Omicron Variant : वाढत्या आजारांचा धोका! ओमायक्रॉन आणि प्रदूषणाचा फुफ्फुसांवर परिणाम
Omicron Variant : कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरियंट आणि वायू प्रदूषणाच्या यामुळे संक्रमित लोकांसाठी मोठा त्रास होऊ शकतो.
Omicron Variant : कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरियंट आणि वायू प्रदूषणाच्या यामुळे संक्रमित लोकांसाठी मोठा त्रास होऊ शकतो. ओमायक्रॉन व्हेरियंटच्या बाबतीत, केवळ सौम्य श्रेणीतील संक्रमित रुग्णांवर वायू प्रदूषणाचा परिणाम त्यांना गंभीर आजारी बनवू शकतो. सध्या दिल्लीसह देशातील अनेक भागात हवामान खराब आहे, तसेच लोकांना सर्दी-खोकला सारखे आजार आहेत. यामध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग अधिक वेगाने पसरण्याची शक्यता आहे. यावेळी मास्क घालणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, शारीरिक अंतर राखणे या नियमांचे पालन करावे, असे तज्ज्ञांचे मत आहे. संसर्ग टाळण्यासाठी हा सर्वात प्रभावी मार्ग असू शकतो.
ओमायक्रॉन आणि प्रदूषणाचा घशावर हल्ला
मुंबई आणि दिल्लीमध्ये हवामान खराब आहे आणि वायू प्रदूषणाची स्थिती गंभीर असते. वायू प्रदूषणाचा थेट परिणाम फुफ्फुसांवर होतो. अशा परिस्थितीत ज्या रुग्णांना वायू प्रदूषण आणि ओमायक्रॉन या दोन्हींचा सामना करावा लागतो, त्यांची प्रकृती अधिक गंभीर होऊ शकते. म्हणूनच तज्ज्ञ सल्ला देतात की या काळात शक्यतो बाहेर जाणे टाळणे चांगले आहे.
प्रदूषणामुळे का वाढतोय कोरोना?
प्रदूषणामुळे हवा आणखी विषारी होते. अशा स्थितीत हवेतून पसरणारे रोगाचे विषाणू हवेत बराच काळ राहतात. दुसरीकडे, जर तुम्हाला प्रदूषणासोबतच कोरोनाचा संसर्ग झाला तर त्यामुळे तुमच्या शरीराचे अधिक नुकसान होते. प्रदूषण आणि कोरोनामुळे तुमच्या शरीरात आणखी समस्या वाढतील.
प्रदूषणामुळे पेशींचे नुकसान होऊ शकते
प्रदूषण आपल्या शरीरासाठी त्रासदायक आहे. जर तुम्हाला आधीच आजार असेल तर प्रदूषणामुळे पेशींनाही धोका निर्माण होऊ शकतो. तसेच, जर तुम्ही कोरोनासोबत प्रदूषणाच्या विळख्यात असाल, तर तुमच्या शरीराला या संसर्गाशी लढण्यासाठी उपयुक्त पांढऱ्या रक्त पेशी तयार होण्यास अधिक वेळ लागेल, जे धोकादायक ठरू शकते.
श्वसनासंबंधित रोगांचा धोका
प्रदुषणाच्या वाढीमुळे श्वसनाचे आजार होण्याचा धोकाही वाढतो. त्याच वेळी, कोविड -19 विषाणूमुळे श्वास घेण्यास त्रास होतो आणि त्याचा थेट परिणाम फुफ्फुसांवर होतो. प्रदूषणाची पातळी वाढल्यामुळे फुफ्फुस आणि छातीत ब्लॉकेजची समस्या निर्माण होते. अशा परिस्थितीत कोरोना झाल्यास प्राणघातक ठरू शकतो.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- Maharashtra Corona Update : राज्यात बुधवारी बाधित रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक
- Winter Care Tips : ग्लिसरीन त्वचेसह वाढवते केसांचे सौंदर्यच, हिवाळ्यात असा करा वापर
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha