एक्स्प्लोर

Crime News: डोकं अन् शरीराचे अवयव कापून पिशवीत टाकलेल्या मर्डर केसचं गूढ अखेर उकललं; डॉक्टर जावयानेच आपल्या सासूची केली निर्घृणपणे हत्या, प्रोफेशनल पद्धतीनं 19 तुकडे....

Crime News: कर्नाटकमध्ये डॉक्टर जावयानेच आपल्या सासूची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रामचंद्रप्पा असे आरोपीचे नाव आहे.त्याने हत्या केल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेहाचे तुकडे केले.

बंगळुरु:  कर्नाटकातील कोराटगेरे येथील कोलाला गावात रस्त्याच्या कडेला काही प्लास्टिक पिशव्यांमध्ये एका महिलेचे कापलेले शीर आणि शरीराचे इतर कापलेले तुकडे आढळून आले होते. त्या हत्येचा आता खुलासा झाला असून डॉक्टर असलेल्या जावयानेच आपल्या सासूची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे करून फेकले असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी डॉक्टरसह त्याचा सासरा आणि त्याच्या दोन साथीदारांना अटक केली आहे. डॉ. रामचंद्रप्पा असं डॉक्टर जावयाचं नाव आहे. रामचंद्रप्पानं त्याच्या सासूची संशयातून हत्या केल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर प्रकरणाचे पुरावे नष्ट करण्यासाठी तिच्या मृतदेहाचे 19 तुकडे केले आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले.

घटना कशी आली समोर?

काही दिवसांपूर्वी एक कुत्रा मानवी हात तोंडात घेऊन फिरत असल्याचा कॉल पोलिसांना आला. यानंतर पोलीस लगेचच तुमकुरु जिल्ह्यातील कोरतागेरे तालुक्यातील चिम्पुगनहल्ली गावात पोहोचले. पोलिसांनी तपास सुरु केला. तेव्हा पोलिसांना आजुबाजूच्या 5 किलोमीटरच्या परिसरामध्ये महिलेचे विविध ठिकाणी एकूण 19 शरीराचे तुकडे सापडले. पण पोलिसांच्या शीर सापडलं नाही. मृतदेहाची ओळख पटवण्याचं आव्हान पोलिसांसमोर होतं. परिसरात सीसीटीव्ही नव्हते, कोणी प्रत्यक्षदर्शीही नव्हता. फॉरेन्सिक चाचणीतून मृतदेह महिलेचा असल्याचं लक्षात आलं. तिच्या शरीरावरती दागिने होते. त्यावरुन हत्या लूटमारीच्या हेतूनं झाली नसल्याची खात्री पटली. त्यानंतर पोलिसांनी बेपत्ता असलेल्या माहिलांची यादी काढली आणि तपास सुरू केला.

लक्ष्मीदेवी तिची लेक तेजस्वीच्या घरातून निघताना दिसली

पोलिसांच्या तपासामध्ये 47 वर्षीय बी. लक्ष्मीदेवी उर्फ लक्ष्मीदेवम्माचं नाव समोर आलं. ती बेल्लावे गावची रहिवासी होती. तिचा पती बसवराज सुतार आहेत. त्यांनी पोलिसात पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार काही दिवसांपूर्वी दाखल केली होती. 3 ऑगस्टला लक्ष्मीदेवी तिची लेक तेजस्वीच्या घरातून निघताना दिसली होती. तेजस्वी हनुमंतपुरामध्ये वास्तव्यास आहे. पोलिस तपास करत असतानाच दोन दिवसांनंतर कोरतागेरेमधील एका निर्जनस्थळी महिलेचं शीर सापडलं. पती बसवराजनं ओळख पटवली. लक्ष्मीदेवी यांना अतिशय नियोजनबद्धपणे हत्या करण्यात आली असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. हत्या करणारा परिचयाचा असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.

या हत्येच्या तपासासाठी पोलिसांनी अनेक पथके तयार केली. 3 ऑगस्टला दुपारी पांढऱ्या रंगाची एसयूव्ही कार हनुमंतपुराहून कोरतागेरेला गेल्याची माहिती पोलिसांना समजली. कारच्या मागे, पुढे वेगळी नंबर प्लेट होती आणि दोन्ही बोगस होत्या. पोलिसांनी या कारचा खरा नंबर शोधून काढला. ती कार उर्दीगेरे गावातील शेतकरी सतीश यांच्या मालकीची असल्याचं लक्षात आलं. कारला बोगस नंबर प्लेट लावून शेतकरी सतीश त्या परिसरातून का गेला, जिथे नंतर मृतदेहाचे तुकडे सापडले, हा प्रश्न उपस्थित झाला होता.

पोलिसांनी कार मालक असलेल्या सतीशचे कॉल रेकॉर्ड शोधायला सुरुवात केली. 3 ऑगस्टच्या दुपारी म्हणजेच ज्या दिवशी लक्ष्मीदेवी बेपत्ता झाल्या, तेव्हा सतीश यांचा मोबाईल बंद होता. यानंतर पोलिसांनी सतीशला चौकशीला बोलावलं. त्यावेळी तो चिकमंगळुरुला गेलेला होता. पोलिसांनी त्याला आणि त्याचा साथीदार किरणला होरानाडू मंदिरातून पकडलं. त्यांना तुमकुरुला आणण्यात आलं.यानंतर एसयूव्हीच्या खरेदी-विक्री व्यवहाराची माहिती समोर आली. कार काही महिन्यांपूर्वी तुमकुरुमध्ये राहणारा दंत चिकित्सक रामचंद्रय्यानं खरेदी केली होती. पण तिची नोंदणी सतीशच्या नावे होती. डॉ. रामचंद्रय्या पीडिता लक्ष्मीदेवी यांचा जावई असल्याचं तपासातून पुढे आलं. तेजस्वी ही रामचंद्रय्याची दुसरी पत्नी आहे. ती रामचंद्रय्यापेक्षा 20 वर्षांनी लहान आहे. दोघांना 3 वर्षांचा मुलगा आहे.

पोलिसांनी 11 ऑगस्टला डॉ. रामचंद्रय्याला पोलीस स्टेशनला बोलावलं. त्याला किरण आणि कारमालक असलेल्या सतीश समोर बसवलं. तिघांना या हत्येबाबतचे प्रश्न विचारण्यात आले. तेव्हा दबावाखाली आलेल्या सतीशनं सगळं खरं सांगितलं. यानंतर बाकी दोघांनी देखील गुन्ह्याची कबुली दिली.

संशयातून केली सासूची हत्या

सासू लक्ष्मीदेवी आपल्या संसारात लुडबूड करते आणि स्वत:च्या लेकीला देहविक्री करण्यास भाग पाडत असल्याचा संशय रामचंद्रय्याला होता. सासूमुळे आपलं घर तुटेल, अशी भीती त्याला वाटत होती. त्यानं सहा महिन्यांपूर्वी आपल्या सासूच्या हत्येचा प्लँन आखला. त्यासाठी पांढऱ्या रंगाची एसयूव्ही खरेदी केली. पकडले जाऊ नये म्हणून तिची नोंदणी सतीशच्या नावे ठेवली. सतीश आणि किरणला 4-4 लाख रुपयांचं आमिष दाखवलं. त्यातील 50-50 हजार रुपये आधी दिले.

3 ऑगस्टला लक्ष्मीदेवी लेकीच्या घरातून निघाली. तेव्हा डॉ. रामचंद्रय्यानं तिला बेल्लावेला येथे सोडण्याच्या बहाण्यानं कारमध्ये बसवलं. एसयूव्ही कारमध्ये सतीश आणि किरण लपलेले होते. लक्ष्मीदेवी कारमध्ये बसताच तिची गळा दाबून हत्या करण्यात आली. यानंतर मृतदेह कोलाला येथे असलेल्या सतीशच्या शेतात नेण्यात आला. मृतदेह कारच्या डिक्कीमध्ये ठेवून तिघे तिथेच झोपले.

दुसऱ्या दिवशी जावयाने धारदार शस्त्रानं लक्ष्मीदेवीच्या मृतदेहाचे तुकडे केले. पेशानं डॉक्टर असलेल्या रामचंद्रय्या यानी अतिशय पद्धतशीरपणे शरीरापासून हात, पाय आणि शीर ह् अवयव वेगळे केले. प्रोफेशनलपणे त्यानं मृतदेहाचे तुकडे केले. यानंतर 19 निर्जन ठिकाणी मृतदेहांचे तुकडे फेकण्यात आले. मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी फेकण्यात आले होते. पण अखेर पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करत आरोपींना बेड्या ठोकल्या.

महत्त्वाच्या बातम्या

रिटायरमेंट अवघ्या 5 दिवसांवर असताना IAS अधिकाऱ्याविरोधात ACB कडून गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल!
रिटायरमेंट अवघ्या 5 दिवसांवर असताना IAS अधिकाऱ्याविरोधात ACB कडून गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल!
UPI Tap And Pay Feature: UPI मध्ये नवीन टॅप अँड पे सुविधा! आता एटीएम किंवा क्रेडिट कार्डची गरज नाही, थेट फोन स्वॅप करा अन् पैसे पाठवा; इंटरनेटची सुद्धा गरज नाही, एकावेळी किती हजारची मर्यादा?
UPI मध्ये नवीन टॅप अँड पे सुविधा! आता एटीएम किंवा क्रेडिट कार्डची गरज नाही, थेट फोन स्वॅप करा अन् पैसे पाठवा; इंटरनेटची सुद्धा गरज नाही, पेमेंट फेल झाल्यास तत्काळ परतावा, एकावेळी किती हजारची मर्यादा?
तुम्हाला UPSC करायचीय? पहिल्याच प्रयत्नात कसं यशस्वी व्हायचं? 23 व्या वर्षी पहिल्याच परीक्षेत IPS झालेल्या अधिकाऱ्यानं सांगितला कानमंत्र
तुम्हाला UPSC करायचीय? पहिल्याच प्रयत्नात कसं यशस्वी व्हायचं? 23 व्या वर्षी पहिल्याच परीक्षेत IPS झालेल्या अधिकाऱ्यानं सांगितला कानमंत्र
OneTag: मोबाईल सिमप्रमाणे फास्टॅग सुद्धा पोर्ट करता येणार, स्टिकर न बदलता बँक बदलण्यासाठी 'वनटॅग' सेवा
मोबाईल सिमप्रमाणे फास्टॅग सुद्धा पोर्ट करता येणार, स्टिकर न बदलता बँक बदलण्यासाठी 'वनटॅग' सेवा

व्हिडीओ

MPSC Paper Leak : पेपरफुटीचं जाळं, तोंडाला काळ Special Report
Pune Fake Khawa : भेसळखोरीचा खवा, मुंढेजी धडा शिकवा Special Report
Navi Mumbai MPSC Mahendra Harpalkar News : MPSC सचिवांना काळं फासलं,संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका
Nitin Gadkari On Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्ग १६-१७ वर्षे रखडल्याबद्दल लाज वाटते, उद्घाटनाला जाणार नाही
Eknath Shinde Visit London : साहेबांच्या देशात... साहेबाच्या भाषेत... | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रिटायरमेंट अवघ्या 5 दिवसांवर असताना IAS अधिकाऱ्याविरोधात ACB कडून गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल!
रिटायरमेंट अवघ्या 5 दिवसांवर असताना IAS अधिकाऱ्याविरोधात ACB कडून गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल!
UPI Tap And Pay Feature: UPI मध्ये नवीन टॅप अँड पे सुविधा! आता एटीएम किंवा क्रेडिट कार्डची गरज नाही, थेट फोन स्वॅप करा अन् पैसे पाठवा; इंटरनेटची सुद्धा गरज नाही, एकावेळी किती हजारची मर्यादा?
UPI मध्ये नवीन टॅप अँड पे सुविधा! आता एटीएम किंवा क्रेडिट कार्डची गरज नाही, थेट फोन स्वॅप करा अन् पैसे पाठवा; इंटरनेटची सुद्धा गरज नाही, पेमेंट फेल झाल्यास तत्काळ परतावा, एकावेळी किती हजारची मर्यादा?
होर्मुझनंतर आता आणखी एक तेलमार्ग संकटात; हौथी बंडखोरांनी अल मंदेब ताब्यात घेतला, आशिया आणि युरोप दरम्यान महत्त्वाचा सागरी मार्ग, कोणाची जहाजे सोडणार अन् कोणता नाही हे सुद्धा जाहीर केलं!
होर्मुझनंतर आता आणखी एक तेलमार्ग संकटात; हौथी बंडखोरांनी अल मंदेब ताब्यात घेतला, आशिया आणि युरोप दरम्यान महत्त्वाचा सागरी मार्ग, कोणाची जहाजे सोडणार अन् कोणता नाही हे सुद्धा जाहीर केलं!
Video: इस्रायलने लेबनॉनमधील 2 किमी लांबीचा बोगदा तब्बल 1100 टन स्फोटकांनी उडवला; स्फोटानंतर 4.1 तीव्रतेचा भूकंपासारखा झटका
Video: इस्रायलने लेबनॉनमधील 2 किमी लांबीचा बोगदा तब्बल 1100 टन स्फोटकांनी उडवला; स्फोटानंतर 4.1 तीव्रतेचा भूकंपासारखा झटका
OneTag: मोबाईल सिमप्रमाणे फास्टॅग सुद्धा पोर्ट करता येणार, स्टिकर न बदलता बँक बदलण्यासाठी 'वनटॅग' सेवा
मोबाईल सिमप्रमाणे फास्टॅग सुद्धा पोर्ट करता येणार, स्टिकर न बदलता बँक बदलण्यासाठी 'वनटॅग' सेवा
मुंबईकर गणपतीसाठी गावी निघाला, ट्रॅफिकमध्ये अडकला; पश्चिम द्रुतगती महामार्गावर 40 मिनिटांच्या प्रवासासाठी 2 तास
मुंबईकर गणपतीसाठी गावी निघाला, ट्रॅफिकमध्ये अडकला; पश्चिम द्रुतगती महामार्गावर 40 मिनिटांच्या प्रवासासाठी 2 तास
दिशाच्या वडिलांचा जबाब सीबीआयकडे नोंद; दोन दिवसांतच FIR दाखल होणार, आरोपींना अटक करण्याची मागणी
दिशाच्या वडिलांचा जबाब सीबीआयकडे नोंद; दोन दिवसांतच FIR दाखल होणार, आरोपींना अटक करण्याची मागणी
मोदी म्हणाले, जगाची निम्मी लोकसंख्या BRICS मध्ये; तिकडं रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन युरोपवर बरसले, म्हणाले, 'जी7 ला 'ग्रुप ऑफ सेव्हन' का म्हटलं जातं कळत नाही..'
मोदी म्हणाले, जगाची निम्मी लोकसंख्या BRICS मध्ये; तिकडं रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन युरोपवर बरसले, म्हणाले, 'जी7 ला 'ग्रुप ऑफ सेव्हन' का म्हटलं जातं कळत नाही..'
Embed widget