(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronavirus | कोरोनाच्या लढ्यात भारताचं मोठं यश! स्वदेशी एलीसा (Elisa) अँटीबॉडी टेस्ट किटची निर्मिती
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर भारताला मोठं यश मिळालं आहे. आय सी एम आर आणि एनआयव्ही कडून पूर्णपणे स्वदेशी अशा अँटीबॉडी टेस्ट किट ची निर्मिती करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर भारताच्या प्रयत्नांना मोठं यश मिळालं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Union Health Ministry) यासंदर्भात माहिती दिली आहे. भारताने कोरोना व्हायरस (coronavirus) विरोधातील लढाई एक मोठा टप्पा गाठत, एक टेस्टिंग किट विकसित केलं आहे. या किटमुळे अगदी कमी वेळात कोरोनाची तपासणी करणं शक्य होणार असून देशभरात हे किट तपासणीसाठी लवकरच उपलब्ध होणार आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी, पुणे (NIV Pune) यांनी कोविड-19 च्या तपासणीसाठी पूर्णपणे स्वदेशी अशा एलीसा (Elisa) अँटीबॉडी टेस्ट किटची निर्मिती केली आहे.
RT PCR या कोविड टेस्टमुळे कोरोना व्हायरसची बाधा झालीय की नाही हे समजतं, तर पूर्णपणे स्वदेशी IgG एलिसा कोविड कवच टेस्टमुळे किती मोठ्या लोकसंख्येला किंवा समूहाला लागण होऊ शकते, हे समजण्यास मदत होणार आहे. या किटची गुणवत्ता तपासण्यासाठी मुंबईतील 2 वेगवेगळ्या परिसरांत या किट्सचा वापर करून तपासण्या करण्यात आल्या. त्यातून याचे परिणाम योग्य असल्याचं दिसून आलं. अडिच तासांत या किट्सच्या माध्यमातून 90 सॅम्पल्स टेस्ट करण्यात आल्या आहे. ड्र्ग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI)ने या किट्सच्या कमर्शिअल प्रोडक्शनसाठी जायडस कॅडिला (zydus cadila)ला परवानगी दिली आहे. दरम्यान, देशात जे टेस्ट किट विकसित करण्यात आलं आहे, ते एक अँटीबॉडी टेस्ट किट आहे. प्रशासनाकडून दिलेल्या माहितीनुसार, हे किट्स लवकरच देशभरात उपलब्ध होणार आहेत.
कोरोनाचं म्युटेशन हे आव्हान, पण सीरम इन्स्टिट्यूटची लस सर्व म्युटेशनवर प्रभावी ठरेल : अदर पूनावाला
अँटीबॉडी टेस्ट आणि आरटीपीसीआर काय आहे?जेव्हा एखादी व्यक्ती कोणत्याही व्हायरसमुळे बाधित होते, त्यावेळी तिच्या शरीरात व्हायरशी लढण्यासाठी अँटीबॉडीज तयार होतात. शरीरात असलेल्या अँटीबॉडीजचा शोध घेण्यासाठी रॅपिड टेस्टची गरज असते. अँटीबॉडी टेस्टचा अहवाल अगदी कमी वेळात येतो. तर कोरोना तपासणीसाठी वापरल्या जाणाऱ्या RT PCR चा अहवाल येण्यासाठी जवळपास 24 तास लागतात.
अँटीबॉडी टेस्टसाठी रक्ताचा नमुना घेतला जातो. एक किंवा दोन थेंब रक्त घेऊन याची तपासणी केली जाते. ज्यामुळे शरीराच्या इम्युन सिस्टमने व्हायरसशी लढण्यासाठी अँटीबॉडी तयार केले आहेत की, नाही? यासंदर्भात माहिती मिळते. सध्या कोरोना व्हायरसची बाधा झाली आहे की नाही, याची तपासणी करण्यासाठी रियल टाइम पीसीआर टेस्ट (RTPCR) करण्यात येतं. यामध्ये संबंधित रुग्णाचा स्वॅब सॅम्पल घेण्यात येतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, पूर्णपणे स्वदेशी अशा एलीसा (Elisa) अँटीबॉडी टेस्ट किटची निर्मिती ही देशातच केली जाणार असून त्यासाठी इतर देशांवर अवलंबून राहावं लागणार नाही.
संबंधित बातम्या :
12 मे पासून विशेष रेल्वे सेवा, पहिल्या टप्प्यात दिल्लीहून देशात 15 ठिकाणी वाहतूक