एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Discharge Policy For Covid19 | कोविड रुग्णांना डिस्चार्ज देण्याबाबत नवी नियमावली जारी
केंद्र सरकारच्या नव्या नियमावलीनुसार आता राज्यातही कोरोना रूग्णांना डिस्चार्ज देण्यासंदर्भात नवे नियम लागू करण्यात आले आहेत.
मुंबई : कोविड रुग्णांना डिस्चार्ज देण्याबाबत नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. अतिसौम्य किंवा लक्षणे नसलेल्या कोविड रूग्णासाठी सातव्या, आठव्या आणि नवव्या दिवशीही ताप नसल्यास त्याला दहाव्या दिवशी डिस्चार्ज देण्यात यावा, असं यात सांगितलं आहे. केंद्र सरकारच्या नव्या नियमावलीनुसार आता राज्यातही कोरोना रूग्णांना डिस्चार्ज देण्यासंदर्भात नवे नियम लागू करण्यात आले आहेत.
अतिसौम्य किंवा लक्षणे नसलेल्या कोविड रूग्णासाठी
- अतिसौम्य किंवा लक्षणे नसलेल्या कोविड रूग्णासाठी सातव्या, आठव्या आणि नवव्या दिवशीही ताप नसल्यास त्याला दहाव्या दिवशी डिस्चार्ज देण्यात यावा. यासाठी कोवीड चाचणी करण्याची गरज नाही
- डिस्चार्जनंतर या संबंधित रूग्णास 7 दिवस होम क्वॉरंटाईन गरजेचे राहिल.
- डिस्चार्ज देण्यापूर्वी ऑक्सीजनचे प्रमाण 95 टक्के पेक्षा कमी आढळल्यास तर त्या डेडिकेटेड कोविड सेंटर मध्ये दाखल करावे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement