Sitaram Yechury : सीताराम येचुरी यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार, प्रकृती अस्वास्थ्यामुळे एम्समध्ये दाखल
Sitaram Yechury : मार्क्सवादी कम्यूनिष्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
नवी दिल्ली : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (CPI-M) नेते सीताराम येचुरी (Sitaram Yechury hospitalised) यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आळे आहे. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत आहेत. त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्याचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
सीताराम येचुरी यांना न्यूमोनियाचा त्रास
सीताराम येचुरी यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णायात उपचार चालू आहेत. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना लगेच रुग्णालयातील आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आलं. त्यानंतर त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आलं. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार त्यांना न्यूमोनियाचा त्रास आहे. सोमवारी म्हणजेच 19 ऑगस्ट 20124 रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यांना गेल्या काही दिवसांपासून ताप आणि सर्दीचा त्रास जाणवत होता. पण प्रकृती जास्तच खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
सध्या प्रकृती स्थिर, काही दिवसांपूर्वी मोतीबिंदूची शस्त्रक्रिया
रुग्णालयात दाखल होताच त्यांच्या योग्य त्या सर्व तपासण्या करण्यात आल्या. त्यानंतर त्यांना आपत्कालीन विभागानंतर अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं. सूत्रांच्या माहितीनुसार सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. सीताराम येचुरी यांच्यावर काही दिवसांपूर्वीच मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर आता त्यांना न्यूमोनियाचा त्रास होत असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत.
हेही वाचा :
नवाब मलिकांच्या कन्येस राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी; अजित पवार म्हणाले, सना तू घाबरू नको
भावा बहिणीच्या नात्याचा गोडवा जपला, धनंजय मुंडे, महादेव जानकर यांना पंकजा मुंडे यांनी बांधली राखी