Winter Care Tips : ग्लिसरीन त्वचेसह वाढवते केसांचे सौंदर्य, हिवाळ्यात असा करा वापर
Glycerin For Winter : हिवाळ्यात ग्लिसरीनचा वापर अनेक प्रकारे करता येतो. ग्लिसरीनकोरड्या त्वचेपासून ते कोरड्या स्कॅल्पची समस्या काही मिनिटांत दूर करते.
Glycerin For Winter : त्वचा (Skin) आणि केसांची (Hair) काळजी हा आपल्या जीवनशैलीचा प्रमुख भाग आहे. त्याकडे दुर्लक्ष केल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे त्वचा आणि केसांशी संबंधित समस्या टाळण्यासाठी महिला अनेक महागड्या सौंदर्यप्रसाधनांचा वापर करतात. अशा अनेक स्वस्त वस्तू उपलब्ध आहेत, ज्याचा वापर बऱ्याच काळापासून सौंदर्य वाढवण्यासाठी केला जात आहे. त्यापैकी एक ग्लिसरीन आहे, ज्याचे अनेक फायदे आहेत. कोरड्या आणि निर्जलित त्वचेवर उपचार करण्यासाठी हे सर्वात प्रभावी घटकांपैकी एक आहे. जाणून घेऊया हिवाळ्यात केस आणि त्वचेवर ग्लिसरीनचा वापर कोणत्या प्रकारे करता येईल.
टोनर : ग्लिसरीनपासून टोनर बनवता येते. यासाठी स्प्रे बाटलीमध्ये अर्धे ग्लिसरीन घ्या आणि अर्धे पाणी मिसळा. दोन्ही चांगले मिसळल्यानंतर हे मिश्रण टोनर म्हणून वापरा. फेस वॉश केल्यानंतर टोनर चेहऱ्यावर स्प्रे करा आणि कॉटन पॅडने पुसून टाका. अशा प्रकारे त्वचा चिकट होणार नाही आणि स्वच्छ देखील होईल.
कोरडी त्वचा : हिवाळ्यात त्वचा कोरडी होऊन तिला तडे जातात. ओठ, हात आणि पाय इत्यादी सर्व समस्यांवर एकच उपाय आहे, ग्लिसरीन. यासाठी हातावर ग्लिसरीनचे एक किंवा दोन थेंब घ्या आणि प्रभावित भागावर लावा. जर तुम्ही चेहऱ्यावर वापरत असाल तर पाणी मिसळल्याशिवाय लावू नका. त्याचबरोबर ग्लिसरीन आणि गुलाबपाणी एकत्र करून रात्री लावल्याने हात-पायाची त्वचा फुटत नाहीत.
सीरम : हिवाळ्यात केस खूप कोरडे असतात. विंचरल्यामुळे ते तुटतात. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही ग्लिसरीन वापरू शकता. यासाठी सर्वप्रथम हातात ग्लिसरीन घ्या आणि त्यात काही थेंब पाणी मिसळा. आता हात चोळा आणि ओल्या केसांना लावा. हे काम तुम्हाला शॅम्पू केल्यानंतर करायचे आहे मात्र, त्याआधी केस टॉवेलने चांगले पुसून घ्या.
कंडिशनर : जर तुम्ही शॅम्पूनंतर कंडिशनर वापरत असाल तर त्यात ग्लिसरीन मिसळा. लक्षात ठेवा 30 मिली कंडिशनरमध्ये फक्त 4 मिली ग्लिसरीन घ्यावे लागते. केसांच्या लांबीनुसार हे प्रमाण वाढवता किंवा कमी करता येते. तथापि, कंडिशनरमध्ये ग्लिसरीनचे थोडेसे मिश्रण करा. आता हे केसांना लावा आणि नंतर धुवा. यामुळे कोरड्या केसांच्या समस्येपासून सुटका होईल.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
इतर बातम्या :
- Skin Care Tips For Winter : 'या' गोष्टी वापरा, चेहरा बनेल तरूण आणि चमकदार
- Health Tips : हिवाळ्यात रोज रात्री गरम पाणी प्यायल्याने होतात 'हे' फायदे
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha