Vaccine Certificate : आता व्हॉट्सअॅपवरही मिळेल लसीकरण प्रमाणपत्र, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
Vaccine Certificate On WhatsApp : कोरोना लसीकरण प्रमाणपत्र आज सर्वच ठिकाणी सक्तीचं आणि महत्वाचं आहे
Vaccine Certificate On WhatsApp : भारतासह जगभरात कोरोना महामारीनं हाहा:कार माजवलाय. कोरोनावर मात करण्यासाठी देशभरात लसीकरण मोहिम राबवण्यात आली. अशातच कोरोनाच्या ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंटने शिरकाव केला. त्यामुळे पुन्हा लॉकडान लागणार का? यासारख्या चर्चेला सुरुवात झाली. आवश्यक कामांशिवाय घराबाहेर पडू नका आणि नेहमीच मास्क वापरा, असं राज्य आणि केंद्र सरकारकडून आवाहन कऱण्यात येत आहे. तसेच कोरोना प्रमाणपत्र सोबत असणे सक्तीचं केलं आहे. कोरोना लसीकरण प्रमाणपत्र आज सर्वच ठिकाणी सक्तीचं आणि महत्वाचं आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचे आपण दोन डोस घेतल्याचा दाखला हे प्रमाणपत्र आहे. लसीकरणाद्वारे आपल्या राज्यातून दुसऱ्या राज्यात किंवा देशात अन् विदेशात प्रवास करू शकता. अशातच काही लोकांना लसीकरणाचं प्रमाणपत्र कसं डाऊनलोड करावं, याबाबतची माहिती नसते. ऐन वेळी एखाद्या सरकारी अधिकाऱ्यानं प्रमाणपत्र मागितल्यानंतर गोंधळ उडतो. हा गोंधळ दूर करण्यासाठी क्षणभरात व्हॉट्सअॅपवर लसीकरण प्रमाणपत्र मिळेल.
काय आहे संपूर्ण प्रक्रिया ?
प्रथम तुमच्या नोंदणीकृत मोबाईल +91 9013151515 हा नंबर सेव्ह करा
मग व्हॉट्सअॅप चॅट उघडा आणि कोविड प्रमाणपत्र (covid certificate) टाइप करा
ओटीपी कन्फर्म करा -
सर्वप्रथम, तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर +91 9013151515 हा नंबर सेव्ह करावा लागेल (येथे नमूद करणे महत्वाचे आहे की हा नंबर तुम्ही लस घेताना प्रविष्ट केलेल्या त्याच मोबाईल नंबरवर सेव्ह करावा लागेल.) हा नंबर सेव्ह केल्यानंतर तुमचे व्हॉट्सअॅप उघडा. चॅट बॉक्स वर जा आणि covid प्रमाणपत्र टाइप करा. हे टाइप केल्यानंतर तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर सहा अंकी ओटीपी मिळेल.
हा OTP व्हॉट्सअॅप चॅट बॉक्समध्येच टाईप करा आणि पाठवा. लक्षात ठेवा की तुम्हाला मिळणारा OTP फक्त 30 सेकंदांसाठी असेल. जर तुम्ही कुटुंबातील इतर सदस्यांच्या लसीकरणाच्या वेळी समान नंबर दिला असेल तर ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला त्या सर्व सदस्यांचे लसीकरण प्रमाणपत्र डाउनलोड करण्याचा पर्याय मिळेल.
संबधित बातम्या :
ना झंझट, ना कटकट, मोबाईलवर कोरोना लसीचं सर्टिफिकेट, 5 सोप्या टिप्स