या संपत्तीत तब्बल 188 टक्कयांची वाढ झाली आहे.
शिवकुमार यांनी 2013 च्या निवडणुकीत 215 कोटी रुपये संपत्ती असल्याचं जाहीर केलं होतं.
दुसरीकडे शिवकुमार यांनी आपल्यावर दोन गुन्हे दाखल असल्याची कबुलीही अॅफेडेव्हिटमध्ये दिली आहे. यामध्ये आयकर विभागाला खोटी माहिती दिल्याच्या गुन्ह्याची नोंद आहे.
आयकर विभागाने गेल्या वर्षी शिवकुमार यांच्यावर छापेमारी केली होती.
येडियुरप्पांची संपत्ती
कर्नाटक भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार बी एस येडियुरप्पा यांनीही काल उमेदवारी अर्ज भरला. येडियुरप्पा शिकारीपुरा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. याच मतदारसंघातून ते 1983 पासून निवडणूक लढवतात.
येडियुरप्पा यांनी आपल्याजवळ 6 कोटी 54 लाख रुपये संपत्ती असल्याचं म्हटलं आहे. याशिवाय 13 एकर जमीन, दोन कमर्शियल बिल्डिंग, बंगळुरू आणि शिकारीपुरा इथं घरं अशी संपत्ती त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केली.
गेल्या निवडणुकीच्या तुलनेत त्यांच्या संपत्तीत 71 लाख रुपये म्हणजेच 12 टक्के वाढ झाली आहे.
दुसरीकडे येडियुरप्पांनी आपल्यावर 14 खटले दाखल असल्याचं म्हटलं आहे.
येडियुरप्पा हे 2008 ते 2011 पर्यंत कर्नाटकातील भाजपचे पहिले मुख्यमंत्री होते. कोट्यवधींच्या खाण घोटाळ्याप्रकरणी त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. इतकंच नाही तर त्यांची तुरुंगात रवानगी झाली होती.
त्यानंतर येडियुरप्पांनी भाजपलाही रामराम ठोकला होता. पण पुन्हा त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
कर्नाटक निवडणूक 2018
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे, तर 15 मे रोजी मतमोजणी होईल.
कर्नाटक विधानसभेत सध्या कुणाच्या किती जागा?
- काँग्रेस – 122
- भाजप – 43
- जेडीएस – 34
- बीएसआरसी – 3
- केजेपी – 2
- केएमपी – 1
- अपक्ष - 8
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement