एक्स्प्लोर

Cyclone Michaung : आंध्रात धडकलं चक्रीवादळ, मिचॉन्गचा विध्वंस सुरुच; वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी

Heavy Rain, Weather News : तामिळनाडूमध्ये दोन, आंध्र प्रदेशमध्ये तीन, चेन्नईमध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. चेन्नईमध्ये नऊ जिल्ह्यांतील 61,600 हून अधिक लोकांना मदत छावण्यांमध्ये हलवण्यात आलं आहे.

Cyclone Latest Update : मिचॉन्ग चक्रीवादळ (Michaung Cyclone) मंगळवारी आंध्र प्रदेशच्या (Andhra Pradesh) दक्षिण किनारपट्टीवर (Landfall) धडकलं आहे. आंध्र प्रदेश किनारपट्टीवर भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. चक्रीवादळामुळे (Cyclone Michaung Update) मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे शहर आणि जवळपासच्या गावांना जोरदार तडाखा बसला आहे. अनेक ठिकाणी झाडे आणि विजेचे खांब उन्मळून पडले आहेत. 5 डिसेंबरला दुपारी दीड ते अडीच वाजेच्या सुमारास तीव्र चक्रीवादळाला आंध्र प्रदेशात बापटलाच्या दक्षिणे किनारपट्टीवर लँडफॉल झाला. यावेळी वाऱ्याचा वेग 90-100 किमी प्रतितास होता. लँडफॉलनंतर मिचॉन्ग चक्रीवादळात कमकुवत झालं आहे. पण, आजपासच्या भागात वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस सुरु आहे. 

लँडफॉलनंतर मिचॉन्ग कमकुवत

चक्रीवादळ 'मिचॉन्ग' आंध्र प्रदेशातील मध्य किनारपट्टीवरील धडकल्याने थोडं कमकुवत झालं आहे. आंध्र प्रदेशातील बापटलापासून अंदाजे 100 किमी उत्तर-वायव्य आणि खम्ममच्या 50 किमी आग्नेयेकडे चक्रीवादळाचा लँडफॉल झाला आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने (IMD) दिली आहे. हवामान खात्याने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, येत्या काही तासात चक्रीवादळाची तीव्रता आणखी कमी होईल, पुढील सहा तासांत चक्रीवादळाचा कहर कमी होईल, असा अंदाज आहे.

चक्रीवादळामुळे 14 जणांचा मृत्यू

चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेश, चेन्नई, तामिळनाडूमध्ये जोरदार पाऊस सुरु आहे. चेन्नई, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये झाडे कोसळणे आणि विजेच्या धक्का लागण्याच्या अनेक दुर्घटना समोर आल्या आहेत. यामध्ये 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तामिळनाडूमध्ये दोन, आंध्र प्रदेशमध्ये तीन, चेन्नईमध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. चेन्नईमध्ये नऊ जिल्ह्यांतील 61,600 हून अधिक लोकांना मदत छावण्यांमध्ये हलवण्यात आल्याची माहिती, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. स्टॅलिन यांनी दिली आहे.

मिचॉन्ग चक्रीवादळ सध्या उत्तरेकडे सरकत आहे आणि येत्या काही तासांत ते आणखी कमकुवत होण्याची शक्यता आहे. मात्र, या काळात मुसळधार पाऊस सुरूच राहील,” अशी माहिती आंध्र प्रदेश राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (APSDMA) ने दिली आहे. चक्रीवादळ उत्तरेकडे सरकल्याने अनेक राज्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान अंदाज एजन्सी सूचित करते की 6 डिसेंबर रोजी उत्तर किनारपट्टीवरील आंध्र प्रदेशात एकाकी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

तेलंगणात मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि 6 डिसेंबर रोजी दक्षिण छत्तीसगड, दक्षिण किनारपट्टी आणि लगतच्या दक्षिण आतील ओडिशात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुसळधार पावसाची शक्यता असल्याने ओडिशाच्या दक्षिणेकडील जिल्हे मंगळवारी रात्री सतर्क होते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Thane Local : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, ठाणे स्थानकात सिग्नल यंत्रणेत मोठा बिघाड: ABP Majha
Thane Local : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, ठाणे स्थानकात सिग्नल यंत्रणेत मोठा बिघाड: ABP Majha
भारताच्या द्वेषाचा मालदीवलाच फटका, भारताने दान केलेली विमाने उडवण्यासाठी सक्षम वैमानिकही नाही
भारताच्या द्वेषाचा मालदीवलाच फटका, भारताने दान केलेली विमाने उडवण्यासाठी सक्षम वैमानिकही नाही
बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर
बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर
Abdu Rozik : अब्दु रोझिकचा साखरपुडा हा पब्लिसिटी स्टंट? स्वत: सांगितले, एका कमी उंचीच्या...
अब्दु रोझिकचा साखरपुडा हा पब्लिसिटी स्टंट? स्वत: सांगितले, एका कमी उंचीच्या...
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Shirdi Water Issue :  पाण्यासाठी कसरत, शिर्डीतील महिला मतदारांसोबत संवादThane Local : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, ठाणे स्थानकात सिग्नल यंत्रणेत मोठा बिघाड: ABP MajhaAmol Kolhe Shirur Loksbaha Voting : माझं लीड कीती हे मतदार राजा सांगेल : अमोल कोल्हेJalgaon Loksabha Voting Center : मतदान केंद्रावर बालसंगोपन, महिला मतदात्यांचा टक्का वाढीसाठी प्रयत्न

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Thane Local : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, ठाणे स्थानकात सिग्नल यंत्रणेत मोठा बिघाड: ABP Majha
Thane Local : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, ठाणे स्थानकात सिग्नल यंत्रणेत मोठा बिघाड: ABP Majha
भारताच्या द्वेषाचा मालदीवलाच फटका, भारताने दान केलेली विमाने उडवण्यासाठी सक्षम वैमानिकही नाही
भारताच्या द्वेषाचा मालदीवलाच फटका, भारताने दान केलेली विमाने उडवण्यासाठी सक्षम वैमानिकही नाही
बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर
बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर
Abdu Rozik : अब्दु रोझिकचा साखरपुडा हा पब्लिसिटी स्टंट? स्वत: सांगितले, एका कमी उंचीच्या...
अब्दु रोझिकचा साखरपुडा हा पब्लिसिटी स्टंट? स्वत: सांगितले, एका कमी उंचीच्या...
Subodh Bhave :
"बदल घडवायचा असेल तर घराबाहेर पडा आणि मत द्या"; अभिनेता सुबोध भावेचं मतदारांना आवाहन
मुंबईत पावसाचा अंदाज, ठाणे-रायगडमध्ये यलो अलर्ट;  मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारपिटीचा इशारा
मुंबईत पावसाचा अंदाज, ठाणे-रायगडमध्ये यलो अलर्ट; मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारपिटीचा इशारा
Lok Sabha Election 4 Phase Voting : लोकसभेची रणधुमाळी : चौथ्या टप्प्यात 96 जागांवर मतदान, अखिलेश यादव, असदुद्दीन ओवेसी ते दानवेंच्या भविष्याचा फैसला होणार
Lok Sabha Election 4 Phase : लोकसभेच्या चौथ्या टप्प्यात 96 जागांवर मतदान, अखिलेश यादव, ओवेसी ते दानवेंच्या भविष्याचा फैसला होणार
Allu Arjun : हैदराबादमधून अल्लू-अर्जुन मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर; पाहा फोटो
हैदराबादमधून अल्लू-अर्जुन मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर; पाहा फोटो
Embed widget