Weather Update : चक्रीवादळामुळे पावसानं झोडपलं! पुढील 48 तास हवामान कायम राहण्याचा अंदाज, 'या' राज्यांमध्ये पावसाची शक्यता
IMD Rain Alert : पुढील 24 तासांत दक्षिण भारतासह महाराष्ट्रातही पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील चार दिवस हवामान कायम राहणार असून जास्त बदल होण्याची शक्यता नाही.
Heavy Rain Updates : दक्षिण बंगालच्या उपसागरावरील खोल दाबामुळे तयार झालेलं तीव्र चक्रीवादळ 'मिचॉन्ग' (Cyclone Michaung) आंध्र प्रदेशामध्ये (Andhra Pradesh) धडकलं आहे. दक्षिणेकडील किनारपट्टीवर चक्रीवादळाच्या लँडफॉलनंतर आजूबाजूच्या भागात तुफानी वाऱ्यांसह पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश आणि पूर्वेकडील ओडिशामध्ये वादळाचा परिणाम दिसून येत असून येथे पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुढील 24 तासांत दक्षिण भारतासह महाराष्ट्रातही पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील चार दिवस हवामान कायम राहणार असून जास्त बदल होण्याची शक्यता नाही.
येत्या 48 तासांत पावसाचा अंदाज
चक्रीवादळामुळे दक्षिण भारतासह देशभरातील हवामानावर परिणाम दिसून येईल. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसर, दक्षिण-मध्य, दक्षिण-पूर्व आणि नैऋत्य भागात काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. 7 डिसेंबरला सर्वाधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या 48 तासांत आंध्र प्रदेश, चेन्नई आणि तामिळनाडूमधील अनेक जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
'या' भागात पावसाची शक्यता
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील चार दिवस देशाच्या बहुतांश भागात हलके धुके राहण्याची शक्यता आहे. 7 डिसेंबरपर्यंत अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. पुढील 48 तासांत चेन्नई, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिसा आणि महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. देशाच्या उत्तर-पश्चिम आणि उत्तर मध्य भागात हवामान कोरडं राहण्याचा अंदाज आहे. बिहारमध्ये हवामान कोरडं राहिल. लखनौमध्ये पावसाची रिमझिम सुरु आहे.
Severe Cyclonic Storm MICHAUNG weakened into a Cyclonic Storm at 1530hrs IST, lay centered at 1730hrs IST of 5 December over south Coastal Andhra Pradesh about 25km west-northwest of Bapatla and 60 km north-northeast of Ongole. Likely to move nearly northwards & weaken further. pic.twitter.com/yZ1w7Y0ajo
— India Meteorological Department (@Indiametdept) December 5, 2023
पर्वतीय भागात बर्फवृष्टी
चक्रीवादळ दक्षिणेकडील राज्यांत वेगाने पुढे सरकर असून देशाच्या पर्वतीय भागात बर्फवृष्टी सुरू आहे. काही मैदानी भागातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रात नांदेल, वर्धा, लातूर, औरंगाबादमध्ये जोरदार पाऊस झाला आहे. यामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मध्य प्रदेशात मुसळधार पाऊस आणि गारपिटीमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. राजस्थानमध्येही पावसाचा येलो अलर्ट कायम आहे. पंजाब आणि हरियाणामध्ये दोन दिवसांपूर्वी पाऊस झाला आहे. दरम्यान, दिल्लीतून कडाक्याची थंडी गायब आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :