एक्स्प्लोर

कोरोनाचं म्युटेशन हे आव्हान, पण सीरम इन्स्टिट्यूटची लस सर्व म्युटेशनवर प्रभावी ठरेल : अदर पूनावाला

काही शास्त्रज्ञ कोरोना व्हाययरसवर लस विकसित करण्याच्या अंतिम टप्प्यात असल्याचा दावा करत आहेत. दुसरीकडे काही देशांमधील शास्त्रज्ञ मंडळी कोविड-19च्या मूळ विषाणूमध्ये म्युटेशन होत असल्यामुळे काळजी व्यक्त करत आहेत.

मुंबई :कोविड-19 विषाणू जगभरातल्या तज्ज्ञ आणि संशोधकांसाठी मोठं आव्हान ठरतोय. कोरोना व्हायरस सतत उत्क्रांत होत आहे. त्याचं बदलत चाललेलं स्वरुप शास्त्रज्ञांसाठी एक आव्हान बनलं आहे. लक्षणं न आढळणारा रुग्ण हे त्या उत्क्रांत झालेल्या व्हायरसमुळेच समोर येत आहेत. मात्र असं असलं तरी सीरम इन्स्टिट्यूटची लस सर्व म्युटेशनवर प्रभावी ठरेल, असं सीरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख अदर पूनावाला यांनी म्हटलं आहे. आपण विकसित करत असलेली लस ही ब्रॉड-स्पेक्ट्रम प्रकारातील आहे. ही लस वेगवेगळ्या सर्व म्युटेशनवर परिणामकारण ठरणारी असेल. जर आपल्याला काही गंभीर बदल असल्याचे आढळले तर आपल्याला सध्याच्या लसीची कार्यक्षमता निश्चित करण्यासाठी फक्त नवी चाचणी करावी लागेल, असं पूनावाला यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. विषाणूमधील म्युटेशन चिंतेचा विषय अनेक देश एकीकडे नोवेल कोरोना वायरसवर लस विकसीत करण्याच्या अंतिम टप्यात असल्याचा दावा करत असताना किंवा लस विकसित झाल्याचा दावा करत आहेत. मात्र दुसरीकडे काही देशांची शास्त्रज्ञ मंडळी कोविड-19च्या मूळ विषाणूमध्ये म्युटेशन होत असल्यामुळे म्हणजे उत्क्रांती (रचनात्मक बदल) होत असल्यामुळे काळजी व्यक्त करत आहेत.  बदललेला दुसरा विषाणू जास्त संर्सगजन्य असून तो कदाचित जास्त घातक ठरत असल्याची चिंता देखील शास्त्रज्ञ व्यक्त करत आहेत.  48 टक्के भारतीय विषाणू प्रकारांमध्ये उत्क्रांती भारतातील दिल्ली स्थित CSIR – IGIB संस्थेचे डॉ. विनोद स्कारिया व ऑस्ट्रेलियातील CSIROचे मूळ भारतीय असलेले शास्त्रज्ञ प्रा. एस.एस. वासन यांनी भारतातले कोरोनाचे 82 जिनॉमिक सिक्वेंन्स अभ्यासले. यातील 48 टक्के भारतीय विषाणू प्रकारांमध्ये उत्क्रांती (रचनात्मक बदल) झाल्याचे आढळून आले आहेत, अशी निरिक्षणं दोघांनी मांडली आहेत. घातक रोगजन्य विषाणूंचा अभ्यास करणाऱ्या प्रा.वासन यांच्यामते लॉकडाऊन हळूहळू काढताना दोन बाबी महत्वाच्या आहेत. पहिली म्हणजे या विषाणूत होणाऱ्या म्युटेशनवर लक्ष ठेवणे आणि दुसरी बाब म्हणजे कोविड-19वर ज्या लसी विकसित होत आहेत त्या रूग्णांना मॉनिटर करणे गरजेचे आहे. याशिवाय जगभरातील 7167 जिनॉमिक सिक्वेंन्स अभ्यासले असता त्यापैकी दोन तृतीअंश स्ट्रेन्स म्हणजे 66 टक्के प्रकारांमध्ये उत्क्रांती झाल्याचे ऑस्ट्रेलियाच्या CSIROचे प्रमुख डॉ. डेनिस बॉअर यांनी सांगितले. कोरोना विषाणूमधील स्पाईक प्रोटिन ज्याला D614G असे संबोधले जाते, यात उत्क्रांती झाली जी खूप संसर्गजन्य आहे. ही बाब चिंतेची असल्याचे शास्त्रज्ञ मानतात. बदल अत्यंत घातक असू शकतो? तर 717 ऑस्ट्रेलियन जिनॉम सिक्वेंसेसवरच्या अभ्यासाप्रमाणे 50 टक्के विषाणू प्रकारांमध्ये म्युटेशन म्हणजे उत्क्रांती झाल्याचे आढळून आले आहे. त्याचप्रमाणे CSIRO च्या  शास्त्रज्ञांनी पहिल्या 181 म्युटेशन झालेल्या जिनॉम सिक्वेंसेसचा अभ्यास ट्रांन्सबाऊन्ड्री अॅन्ड इमर्जींग डिसीज या जर्नलमध्ये प्रसिद्ध केला. मात्र हा अभ्यास प्रसिद्ध करण्याआधी भारत आणि ऑस्ट्रेलियातल्या कोविड-19 बाधित रूग्णांच्या विषाणूत पूर्वी म्युटेशन जाणवले नव्हते म्हणून नंतर लक्ष ठवून होतो असेही दोघांनी सांगितले. याशिवाय अमेरिकेच्या लॉस अलामोस नॅशनल लॅबॉरटरीच्या शास्त्रज्ञांनी तसंच टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चच्या डॉ. तन्मय भट्टाचार्य यांनी देखील कोरोना विषाणूत होणाऱ्या म्युटेशन म्हणजे रचनात्मक बदलामुळे काळजी व्यक्त केली आहे.  SARS-CoV-2 वायरस म्हणजे कोविड-19 विषाणूत होणारा बदल अत्यंत घातक असू शकतो. हा दूसरा व्हायरस जास्त संसर्गजन्य असल्याची चिंता देखील त्यांना वाटते.

महत्त्वाच्या बातम्या

CJI Suryakant on Delhi Police Lathicharge: आधी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, आता दिल्ली पोलिसांनाही हिशेब चुकता करावा लागणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून महत्त्वाचा आदेश
आधी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, आता दिल्ली पोलिसांनाही हिशेब चुकता करावा लागणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून महत्त्वाचा आदेश
PM Modi Video Ban Facebook: फेसबुकने अचानक पंतप्रधान मोदींचा तो व्हिडीओ हटवला, गदारोळ होताच निर्णय फिरवला, नेमकं काय घडलं?
फेसबुकने अचानक पंतप्रधान मोदींचा तो व्हिडीओ हटवला, गदारोळ होताच निर्णय फिरवला, नेमकं काय घडलं?
Chitrakoot Crime News: सुट्टीदिवशी दोघे टेकडीवर भेटले; रील बनवलं; तीन नराधमांनी वनविभागाचे कर्मचारी म्हणून धमकावत तरूणीसोबत नको ते केलं
सुट्टीदिवशी दोघे टेकडीवर भेटले; रील बनवलं; तीन नराधमांनी वनविभागाचे कर्मचारी म्हणून धमकावत तरूणीसोबत नको ते केलं
NCP Merger Talking: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत दिल्लीत मोठी घडामोड, मोदी-पवारांच्या भेटीच्या दुसऱ्याच दिवशी चक्रं फिरली, नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत दिल्लीत मोठी घडामोड, मोदी-पवारांच्या भेटीच्या दुसऱ्याच दिवशी चक्रं फिरली, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident Case : आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे
Allegations Against Mangesh Jagtap Baramati: रिसॉर्ट बूक केलं, तारीख काढली, मला बघताच पळतो...; मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, राष्ट्रवादीतील तरुणी थेट जिल्हा परिषदेच्या सभेत पेट्रोल घेऊन घुसली, पुण्यात खळबळ!
Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब
Insta E20 Janta Party Special Report : सीजेपीला मिळालेलं यश E20 जेपीला मिळणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ही काय संसद आहे का? MIDC मधील कंपनीच्या गेटवर अडवताच भाजप नेता संतापला; कंपनी प्रशासनाला दिला इशारा
ही काय संसद आहे का? MIDC मधील कंपनीच्या गेटवर अडवताच भाजप नेता संतापला; कंपनी प्रशासनाला दिला इशारा
Maharashtra Goverment Cabinet Decision: पुणे, अहिल्यानगरपासून सोलापूर परभणी, नांदेडपर्यंत...; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 8 धडाकेबाज निर्णय
पुणे, अहिल्यानगरपासून सोलापूर परभणी, नांदेडपर्यंत...; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 8 धडाकेबाज निर्णय
Kolhapur Crime News: म्हशीच्या गोठ्यात प्रियकरानं माजी सरपंच महिलेचा गळा आवळला, कोल्हापूरमधील अनैतिक संबंधांचा भयानक शेवट, कारची डिक्की उघडताच पोलीस चक्रावले
म्हशीच्या गोठ्यात प्रियकरानं माजी सरपंच महिलेचा गळा आवळला, कोल्हापूरमधील अनैतिक संबंधांचा भयानक शेवट, कारची डिक्की उघडताच पोलीस चक्रावले
Shetkari Karjmafi: कर्जमाफीची यादीमध्ये गोंधळ; कर्ज माफीच्या यादीतील रक्कम, केवायसीवरील रक्कम अन् कर्जांच्या रकमेमध्ये तफावत, शेतकऱ्यांचा संताप, नेमकी अडचण काय?
कर्जमाफीची यादीमध्ये गोंधळ; कर्ज माफीच्या यादीतील रक्कम, केवायसीवरील रक्कम अन् कर्जांच्या रकमेमध्ये तफावत, शेतकऱ्यांचा संताप, नेमकी अडचण काय?
'गटार छाप, आई-बापाच्या जीवावर ऐश, ड्रग्ज, दारू घेणाऱ्या, कित्येकांसोबत शारीरिक संबंध ठेवणाऱ्या...'; हिंदू तरुणींबाबत कंगना नको नको ते बरळली
'गटार छाप, आई-बापाच्या जीवावर ऐश, ड्रग्ज, दारू घेणाऱ्या, कित्येकांसोबत शारीरिक संबंध ठेवणाऱ्या...'; हिंदू तरुणींबाबत कंगना नको नको ते बरळली
NCP Merger Talking: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत दिल्लीत मोठी घडामोड, मोदी-पवारांच्या भेटीच्या दुसऱ्याच दिवशी चक्रं फिरली, नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत दिल्लीत मोठी घडामोड, मोदी-पवारांच्या भेटीच्या दुसऱ्याच दिवशी चक्रं फिरली, नेमकं काय घडलं?
Yugendra Pawar on Ajit Pawar Death: आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे...; अजित पवार विमान दुर्घटनेच्या चौकशीवर युगेंद्र पवार स्पष्ट बोलले, काय-काय म्हणाले?
आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे...; अजित पवार विमान दुर्घटनेच्या चौकशीवर युगेंद्र पवार स्पष्ट बोलले, काय-काय म्हणाले?
Chitrakoot Crime News: सुट्टीदिवशी दोघे टेकडीवर भेटले; रील बनवलं; तीन नराधमांनी वनविभागाचे कर्मचारी म्हणून धमकावत तरूणीसोबत नको ते केलं
सुट्टीदिवशी दोघे टेकडीवर भेटले; रील बनवलं; तीन नराधमांनी वनविभागाचे कर्मचारी म्हणून धमकावत तरूणीसोबत नको ते केलं
Embed widget