Covid19 Third Wave : दिलासादायक! भारतात दैनंदिन कोरोनारुग्ण संख्या 4 लाखांच्या पार जाणार नाही : शास्त्रज्ञांचा अंदाज
Covid19 Third Wave : भारतात दैनंदिन कोरोनारुग्णांची संख्या 4 लाखांच्या पार जाण्याची शक्यता नाही, असा अंदाज शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.
Covid19 Third Wave : अलिकडे वाढता कोरोनाचा धोका पाहता भारतातील दैनंदिन रुग्णसंख्याही दिवसागणिक वाढेल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतात दैनंदिन कोरोनारुग्णांची संख्या 4 लाखांच्या पार जाण्याची शक्यता नाही, असा अंदाज शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. या विश्लेषणानुसार, मुंबई आणि दिल्लीमध्ये जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच कोरोनारुग्णांचा उच्चांक गाठला आहे, तर बेंगळुरू 22 जानेवारी रोजी कोरोनारुग्णांचा उच्चांक गाठेल.
शास्त्रज्ञांना कोरोनाच्या परिस्थितीच्या ताज्या विश्लेषणातून असे दिसून आले आहे की, भारतातील तिसऱ्या लाटेचा उच्चांक 23 जानेवारी रोजी दिसून येईल मात्र, दैनंदिन कोरोनारुग्णांची संख्या चार लाखांच्या पुढे जाण्याची शक्यता नाही. कोविड ट्रॅकरच्या सूत्र मॉडेलने सांगितले की, मुंबई आणि दिल्लीने जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यातच रुग्णवाढीचा उच्चांक गाठला आहे.
आयआयटीचे प्राध्यापक मनिंद्र अग्रवाल, सूत्र संघाच्या संशोधकांपैकी एक, जे साथीच्या रोगाच्या सुरुवातीपासून कोरोनाच्या आकडेवारीवर संशोधन करत आहेत. मनिंद्र अग्रवाल म्हणाले की, ''देशभरात कोरोना विषाणू मार्ग बदलत आहे. कमी प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटचा प्रसार कमी झाला आहे.
सध्या सुरू असलेल्या तिसर्या लाटेच्या शिखराचे राज्यनिहाय चित्र या मॉडेलने उघड केले आहे. यानुसार, मुंबईने 12 जानेवारी रोजी रुग्णवाढीचा उच्चांक गाठला आणि आता रुग्णसंख्या वेगाने कमी होत आहे. दिल्ली 16 जानेवारीला आणि कोलकाता 13 जानेवारीला रुग्णवाढीचा उच्चांक गाठेल. बंगळुरू 22 जानेवारीला रुग्णवाढीच्या शिखरावर पोहोचेल. निष्कर्षानुसार, महाराष्ट्र, गुजरात आणि उत्तर प्रदेशमध्ये 19 जानेवारीला, तर आसाममध्ये 26 जानेवारीला रुग्णवाढीचा उच्चांक गाठण्याचा अंदाज आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- Omicron Variant : वाढत्या आजारांचा धोका! ओमायक्रॉन आणि प्रदूषणाचा फुफ्फुसांवर परिणाम
- Maharashtra Corona Update : राज्यात बुधवारी बाधित रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक
- Winter Care Tips : ग्लिसरीन त्वचेसह वाढवते केसांचे सौंदर्यच, हिवाळ्यात असा करा वापर
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha