जगभरात रशियन वॅक्सिन Stupnik V चे आतापर्यंत 1.2 बिलियन डोस बुक; यादीत भारताचाही समावेश
रशियाने काही दिवसांपूर्वी जगातील पहिलं कोरोना वॅक्सिन तयार केल्याचा दावा केला होता. रशियाचा या कोरोना व्हायरसवरील लसीचं नाव आहे, 'स्पुतनिक व्ही'. वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार, रशियन कोरोना वॅक्सिनचे आतापर्यंत 1.2 बिलियन डोस बुक करण्यात आले आहेत.

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात थैमान घातलं आहे. जगभरात या व्हायरसवर प्रभावी लस तयार करण्यासाठी अनेक देशांमधील शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. अशातच रशियाने काही दिवसांपूर्वी जगातील पहिलं कोरोना वॅक्सिन तयार केल्याचा दावा केला होता. रशियाचा या कोरोना व्हायरसवरील लसीचं नाव आहे, 'स्पुतनिक व्ही'. वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार, रशियन कोरोना वॅक्सिनचे आतापर्यंत 1.2 बिलियन डोस बुक करण्यात आले आहेत. आशियाचे जवळपास 10, साऊथ अमेरिका आणि मिडल इस्टच्या देशांनी हे डोस बुक केल्याचं सांगितलं आहे. या यादीत भारताच्या नावाचाही समावेश आहे.
भारतात हैदराबादच्या डॉ. रेड्डी लॅबोरेटरीने या वॅक्सिनचे 100 मिलियन डोसचं वितरण आणि ट्रायलसाठी भागीदारी केली आहे. रशियन डेव्हलपर्सही भारतात वॅक्सिन तयार करण्यासाठी एका भारतीय भागीदाराच्या शोधात आहेत. रिपोर्टनुसार, ब्राझील, दक्षिण आफ्रिका, मॅक्सिको, सौदी अरेबिया आणि दुसऱ्या देशांनी आपल्या देशातील लोकांसाठी रशियन लस उपलब्ध करण्यासाठी रशियासोबत करार केला आहे. याव्यतिरिक्त रशियाने दावा केला आहे की, 'जवळपास दहा आणखी देश लस विकत घेण्यासाठी त्यांच्यासोबत चर्चा करत आहेत. रिपोर्टनुसार, रशियाच्या वॅक्सिनचे 1.2 बिलियन डोस बुक करण्यात आले आहेत.'
दरम्यान, स्पुतनिक व्ही वॅक्सिन सार्वजनिक उपयोगासाठी समंती मिळणारी पहिली लस आहे. जिला ऑगस्टच्या दुसऱ्या आठव्यात संमती देण्यात आली होती. याआधी चीनच्या एका वॅक्सिनला सार्वजनिक उपयोगासाठी परवानगी देण्यात आली होती.
भारतातील वॅक्सिनची स्थिती
भारतातही कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव सतत वाढत आहे. गेल्या 24 तासांत 86,961 नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तर 1130 लोकांचा जीवही गेला आहे. भारतात कोरोनावर तीन लसींच्या चाचण्या सुरु आहेत. ज्यांपैकी तीन स्वदेशी आहे. पहिली भारत बायोटेक आणि आयसीएमआर द्वारे तयार करण्यात आलेली वॅक्सिन आहे. दुसरी जायडस कॅडिला (zydus cedilla) ची आहे. या दोन्ही लसींचं ह्यूमन ट्रायल सुरु आहे. देशात जवळपास 8 वॅक्सिन आतापर्यंत डेव्हलप करण्यात आले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
कोरोनापासून बचाव करणार संगणकाद्वारे डिझाईन केलेलं 'हे' खास प्रोटीन!
Novavax सीरम इन्स्टिट्यूटसोबत कोविड 19 लसीचं उत्पादन करणार; कराराची घोषणा
भारत बायोटेकच्या बहुप्रतीक्षित 'कोवॅक्सीन' लसीची दुसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु























